नवतीची पहाट

🌷नवतीची पहाट🌷
*****************
...नानाभाऊ माळी

शृंगार दिवाळीचा आज
 फुलला नवतीचा साज
सकाळ बोलतेय ताज
कोणी सांगेल का हो राज..!

पहाट उधळतेय गुलाल
पूर्व पिवळी लाली लाल
घोड्यास ठोकलीय नाल
सूर्य करुनि येतोय चाल...!

रात्र कवेत घेत जागली
पहाट संगीतातं रंगली
झाल्या चंद्र ताऱ्यातं दंगली
निशा ही दूर दूर पांगली...!
 
चंद्र ताऱ्यांनी भरीला ताट
किनारी खळखळतेय लाट
चमचमीत झालीय हो पहाट
चालला सूर्यरथाचा थाट......!

सुंदर सुरमयी ही पहाट
कवी होऊनि झाला भाट
हृदयाची मोकळी झाली वाट
खळाळती नदी किनारी घाट...!

दिवाळी चमचमतेय आज
ती नसेल कदाचित रोज
फुलला मांगल्याचा साज
कवींनो सांगा आज राज....!

रोज दिवाळी मनी येते
मज खुश खबर सांगते
 कशी दिवाळी पहाट गाते
हृदयाशी जोडीत जाते नाते...!
 🌷*************🌷
....नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०५नोव्हेंबर२०२१

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)