महात्मा
#पुष्प_२८वे
!#महात्मा!
🌹------------🌹
...नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
जन्म हा सिद्धांत आहे!जन्माला जो कोणी येत असतो तो इतिहास बनवून जात असतो!एक ठसा मारून जात असतो!इतिहासाची पाने पूढे सरकत असतात! येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत असतात!इतिहास नोंद ठेवत असतो.महनून जन्म हा सिद्धांत आहे असे सांगितले जाते!🌷
इतिहासाचा ठसा उमटविणारे अनेक दैवी अवतार आणि महापुरुषांचा जन्म या महाराष्ट्र भूमीत झाला!आपल्या कर्तृत्वाने काळासंगे देखील लढाई आरंभीली होती!माणसाच्या मनात विचारांची ज्योत पेटवली होती!त्या ज्योतीचा प्रकाश अजूनही तेवत आहे!घनघोर अंधारातून नेण्याचा मार्ग दाखवीत आहे!🌷
संघर्ष हा मानवी जीवनातील अनमोल स्थायीभाव आहे! आपणास संघर्षाची देणगी मागील पिढयांनी वारसाने दिलेली आहे!आपलं अस्तित्व जिवंत ठेवायचे असेल तर संघर्ष अटळ असतो!कधी युद्धातून तर कधी विचार भिन्नतेतून हा संघर्ष करावाच लागतो!🌷
मानवी जीवन मूल्यांची हानी जेथे होत असते!त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येत असेल तेव्हा मात्र तीव्रता वाढते!पिडीत समाज बंदिस्त जोखंडातून मुक्ती मागत असतो!विचारांच्या विस्फोटातून अभेद्य तटबंदी उखडली जात असते! भक्कमपणे उभ्या असलेल्या अंधार साम्राज्याचा लय होतो!विनाश होतो!🌷
भारतात देखील अनेक आक्रमक आले! दडपशाहीतून राज्य केले!काळ सरकत असतो!...आक्रमक येत असतात!जात असतात!..राजसत्ता लयाला जात असते!सत्ता प्रस्थापित करण्यासाठी ताकदीची गरज असते!शक्तीची गरज असते!शक्तीचं जोखंड अति झाल्यावर गुलामीपण जागृत होत असतें!बंडातून माणूस पुन्हा एकवटत असतो!गुलामीचा अंत होत असतो!प्राचीनता पुन्हा नव्यांचा अंगीकार करीत आधुनिकतेकडे वाटचाल सुरू करत असते!🌷
प्राचीन काळापासून भारतीय संस्कृती चालत पुढे सरकत राहिली!मानवी मूल्यांचा आदर करीत चालत राहिली!मग त्यात काही क्रूर कर्त्यांनी माणसांचे माणसाकडून शोषण चालू केले गेले!माणूस त्यात आपलेपण विसरला!स्वातंत्र्य विसरला होता!बंधनात अडकवून फक्त शोषण होत राहिले!शोषित समाजाच्या उद्धारासाठी एखाद्या प्रकाशमय तारा जन्माला येत असतो!तो स्वयंप्रकाशित असल्याने त्यास कितीही अंधार कोठडीत ठेवले तरी तो प्रकाशमानचं असतो!त्याच्या प्रकाशाने इतर प्रकाशित होतात!मानव समाज प्रकाशित होत असतो!स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होत असते!संघर्षातून स्वातंत्र्याचा सूर्य उगवत असतो!तो तेजोमय असतो!त्याच्याच पावलांवर चालणारे अनेक वारस पुढे येत असतात!त्यांचा विचारपुढे नेत असतात!अनुयायी बनून विचार प्रवाह पुढील पिढीच्या हाती देत असतात!🌷
महाराष्ट्र ही पुण्य भूमी आहे!पवित्र भूमी आहे!श्रद्धा भूमी आहे! उत्तम विचारांची,संस्काराची देणं महाराष्ट्राने दिलेली आहे!महाराष्ट्र नवनिर्माची खान आहे!महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे!शूरवीरांची भूमी आहे!पराक्रमाची भूमी आहे!सदविचारांची!आचारांची भूमी आहे!....🌷
महाराष्ट्र पराक्रमी आणि शूरवीर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे!संत ज्ञानोबा तुकोबां रायांची पावन भूमी आहे!अनेक थोर संतांची महाराष्ट्र भूमी आहे!तिची माती कपाळावर लावून सतत नमन करावेसे वाटणाऱ्या या महान भूमीत अनेक महापुरुष जन्माला आलेत!मानव कल्याणासाठी जन्मलेल्या अनेक महान महापुरुषांची महाराष्ट्र भूमी आहे!त्या थोर अनेक महापुरुषांपैकी एक आहेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले!🌹
