आजोळ

#पुष्प_१६वे...    
 
                        🌹आजोळ🌹
                               ******
                              .......#नानाभाऊ_माळी
बंधू-भगिनींनो!🌹
जेथे आईच्या जन्माची कथा सुरू होते!तिच्याही मुलांची जन्मकथा जेथून सुरू होते!नाळ जोडली जाते!अंतर्मनाचें भाव जोडलेले असतात!ममतेचा सागर तुडुंब भरलेला असतो!नातवंडजन्माने जोडलेलें नाते निदान या जन्मी तरी तुटणारी नसतात!जेथे प्रेमळ भक्तीचं गोकुळ फुलंलेलं असतं! नटखट फुलांचा ताटवा डुलत असतं!अशा ममतामयी अजोड ठिकाणाला आजोळ म्हणतात!

 जिथे नाते जोडली जात नाहीत!सांधली जात नाहीत!जन्माने अजोड असतात!एकसंध असतात!एकजीव असतात! त्यात पवित्र चंदनाचा सुगंध असतो!आजी-आजोबा,आई-मुलं सगळेच आनंदी दिसत असतात!अशा नात्यास आपण आजोळ म्हणत असतो!🌹

ज्यांच्या गावी चांदोमामा संपूर्ण प्रकाशमान असतो!मुलांचं हसत स्वागत करीत असतो!जेथे सकाळचा सूर्यदेव तांबूस रूपात डोळे उघडे करीत वरती येत असतो!सर्वांचं हसतमुख स्वागत करीत असतो!अशा अत्यंत ताज्या अन निर्मळ ठिकाणाला  आजोळ म्हणतात!येथे भावबंधनातील सर्व नाती एकजीव असतात!जन्म हक्काने भाऊ-बहिणी पवित्र नात्यात बांधली गेलेली असतात!नाते घट्ट धाग्यांनी गुंफलेली असतात🌹

बहीण लग्न होऊन सासरी जाते! आई-वडील तिच्या संसार सुखाच्या वार्तेसाठी आतुर असतात!कान आणि डोळे तिच्या शुभ वार्तेकडे लागलेले असंतात!तिची मुलं आणि स्वतः ती आनंदात राहावे म्हणून दिवस-रात्र देवाला प्रार्थना करणाऱ्या आईवडीलांचं घर पवित्र देव्हारा असतो!मुलगी संस्कारातून घडलेली असते!तिची मुलं आजोळी अत्यंत निकटची असतात!🌹

 सासरी गेलेली मुलगी दानातली पवित्र लक्ष्मी असते!ती दिल्या घराची पवित्र तुळस असते!सुगंधी फुलांची कोमल आणि सुंदर वेल असते!तिची मुलं फुलेली सुंदर लडिवाळ फुलं असतात!कोवळ्या हसऱ्या कळ्या असतात!हसणाऱ्या कळ्या आजोळी अत्यंत प्रिय असतात!दंगा मस्तीत दंग असतात!सर्वांना रंग दाखवून तंग करीत असतात!सर्वांना हवीहवीशी वाटणारी ही खोडकर अन खट्याळ फुलं आजोळी सर्वांनाचं आनंद वाटीत असतात!🌹

मुलं सर्वांना हवेहवेसे वाटतात!खोड्या काढून सर्वांना नाकी नऊ आणीत असतात!मामा-मामींना त्रासून सोडीत असतात!म्हणून आजोळ नावाचा पवित्र देव्हारा सर्व मुलांना नेहमीचं बोलावीत असतं!मुलं ही आजोळीच्या देव्हारा दर्शनासाठी आतुर असतात!प्रत्येकाला अत्यंत प्रिय ठिकाण आजोळ असतं!🌹🌹
 
"आईने दिले दान आम्हांसी
आम्ही आजोळीचे फुलें
ममतेच्या भावबंधनाने
आमुचे नाते जोडोनि दिले..!

