निसर्ग_सानिध्याचे_संस्कार
#पुष्प_१३वे
🌹#निसर्ग_सानिध्याचे_संस्कार🌹
°°°°°°°°°°°°°°°°°°°°
✍️ #नानाभाऊ_माळी
बंधू-भगिनींनो!
*'सानिध्य' या शब्दापासून खूप काही शिकायला मिळत असतं!सानिध्य!!म्हणजेच जवळीकता!आपलेपणा!समरसता! Positive Energy!संपर्कातून सुकर मार्ग!'सानिध्य' हे साधन आहे* माणुसपण जपण्याच!तुम्ही-आम्ही!समाज!आणि समस्त प्राणीमात्रा निसर्गाच्या सानिध्यात,त्याच्या कुशीत विसावलो आहोत!आपण एकरूप होतो!एकजीव होतो हेच सानिध्याचे समाधान असतं!अशा मनभावन आंतरिक तृप्तीचें सहयोगी बनण्याचं भाग्य मला लाभलं होतं!🌹
*माणूस माणसाजवळ आला की त्याला चांगला वाचता येतो!पारखता येतो!जवळून पाहता येतो!त्याच्यातले सद्गुण-दुर्गुण कळत असतात!चांगल्या वाईटाची लक्षण कळतात!संपूर्ण पारख करता येते!सानिध्यातून शिकायला मिळत असतं!मी खरोखर भाग्यवान आहे!चांगल्या व्यक्तींच्या सानिध्यात येण्यासाठी!माझ्यातले गुण-अवगुण कळण्यासाठीचं निसर्ग सानिध्यामुळे हा योगा योग घडवून आणला गेला असावा!तशी आवश्यकता भासली असावी!निसर्गात माणूस नैसर्गिक वागत असतो!त्याच्या मूळ स्वभावातील रंग-ढंग कळण्यास मदत होते!निसर्ग सानिध्याने आपली नवीन ओळख होते!अनाकलनीय अशा गोष्टींची ओळख होते अन स्वतःलाही अंतकरणातून न्याहाळता येत असतं* !दुसऱ्यांच्या नजरेतून आपलं मोजमाप!मूल्यमापन करता येतं असतं! 🌹
बंधू-भगिनींनो!!
माझंच इतरांकडून मोजमाप करून घेण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या कोकण सहलीसाठी,नागाव समुद्र किनारी!चौपाटीवर स्वानंद घेण्याचा सुवर्णयोग आला होता!सागराचे विशाल रूप!निळसर पाणी!समुद्र किनारी आपल्या लहानशा,अरुंद अन निमुळत्या नजरेत न मावणाऱ्या नारळाच्या बागा दिसत होत्या!डोक्यावरती विस्तीर्ण अनंत निळसर आकाश दिसत होतं!सर्वचं अनाकलनीय होतं!सृष्टीचा जिवंत देखावा पाहून आपल्याच अस्तित्वाची जाणीव झाली होती!मी माझे पण गळून पडले होते!डोळ्यातून निसर्गाच मनोहारी रूप न्याहाळत होतो!
बंधू-भगिनींनो!
सर्वांचा स्विकार करणे निसर्गाचा स्वभाव आहे!चांगले-वाईट आपल्या कुशीत ठेवणे!चांगलं ते देणे हा निसर्गाचा नैसर्गिक गुण असतो!समुद्राची भरती-ओहोटी हा नैसर्गिक स्वभाव आहे!प्रचंड वादळं उठतात!पुन्हा शांत होतात!होत्याच नव्हते होत असतं!निसर्ग रमणीय तर असतोच!वंदनीय सुद्धा असतो!धरतीवर सर्व काही आदरणीय आहे!प्रेरणादायी आहे!मुळात सर्व सजीवांचा जन्म याचं अनाकलनीय निसर्गात झालेला असतो!याचं मातीत झालेला असतो!निसर्गाचा मूळ स्वभाव माणसाच्या रक्तात!धमणीत! स्वभावात आपलं अस्तित्व ठेऊन असतो!🌹
आपण आपल्या इंद्रियांद्वारे जे घेतो!ग्रहण करतो तेचं शरीरात प्रवेश करून नैसर्गिक कृतीने दाखवीत असतो!आपण निसर्गाचाच अंश असल्याने आपले गुण-अवगुण समाजासमोर दिसणारेच असतात!माणसाला बुद्धी आहे!तिच्याद्वारे आपल्यातले अवगुण कमी करता येतात!अनैसर्गिक गोष्टी टाळता येत असतात!