विचार परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या महात्मा फुले यांची ही महाराष्ट्र भूमी आहे!माणसाला गुलामी विचार धारेच्या विरुद्ध संघर्ष करण्याची हाक देणाऱ्या महात्मा फुलेंची महाराष्ट्र भूमी आहे!"गुलामी मानसिकता बदलणे गरजेचे आहे" असे सांगणाऱ्या महात्मा फुलेंची महाराष्ट्र भूमी आहे!🌹
अभिमानाचा!अस्तित्वाचा!माणूसपणाची सुंदर फुलें आपल्या हाती देणाऱ्या महात्मा फुलेंच्या या भूमीत आपण जन्माला आलो!जातीच्या भिंती उभ्या करणाऱ्या कर्मठ ब्राम्हन्यवादा विरोधातील ज्योत पेटविणारे महात्मा फुले स्वतः त्या वादातून भाजून निघाले होते!🌹
शूद्र म्हणजे हीन!...जेव्हा माणूस दुसऱ्याला हीन समजतो तेथेच माणसाचं अस्तित्व संपत असतं!भेदातून मानवी हक्क जळून जात असतात!मानवी मूल्यांची राख रांगोळी होत असते!निखारा शिल्लक रहात असतो!त्या निखाऱ्यालाही पंख फुटतात!...मग जनामनात त्या निखाऱ्याची धग जाणवायला लागते!गुलाम आपलं अस्तित्व शोधत फिनिक्स होतो!स्वातंत्र्याचे वादळ मजबूत भिंतीवर आदळून!भिंती ढासळतात!भुईसफाट होतात!गुलाम माणूस होतो!स्वातंत्र होतो!माणसाला माणूसपण प्रदान करतो!मनुस्मृती माघार घेते!तडजोड करते!🌹
माणसातील माणूसपण जागविण्यासाठी!..त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी शिक्षण हेचं प्रमुख हत्यार आहे हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी ओळखले होते!जाणले होते!त्याशिवाय बहुजनांचा,शूद्रांचा उद्धार होणार नाही!विकास होणार नाही ही दूरदृष्टी महात्मा फुलेंना होती!प्रथम शाळा सुरू केली!🌷
डोळे असूनही अंधारात खितपत पडलेल्यांना विद्येचा प्रकाश दाखवून महात्मा फुलेंनी शूद्र अति शूद्रांचा उद्धार केला!ज्ञानज्योतीने प्रकाशमान झालेल्या सर्व शूद्रांचा! महिलांचा!परित्यक्ता महिलांचा!शोषित वर्गाचे प्रबोधनकार बनले!महात्मा फुले महामानव होते!🌷
अस्पृश्य समाजाला शिक्षणाचे डोळे देणारे!सत्यशोधक समाजाची स्थापना करून सत्याचा आरसा दाखवणारे!महिलांचा उद्धार करणारे!प्रकाशमान आणि तेजळणारा तारा म्हणजे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुलें होतें!🌷
महाराष्ट्राचे आराध्य दैवत!महाराष्ट्राचा बाणा!महाराष्ट्र धर्म पाळणारे!मराठा तितुका मिळवावा म्हणणारे!.....बुलंद आवाज!शूर!पराक्रमी महाराजा छत्रपती शिवरायांची समाधी रायगडावर शोधून!.. सर्व मानव समाजाला राजांचा आदर्श समोर ठेवून पुढे जाणारे!एका धाग्यात बांधून पुढे जाणारे महात्मा फुले स्वतः एक दर्शन होते!🌷
आज११एप्रिल२०२१!....महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती!इ स१८२७ रोजी या महात्म्याने या महाराष्ट्र भूमीवर पाय ठेवला होता!लहानसा तारा प्रकाशमान होत होतं सूर्यरूप घेत तेजाळत राहिला!...अनेक संकटांना तोंड देत तात्त्विकतेचा वसा कधींही न सोडणाऱ्या या राष्ट्रपित्यास! लोकांच्या महात्म्यास!क्रांतिसूर्यास!....विचारवंतास!....त्यांच्या जयंतीनिमित्त आज विनम्र अभिवादन करतो!भावपूर्ण शब्द सुमने वाहतो!🌷
🌹----------------🌹
....#नानाभाऊ_माळी
लेखक,कवी
#साहित्यसम्राट
हडपसर,पुणे-४११०२८
मोनं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-११एप्रिल२०२१
Comments
Post a Comment