आता वादळ उठत नाही
आता वादळ उठत नाही
🙏🙏🙏🙏🙏🙏
******************
...नानाभाऊ माळी
🌷🌷🌷🌷🌷🌷
मी विसरुनी गेलो लिहिणे
मनात वादळ धडकत नाही
शिथिल झालें अवयव आता
हातात पेन उचलत नाही.....!धृ!
घोंगावत दुरून तुफान यायचं
उलथवूनि किनारा निघूनी जायचा
उन्मळलेल्या बागेस देखील
अलगद वारा उचलूनि घ्यायचा..!
लिहिता लिहिता वादळांवरं
कसे हो मन हे शांत झाले
निपचित पडले कुंभकर्णसम
आता बंड हृदयात झोपी गेले.!
वादळ आलेतं आणिक गेलेतं
मन घोड्यावर आरूढ होते
चंचलतेचा देऊनि दाखला
हाती मशाल देत होते.........!
शिथिल झालें अवयव आता
हातात पेन उचलत नाही.....!धृ!
*********************
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे
मो.नं.७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१४डिसेंबर२०२१
Comments
Post a Comment