आम्ही माळी जोडिला हो
आम्ही माळी जोडिला हो
*********************
...नानाभाऊ माळी
🌷🌷🌷🌷🌷🌷
जन्मभूमीतून कर्मभूमीचा
आम्ही सेतू बांधिला हो
अखंड माळी जोडीत गेलो
आम्ही समाज सांधीला हो..!
सावता माळी दैवत आमुचे
श्रद्धेचा पुल जोडीला हो
कांदा मुळा पिकवित गेलो
ह्रदयी विठ्ठल धाडीला हो..!
माणूस माणसांशी जोडतांना
धागे सुखाचे विनितं गेलो
हृदय हृदयाशी जोडित नाळ
आम्ही पुढें पुढे चाललो ....!
क्रांतीसूर्याची प्रेरणा घेऊनि
... सत्यासाठी झटत आलो
ऊर्जा शक्ती सर्वंच त्यांची
.... उजेड नवा गाठत गेलो..!
स्त्री शक्तीचा जागर करीत
सावित्रीबाईं सोबत गेलो
ज्योतिस ज्योत पेटवीत आम्ही
... ज्ञानियांकडे धावत आलो....!
***********************
....नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०६डिसेंबर २०२१
Comments
Post a Comment