संपादकीय

🌷संपादकीय🌷
***************

बंधू-भगिनींनो!
 आज २८नोव्हेंबर २०२१!आजचं महामानव!जगातील दीन- दुखीतांचे कैवारी!शिक्षणाचे जनक!प्रसिद्ध समाजसेवक!महात्मा ज्योतीराव फुले यांचा स्मृतिदिन!त्यांना विनम्र अभिवादन करीत असतांना त्यांच्याचं पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीतील भोसरी या पवित्र भूमीत खान्देश माळी मंडळाच्या वतीने २२व्या राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन केले !
 
मागील २१वर्षाचा प्रदिर्घ प्रवास!अनेक चढउतारांवरुन पुढे चालतं,समृद्ध अनुभवांची उत्तम शिदोरी खान्देश माळी मंडळाच्या साथीला आहे!आपण सर्वचं पूर्ण ताकदीनिशी मंडळाच्या पाठीशी उभे आहात!प्रत्येक मेळाव्यातून अनुभवांची नवीन शिदोरी घेत,चांगलं ते शिकून,नवनवीन संचित स्वीकारीत खान्देश माळी मंडळाची वाटचाल सतत सुरू आहे!

गेल्या दोन वर्षांपासून करोना महामारीचं संकट उभे होतं!आजूनही पूर्णतः त्यातून आपण बाहेर पडलेलो नाहीत!त्यात  अनेक ज्ञात-अज्ञात  समाजबांधवांचं दुःखद निधन झालं!घराघरात अतिशय मोठी हानी झाली!ते दुःख कधीही विसरता येणार नाही!आता करोना संकटावर मात करीत पुढे जायचं आहे!तोंड देत पुढे जायचं आहे!.....

बंधू-भगिनींनो!आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे!समाज परीवर्तनाची प्रचंड मोठी लाट आलेली आहे!आपलं सामाजिक जीवन ढवळून निघालेलं आहे!माणसं शरीराने,मनाने दूर दूर चालली आहेत!त्यांना प्रत्येक बाबतीत कमी वेळात रिझल्ट हवा आहे!समाज बांधव गाव सोडून पोटासाठी राज्याच्या,देशाच्या काना कोपऱ्यात स्थायिक होऊ लागला आहेत!मनाने नव्हे तर शरीराने अंतर वाढते आहे!माणूस माणसापासून दूर जाऊ लागला आहे!माणूस बदलतो आहे!समाज बदलतो आहे!माळी समाज स्थलांतरित होतो आहे!

बंधू-भगिनींनो!ज्या गावात मी वयाच्या जवळपास २५व्या वर्षापर्यंत राहिलो!वाढलो ! तेथेच घडलो!अन आता नोकरी निमित्ताने दूर गेलो!आज गावातीलचं नवीन पिढी मला ओळखेनाशी झालेली आहे! बंधू-भगिनींनो आपल्या ओळखीची व्याख्या बदलायला लागली आहे!काळानुरूप बदल घडू लागला आहे!!जुन्यातलं चांगल ते स्वीकारीत आपली वाटचाल चालू आहे!तोंड ओळख मागे राहून पुराव्यांची जंत्री पुढे चालू लागली आहे!शब्दांवर विश्वास ठेवणे आता चालणार नाही!कृतीतून सर्व साध्य करणं चालू आहे!आपण गाव-गल्ली सोडून शहराच्या धकाधकीत  सापडलो आहोत!खान्देश माळी मंडळ देखील या परिवर्तनातून जात आहे!

पूर्वी गावातल्या गल्लीत दिलेला आवाज गावभर ऐकू यायचा!तोच आवाज शहरातील फ्लॅट संस्कृतीत कसा आणि कुठेलुप्त झाला आपल्याला कळल देखील नाही!आपल्याच कोषात वावरणारा माणूस समाजापासून दूर दूर जाऊ पहात आहे!नवीन लेखी ओळख जन्माला येऊ लागली आहे!विवाह क्षेत्रांत देखील बदलत जाणवू लागले आहेत!व्यावसायिकता वृत्ती जन्म घेत आहे!

विवाह वेदीवर चढणाऱ्या विवाह इच्छुक तरुण तरुणींची अपेक्षा देखील बदलू लागल्या आहेत!जोडीदार कसा असावा याची जाणीव तरुण तरुणींना होऊ लागल्याने औपचारिकतेच्या अनुषंगाने जोडीदार निवडीचं मनाजोगत स्वातंत्र्य मिळू लागलं आहे!बदल आणि कल लक्ष्यात घेता विवाह क्षेत्र बदलायला लागलं आहे!बदल आणि परिवर्तन विकास प्रक्रियेचं अंग असतं!मुला-मुलीचं स्थळ शोधण्यात व्यावहारीकतेने चंचू प्रवेश केलेंला आहे!बदलत्या काळानुरूप हा बदल स्वीकारावा लागत आहे!म्हणूनच खान्देश माळी मंडळानें दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील दिनांक २८ नोव्हेंबर २०२१रोजी २२वा वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला!मेळाव्यास उपस्थित असलेल्या वधू-वर आणि पालकांचे, समाजातील सर्व मान्यवरांचे मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो!मंडळानें आयोजित
 केलेल्या मागील २१ वर्षाच्या वधु-वर मेळाव्यातील अनेक ऐतिहासिक सोनेरी पानं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या हृदयात जपून ठेवलेली आहेत!

