गोड दिपावली
🌹🌹गोड दिपावली🌹🌹
************
.......नानाभाऊ माळी
कुशीत घेऊनि प्रकाशाला
अंधार दूर गेला रं......
सोन पावली आली दिवाळी
हर्ष मनाला झाला रं......!
फुलबाज्यांनी काढिले वर्तुळ
चांदण्या हसत आल्या रं...
सोन टिकलीच्या संगतीने
भुईनळ आकाशी गेला रं..!
अलंकार उजळला नर देहाचा
तेजोमय पवित्र झाला रं....
लक्ष्मी आली नरक चतुर्थीला
घरी आनंद नाचत आला रं..!
पाडवा आला भेटावयाला
बळीराजा धन्य झाला रं......
धन धान्याने घरं भरीलें
भाऊ बहिणीकडे आला रं...!
आज दिवाळी आली रं...!
दिवाळी आज आली रं...!
🌹********🌹
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं.७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१४नोव्हेंबर२०२०
Comments
Post a Comment