दिवाळी_त्यांचीही

🌹#पुष्प_१२वे🌹

                  🏮🌹#दिवाळी_त्यांचीही🌹🏮
                                *********
                         ....#नानाभाऊ_माळी

बंधु-भगिनींनो!
आपण आनंद साजरा करत असतो!घराघरात दिवाळी साजरी होत असते!गोडधोड,पुरणपोळी,सांजोरी, चकली,शंकरपाळी,लाडू,चिवडा असे एकना अनेक पदार्थ मोठ्यां पासून!श्रीमंतांपासून सर्वसामान्या पर्यंत दिवाळी साजरी होत असते!

दिवाळी हिवाळ्यात असते! आपली पचनशक्ती ताकदीने सर्व काही पचवत असते!...पोटाला भूक लागत असते!...आपण अधाशागत दिवाळी फराळावर तुटून पडत असतो!..दिवाळीच्या आनंदात नाचत असतो!खेळत असतो!आपले मन नाचत असते!जिकडे-तिकडे आनंद ओसंडून वाहत असतो!हा सृष्टीचा बदल आपल्यात उतरत असतो! थंडीमुळे आपली पचनशक्ती वाढलेली असते म्हणून दिवाळी फराळ घराघरात केला जातो!आनंदाने एकमेकांना वाटून आनंद साजरा केला जात असतो!

घरासमोर पणत्याचे दिवे जागोजगी चमकत असतात! वातीच्या ज्योतीतून प्रकाशाचा! उजेडाचा!नवविचारांचा संदेश दिला जात असतो!आता अलीकडे तर घरासमोर विविध प्रकारच्या लायटिंगच्या माळा चमकत असतात!अंधार दूर लोटीत असतात!लख्ख प्रकाश आपल्या मनातल्या अंधाराला देखील दूर लोटीत असतात! ज्ञानप्रकाश उजेड देत असतो!

बंधु-भगिनींनो!
नरकचतुर्थीला!लक्ष्मीचं आगमनाने घरात धनधान्य! संपत्ती!पैसा घरात येत असतो!सर्व काही आबादनी असत!गरीब श्रीमंत आपापल्या परीने दिवाळी साजरी करीत असतो!सर्वसामान्य माणूस प्रकाश पर्वात अक्षरशः न्हाऊन निघत असतो!तृप्तीचे!समाधानाचे!आनंदाचे क्षण साजरा करीत असतांना आपण आपल्या आजूबाजूला जास्त लक्ष देत नसतो!आपल्याच आनंदाच्या परीघात असतो!....

दिवाळी आनंदाची!भरभराटीची!तृप्तीची!समाधानाची!प्रकाश पर्वाची असते!ती साजरी करीत असताना,आपल्याच दुनियेत रममाण होत असतांना काही कुटुंब!काही व्यक्ती!काही माणसं हातावर गुजराण करणारे असतात!दोनवेळेच्या जेवणाला ही महाग असतात!

रस्त्यांच्या कडेला!आजूबाजूला फाटक्या जीर्ण कपड्यात आपले शरीर झाकून जगणारे सुद्धा राहात असतात!फक्त पोटाची खळगी भरण्यासाठीचं जगत असतात!अतिशय गरीब!दरिद्री!माणसाला दिवाळीच्या सणाशी काहीच देणं घेणं नसतं हो!कित्येक निराधार-गरीब अंगावरच्या कपड्याला ही महाग असतात!

बंधू-भगिनींनो!
आपण आपला आनंद साजरा करीत असतांना असाह्य अन गरीबाला आपल्यातला एक घास दिला तर आपली दिवाळी परोपकारी साजरी झाली असे म्हणता येत!आनंद वाटल्याने द्विगुणित होत असतो!...दान आणि मदत भारतीय संस्कृतीचा भरभक्कम पाया आहे!आधार आहे!आदर्श आहे! गोरगरीबांच्या सानिध्यात आपली आनंदाची दिवाळी साजरी झाली तर मनाला मिळणाऱ्या समाधानाची किंमत काही पटीने अधिक असते!

दानात उपकार नाही!दातृत्व भाव असतो!हृदयातून केलेली मदत मनाला आनंद देत असतो!दिवाळी हिवाळ्याचे द्योतक आहे!निसर्गाचं दान आहे!आपण श्रीमंत नाही पण स्वतःचं पोट जरूर भरू शकतो!अशा स्थितीत आपण ही गोर गरीबांना आपल्या ऐपतीप्रमाणे मदत केली तर दिवाळीचा! प्रकाश पर्वाचा आनंद उपभोगता येईल!

दिवाळीचा फराळ!..आपल्या घरात केलेले गोड-धोड गोरगरीबांना द्यावं!त्यांच्या अंगावर थंडीत एखादी उबदार गोधडी पांघरली तर ते दान मनाला समाधान देऊन जात असतं!आपण हिवाळ्यात फिरत असतो!..भल्या पहाटे morning walk करीत असतो!शेतात राबत असतो!पण रस्त्याच्या कडेला आपल्या हातापायाची वळकुटी करून!थंडीत कुडकूडणारे अनेकजन,अनेक व्यक्ती जगत असतात!...त्यांच्या त्या कुडकूडणाऱ्या शरीरावर जाता जाता एखादी उबदार कांबळ टाकली!गोधडी पांघरली तर त्या व्यक्तीचा आशीर्वाद!कोटीकोटी हुन अधिक असणारे असतात!

आपण आपली दिवाळी 
अशा व्यक्तींच्या सानिध्यात साजरी करूयात!दुसऱ्यांचे अश्रू पुसून आपण पुढे जात राहू!आपली दिवाळी आनंदात साजरी करत राहू!

दिवाळी दानाची माता आहे!लक्ष्मी आहे!ती सतत आपल्या पाठीशी असते!..लक्ष्मीने आपल्याला दिले!...आपण तिचे पुत्र आहोत!तिने जे दान आपल्याला दिले आहे ते आपल्या ऐपतीप्रमाणे थोडंफार वाटून जीवनाचा आनंद द्विगुणित करू यात!आज अभ्यंस्नानाचा दिवस
!...आपली काया पवित्र,स्वच्छ अन निर्मळ करीत असतांना आपले मन शुद्ध अन पवित्र करू यात!....गरीबांच्या घरी आपली दिवाळीचथोडं तरी दान देऊ यात!
आपण आपली दिपावली साजरा करू यात!..आनंद लुटू यात!
    
🙏🌹******🌹🙏

 #नानाभाऊ_माळी
#साहित्यसम्राट
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं.७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-१५नोव्हेंबर२०२०

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)