मामा-मामी हट्ट पुरविती 
आम्ही बहिणीची खट्याळ मुले
आजोळीच्या सुगंधातं फुलले
 आम्ही रंगीबेरंगी फुले!'🌹

बंधू-भगिनींनो!
अनेक आठवणींचा खजिना  आजोळच्या बंदिस्त कप्प्यात ठेवलेला असतो!लहानपणाच्या अनेक आठवणी आजोळीसोबत जोडल्या गेलेल्या असतात!🌹

आजोळ आईमुळे!आईच्या रक्तनात्यांमुळे जोडलं गेलेलं असतं!तिच्याचं मुलांना नात्यांच्या भावबंधनात!रेशीम धागांनी  हळुवारपणे बांधलेलं असतं!अवीट गोडीचं ठिकाण असतं आजोळ!आजोळ ज्ञानामृत पाजीत असतं!🌹

🌹रंगी बेरंगी!विविध रंगी  फुलपाखरं होऊन मनसोक्त उडत राहावं!मामा-मामींच्या संगतीने उधळत राहावं!आजोबा-आजीजवळ हट्ट धरावा!काहीतरी नेहमीचं मागत राहावं!मामीकडे अठ्ठाहासाने!हट्टाने घरातील कुठलीही वस्तू लांबवावी!अंगणात!गल्लीत खेळत राहावंसं वाटतं असतं!मामाकडून दिवसभर काहीतरी वेगळी मागणी करत राहणे!मामाने आपला हट्ट पुरवत राहणे!प्रेमाचा खोल सागर आणि माया मामा मामींच्यात खच्चून भरलेला असतो!आजोबा-आजीच्या ममतेने,मायेने आपण तृप होत असतो!म्हणून आजोळची ओढ असते!🌹🌹

"आजोळीचा रंग गुलाबी
फुलं फुलतात पानोपान
चांदोमामा जवळ घेई
 ऐकलय कानोकान.....!🌹🌹

कस्तुरीचा सुगंध येतो
हरण पळतयं रानोरान
कल्पतरू आई आमुची
आजोळी होतो मानपान.!"🌹

लग्न झाल्यावर मुलगी सासरी जाते!बाळंतपणासाठी  माहेरी येते!कित्येक अपत्यांचा जन्म मामांच्या गावी झालेला असतो! तेथील खान-पान!घर-शेती!अंगण सर्वच मुलांमध्ये भिनलेलं असतं! आईच्या कुशीत वसलेले गाव आजोळ असतं!आजोबा- आजींची कर्मभूमी असते!रीती-भाती साऱ्या काही आपल्या मुलीला जन्माने मिळालेल्या असतात!मुलगी सासरी गेल्यावरही माहेरच्या आठवणीत गुरफटलेली असते!सर्वकाही मनात-हृदयात हा खजिना जपून ठेवत असते!मुलं तिचेचं प्रतिरूपं असतात!मुलं मामाच्या गावी जाण्यास आतुर असतात!आजोबा-आजीच्या मायेने सर्व पाखरं बिनदिक्कत!मनसोक्तपणे कुठेही संचार करीत असतात!आई साधारणतः दिपावली आणि उन्हाळ्यात अर्थात अक्षयतृतीयेला माहेरी येत असते!🌹

सासरच्या राबणाऱ्या रगाड्यातून काही दिवस आराम मिळावा म्हणून सासुरवाशीण माहेरी येत असते!आईवडिलांकडे काही दिवस आराम करत असते!सोबत आपल्या मुलांनाही घेऊन येत असते!मुलांना आजोळी आल्यावर वडिलांच्या बंदिस्त पिंजऱ्यातून बाहेर पडल्याचा आनंद मिळत असतो! आकाश मोकळं होत असतं!काही दिवस मामांच्या गावी मोकाट हिंडायला मिळत असत!🌹