खान्देश माळी मंडळ स्थापने मागील अनेक प्रमुख उद्देश होते!खान्देशातून आलेल्या समाज बांधवांचे संघटन करणे!संत सावता महाराज,क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणे!या महात्म्याच्या पुण्यतिथी-जयंती निमित्त समाजहिताचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे!सोबतच राज्यस्तरीय वधु-वर मेळाव्याचे आयोजन करणे!समाज संघटनसाठी कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन करणे!समाजातीलच शिक्षण क्षेत्रात गुणवंत-यशवंत  विध्यार्थ्यांचा गुणगौरव करणे!समाजातीलचं ज्ञानवंत-विचारवंत, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या बंधू-भगिनींचा सन्मान करणे!त्यांना प्रोत्साहन देणे!आपण ज्या कर्मभूमीत रहातो तेथील माळी समाजातील सामाजिक सामंजस्य वाढविणे!संयुक्तिकपणे फुलें विचारांचा प्रसार करणे असा होता!

खान्देशातून आलेलें बांधव जन्मभूमीचा उत्तम आदर्श बाळगीत, कर्मभूमीत नावलौकीक कमवत आहे!कर्मभूमीच्या विकासात खारीचा वाटा उचलीत आहेत!समाज बांधव या कर्मभूमीत समाज हिताचे उत्तम समाजकारण करीत आहेत!विकासाला हातभार लावीत आहेत!गेल्या २२ वर्षांपासून खान्देश माळी मंडळ अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेत आहे!उत्तरोत्तर अनेक कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे!

बंधू-भगिनींनो!वधु-वर परिचय मेळाव्यातून दोन भिन्न व्यक्तींची नाळ जोडली जात आहे! नात्यांची ओळख होते आहे! एकमेकांशी परीचित होत आहेत!
समाज एका धाग्यात बांधला जात आहे!ऋणानुबंधांचे धागे बळकट होत आहेत!उपवर वधु-वरांना
 एकाच व्यासपीठावर आणून त्यांना एका धाग्यात बांधण्याची उत्तम परंपरा कायम ठेवली आहे!तरुण तरुणींनी देखील आपला जोडीदार निवडतांना आचार, विचार  व सद्गुणांचा देखील विचार करावा!केवळ सौंदर्याचाचं विचार करू नये! खान्देश माळी मंडळ वधु-वर परीचय मेळाव्या नंतर वधु-वर परीचय पुस्तिका छापून पुढे संबंधिततांना पाठवीत असतं!हे काम अतिशय खर्चिक असतं! जिकरीचं असतं तरीही समाज बांधवांचे हित लक्षात घेऊन हे कार्य अखंडपणे सुरू आहे!अनेक समाज बांधवांनी वधु-वर मेळाव्यातून जीवन साथी निवडले आहेत!त्यांचा फोन आल्यावर मेळावा घेतल्याचं वेगळंच समाधान मंडळाच्या सदस्यांना मिळत असतं!हे कार्य समाज उन्नतीसाठी व फुलें विचारांच्या  मार्गावरील महान कार्य आहे!

वधु-वर परीचय मेळावा आयोजित करण्यासाठी अनेक हातांचा!विचारांचा!साथीदारांचा भरभक्कम साथ आणि हात सोबतीला लाभत आलेला आहे!मेळावा यशस्वी करण्यासाठी..  परीचय पुस्तिका संपादीत करण्यासाठी मंडळाचे सर्व संचालक मंडळ!वधु-वर समिती!सर्वचं आजी-माजी सदस्यांचा सिंहाचा वाटा असतो!कार्य सिद्धीस नेण्यासाठी अहोरात्र कार्य करीत असतात!.. हीचं मंडळांची खरी शक्ती आणि बलस्थाने आहेत!सर्वच क्रियाशील कार्यकर्ते व समाजबांधवांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम आयोजित केली जात असतात! मेळावा आनंद देऊन संपन्न होत असतात!कार्यकर्त्यांची मोठी फळी सोबत घेऊन खान्देश माळी मंडळ मेळावे आणि समाजकारणात पुढे वाटचाल करीत आहे!तरुण सहकाऱ्यांचा हात भक्कमपणे साथ देत आहे!सर्वंच समाज बांधवांचे!मान्यवरांचे आणि मंडळ स्थापनेपासून ज्यांनी प्रेमाचा आधार दिला त्या सर्व आजी माजी समाजबांधवांचे मनःपूर्वक आभार मानतो!हार्दिक स्वागत करतो!यापुढील वाटचालीसाठी आपल्या आशीर्वादरुपी सहकार्याचा हात सतत आमच्या सोबत राहील अशी अपेक्षा आणि मनिषा बाळगतो!...आपले आभार मानतो! समाज बांधवांच्या अनमोल सहऱ्याबद्दल मनापासून आभार मानतो!सर्व उपवर वधू-वरांना भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा देतो!
धन्यवाद!

जय सावता!जय ज्योती!जय क्रांती
 *********************
श्री नानाभाऊ नथू माळी
अध्यक्ष, खान्देश माळी मंडळ
पिंपरी-चिंचवड पुणे परीसर,
पुणे!

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)