सुंदर जग पाहू
#PoetMeNotLeave
* तिसरी कविता *
प्रिय काव्यरसिकहो,
#PoetMeNotLeave या उपक्रमात सहभागी होण्याकरिता माझे नाव *कवि/लेखक/गितकार/गझलकार -विजय व्ही.निकम,
धामणगावकर, चाळीसगांव* यांनी सुचवले व मला नामांकित केले त्याबद्दल मी त्यांचा अंत:करणापासून ऋणी आहे. या काव्य-मॅरेथाॅन मधील कविता रशियन अलमॅनक मध्ये प्रकाशित होणार आहेत.
आज मी माझी तिसरी कविता-' *सुंदर जग पाहू*' पोस्ट करत आहे. हि मराठी कविता मी स्वत: भाषांतरीत केली आहे. या काव्य-मॅरेथॉनची साखळी पुढे सुरु ठेवण्यासाठी मी लेखक/कवी आदरणीय,श्री.विनोदजी अष्टूळ,हडपसर, पुणे,यांना आमंत्रित करीत असून त्यांचे नामांकन करत आहे. त्यांना मी विनंती करतो की, त्यांनी पुढचे आठ दिवस दररोज स्वत:ची मुळ कविता व तिचे इंग्रजी भाषांतर येथे आपल्या छायाचित्रासह प्रकाशित करावे. आणि हे काव्य-मॅरेथाॅन सुरु ठेवण्यासाठी दररोज एका कवीचे नामांकन करावे.
कवी
नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे
Dear Poetry Lovers
*Vijay V.Nikam, Dhamangaonkar,
Chalisgaon* eminent poet has suggested my name for this #PoetMeNotLeave poetry marathon. He nominated me to participate in this poetry marathon. I am very grateful for this nomination. These compositions will be published in Russian Almanac.
Today I am submitting my 3rd poem *Let's see the beautiful world*
with its English translation. I have translated this by my own.
To continue the chain of this poetry marathon I nominate eminent Writer, poet Shri.Vinodji Ashtul,Hadapsar,Pune and request her to continue this for eight days by publishing original composition with its English translation and nominate a poet/ poetess everyday.
🌷।।सुंदर जग पाहू।।🌷
**********
राहुनि गेले मागे काही
आता वळूनि नको पाहू
सूर तुझे माझे जोडोनि
आपुले नवीन गीत गाऊ...!
जुन्या क्षणांची रात्र नकोशी
निघूनि गेली दूर.......
पहाट घेऊनि आली संगती
नव्या दमाचा स्वर...!
झाले गेले विसरुनि आता
नव्या वाटेने जाऊ......
थोडे तुझे थोडे माझे
आपुले नवीन गीत गाऊ.....!
लाल पिवळे तांबूस फुटले
सूर्य उघडतोय दार........
राम घेऊनि सोबतीला
करू नवा सेतू पार...........!
जपून ठेव तू मुखात तुझ्या
अमर प्रीतीची वाणी......
देत राहू वंगण त्यासी
करू या रक्ताचे पाणी.......!
नजरा आपुल्या एक झाल्या
नवं सुंदर जग पाहू.........
राहुनि गेले माघारी
त्यांना सोबत घेऊनि जाऊ !
🌷########🌷
.........नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो. नं.७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-३० ऑक्टोबर २०२०
Let's see the beautiful world..🌷
**********
Some stayed behind
Don't look back
Sur tujhe my jodoni
Sing your new song ...!
Don't miss the night of old moments
Gone away
The company came at dawn
New asthma tone ...!
Forget it now
Let's take a new path ......
A little of yours, a little of mine
Sing your new song .....!
The red-yellow salmon burst
The sun is opening the door ........
Take Ram with you
Let's cross the new bridge ...........!
Take care of your mouth
The voice of immortal love ......
Let's keep the grease on
Let's do this blood water .......!
The eyes became one with us
Let's see the new beautiful world .........
Rahuni went back
Take them with you!
🌷 ######## 🌷
......... Nanabhau Mali
Hadapsar, Pune-411028
Mo. No. 7588229546
9923076500
Dated: October 30, 2020
Comments
Post a Comment