आजोळीच्या अनेक आठवणी सोबत असतात!उरून पुरून उरणाऱ्या शिदोरीगत असतात!पुढील भेटीपर्यंत ती शिदोरी सोबतीला  साथ सांगत करीत असते!शेतात बैलगाडीवर जाणे!मळ्यात फिरणे!गायी म्हशीमागे पळणे, फिरणे!हौशीने त्यांना चारा टाकणे तेथील सर्व ताज्या भाज्या पाहणे!शेतात जाणे! मामाच्या संगतीने बांधावरील झाडाची बोरं तोडणे!सीताफळ,चिक्कू,केळीचा घड तोडणे!मळ्यातली ताजी कांद्याची पात तोडून,मिरची तोडून व लसूण उपटून विहिरी जवळच लाकडं आणून!शेकोटी पेटवून मिरच्या भाजून!ताजा तजेलदार,झनझणीत खर्डा-ठेचा बाजरी नाहीतर ज्वारीच्या भाकरी सोबत खाण्याची मजा काही औरचं असते!🌹

कधी हिवाळ्यात मामा शेतातील भुईमुगच्या शेंगा उपटून बांधावरचं छानपैकी त्या भाजून काढत असतात!असा ताजा रानमेवा खाण्यातली मजा मनाला तृप्तीदेवून जात असते!🌹

मुलांचं वडिलोपार्जित गाव पित्याच्या वंशावळीचचं असतं!तेथे सर्वचं भावंडं,काका-चुलते, चुलत भाऊ सर्वच आखीव! रेखीव!देखीव असतं!प्रमाणबद्ध वर्तुळाच्या परीघावर फिरत असतात!मर्यादांचे ओझे असतं!पण मामांच्या गावाला!आजोळी हेच ओझे फेकून मुलं मोकाट हिंडत असतात!उधळत असतात!आजोळी मामा-मामींचा,आजोबा-आजींचा वेगळाच लळा असतो!लाड होतात!ममतेचं वेगळंचं रूप पहायला मिळत असतं!🌹

आजोळीच्या गोडव्यात!साखरेच्या नात्यात!आई सहीत मुलं तृप्तीचा आनंद घेत असतात!म्हणून आजोळ प्रत्येक सुट्टीत मुलांना लोहचुंबकसारखे आकर्षित करीत असतं!बोलावीत असतं..त्या गोडव्यातं मुलं ओढले जात असतात!आजोबा-आजीचं प्रेम मिळवीत असतात!🌹🌹

आईच्या रक्ताचं देऊळ आजोळी निवास करीत असत!नाळेचां ओलावा ओढीत असतं!मुलांना आकर्षित करीत असत!तेथे आईची पाळेमुळे खोल रुजलेली असतात!तिच्या जन्माची कथा तेथून सुरू होत असते!🌹

हक्काची भावंडं!आईवडील  आतुरतेने मुलीच्या आगमनाची वाट पहात असतात!ती काही दिवस माहेरवाशीण होते!रक्ताच्या नात्यात पाहुनी म्हणून काही दिवस रहात असते!माहेरच्या!जुन्या घरातील आपल्या बालपणीच्या!ओळखीच्या खुणा  आपल्या खाणाखुणा चाचपडत असते!🌹

अधाशीपणे मुलीची नजर साऱ्या घरात भिरभिरत असते!काही खाणाखुणा पुसट गेलेल्या डोळ्यांना स्पष्ट दिसत असतात!तिची नजर बालपण शोधीत असतें!मुलांच्यात बालपण पहात असते!आठवणीचें अश्रू डोळ्यात  तरळत असतात!तिची मुलं मात्र मामा-मामी अन मुलांसोबत दंगा मस्तीत व्यस्त असतात!🌹

काही पुसट खाणाखुणा मागे ठेऊन मुलगी सासरच्या दिशेने निघून जाते!माहेरपणाला आलेली लेक पुन्हा स्वतःच्या सासरी निघूनही जाते!आपल्या पोरांसंगे निघून जाते!काही शब्द मागे ठेवून जाते!काही आठवणी मागे ठेवून जाते!आपलं वागणे मागे ठेवून जाते!आई-वडिलांचे संस्कार घेवून जाते!आईवडिलांच्या डोळ्यांत थोडे अश्रू ठेवून निघून जात असतें!सोबत काही घेवून पुन्हा एकदा नव्या दमाने🌹 मुलांसोबत सासरी जात असते!

मुलं आजोळीच्या अनंत आठवणी मागे ठेवून जातात!काही सोबत घेवून भुर्रर्रकन उडून जात असतात!मुलं चैतन्याचा खळखळणारा झरा असतात!नाविन्यपूर्ण कलाकृतीचे द्योतक असतात!एक काम सांगितले तर दुसरचं काम वाढवून ठेवणारे असतात!त्यांच्यात उत्सुकता कुटून कुटून भरलेली असते!ती खोड्या करण्यात पुढे असतात!गावाला जातांना या आजोळीच्या आठवणी मागे ठेऊन जात असतात!मामा-मामी अन घरातील कुटुंबासाठी मागे गोड आठवणींचा खजिना ठेवून जात असतात!बाळ गोपाळांनी भरलेलं आजोळ पुन्हा खाली होतं राहत!एकटेपण ठेवून!घरात खोड्या करणारे बाळ कृष्ण आपल्या गावी निघून गेलेले असतात!रक्ताच्या नात्यांनी जोडलेलं नात पुन्हा पुन्हा परकी होतं जातं असतात!हळवेपन मागे ठेवून मुलं त्यांच्या गावी निघूनही जात असतात!जोडलेला दुवा काही दिवसांसाठी दूर निघून गेलेला असतो!नातवंडांची किलबिल अन खळाळता आनंदी झरा सोबत घेऊन जात असतात!आजोळच्या आठवणी स्मृती रूपाने सोबत नेतं असतात!पुन्हा आजोळी येण्याचे स्वप्नाळू वचन देवून सोबत दूर निघून जात असतात!🌹

 माहेरच्या मातीशी एकजीव झालेले नातं लग्नानंतर हळूहळू अंतर देत-देत दूर निघून गेलेलं असतं!मुलं पुन्हा आपल्या वडिलांच्या गोतावळ्यात जाऊन पडतात!आजोळ मागे राहतं जातं!🌹

प्राचीन परंपरेनुसार मुलगी लग्नानंतर नव्या घरात जात असते!नव्या माणसात जात असते !नव्या प्रांतात जात असते!नव्या वातावरणात जात असते!नवेपन सोडून संसारात एकजीव होत असते! बाळंततपणालाचं माहेरी येत असतें!मुलांचा जन्म माहेरी होतो!त्याचं मातीचं पीठ,मीठ,पाणी सर्व काही ग्रहण केल्यावर त्याचं मातीची ओढ मुलांना असते!कदाचित म्हणून मुलं शाळेच्या सुट्टीत आजोळी पळत असतात!जीवनाच्या प्रवासातील आजोळ प्रमुख स्टेशन असतं!आजोळ खेड्यातलं असो!शहरातलं असो मुलांना आकर्षित करीत असत! जीवनपटातील विरंगुळा केंद्र आजोळ असतं!आईमुळे ते अभिन्न अंग होत जातं!🌹

आजोळ जन्माची ओळख करून देत असतं!जन्मातून नाळ जोडलेली असते!आजोळ नावाचं मायेचं,ममतेचं ठिकाण झुकझुक गाडीने भेटतं असतं!हे लडिवाळ स्टेशन आनंदाचा वर्षाव करीत असतं!लेकीची पोरं ही उडती पाखरं असतात!त्यांच्यावर जरा जास्तच झुकतं माप दिलेलं असतं!उन्हाळी अन दिवाळीच्या सुट्टीत ही उडती पाखरं आजोळी पोहचतात!परत जातांना आठवणी ठेवून जात असतात!आजोळ शाश्वती देतअसतं!म्हणून आजोळ असतं!..🌹

बंधू-भगिनींनो!
पुन्हा भेटू या पुढील पुष्पासोबत! तोपर्यंत नमस्कार!..🌹
        🌺*********🌺
#नानाभाऊ_माळी,
    लेखक, कवी       
#साहित्यसम्राट_पुणे, 
हडपसर,पुणे-४११९२८
मो.नं.७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-१३डिसेंबर२०२०

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)