भिन्न स्वभावाची!भिन्न विचारांची!भिन्न प्रवाहाची माणसं एकाच सामाजिक संस्थेत कार्यरत असतात!आम्ही सुद्धा भिन्न विचारांची भिन्न प्रवाहांची माणसं! सर्व सहकारी नागावला गेलो होतो!आम्ही त्यास अभ्यास सहल!प्रबोधन यात्रा असेही संबोधले होते!🌹
आपणही अनेक सेवाभावी संस्थेत कार्यरत असाल!तेथे विचारांची मतभिन्नता असते!पण त्यातून चांगलं ते घेत रहायचं!बाकी सोडून द्यायचं असतं!आपल्या आचरणातून!कृतीतून सिद्ध होत असत!'अभ्यास यात्रा' निसर्ग सानिध्यात,विशाल पर्वत रांगामध्ये,समुद्र किनारी काढली तर तेथे प्रत्येक माणसाचा मूळ स्वभाव कळण्यास मदत होत असते!त्याच्या कडून चांगलं ते शिकता येत असतं!घेता येत असत!निसर्ग सानिध्यातून माणसं वाचायला भेटतात!अवलोकन करायला भेटतात!निसर्ग सानिध्यात सुंदर विचारांची देवाणघेवाण होत असते!आपण थोडं निसर्ग लोहचुंबकीय परिघात येत असतो! त्यात नैसर्गिक वागायला लागतो!आपापसातील मतभेद मिटवण्यास मदत होते!प्रबोधन यात्रेतून तात्विक मतभेद मिटविता येत असतात!🌹
*निसर्ग माणसाला जाणतो! तसा* *तो माणसाला स्विकारत असतो* ! *त्याच्यातल्या मानसिक आंदोलनानाही* *जाणतो!स्विकारतो!निसर्ग माणसाचा स्वभाव* *निर्माता असतो!*
अतिविशाल सृष्टीसौंदर्य न्याहाळताना डोळे दिपून जात असतात!माणूस त्याच्यात तल्लीन होऊन जातं असतो!एकजीव होऊन जातं असतो! जीवन साफल्याचा आनंद विरळाचं असतो बंधूंनो!आपण या सृष्टीचा अतिसूक्ष्म जीव आहोत!माणसाची वयोमर्यादा जास्तीत जास्त१०० वर्षे ठरलेली असेल!अशा कमी वेळात दुर्गुण पेहरून समाज विनाशासही काही जण कारणीभूत ठरत असतात!पण आपला जन्म सत्कार्याचा आहे!अफाट अन अतिप्रचंड बुद्धी माणसाला जन्मतःच लाभलेली असते!तिचा उपयोग योग्य हितासाठी!भल्यासाठी होत असेल तर माणूसपण टिकून राहत असतं!🌹
**तरीही माणूस अमृत पिऊन आलेला नाही!त्याच्या अफाट बुद्धीचा उपयोग कदाचित विनाशाकडे ही होऊ शकला असता!वाईटापासून लांब राहण्याची बुद्धी माणसाला मिळालेली असते....!*
*'जन्मूनि जीव माझा,*
*या कुडीत थांबला आहे!*
*काही वर्षांचा सांगाती मी*
*संस्काराने नमला आहे!*
*खूप जमवली नाती गोती,*
*परीवार माझा जमला आहे!*
*स्वतःच्याच गुर्मीत, *
*अहंकारी रमला आहे!'..*
जेव्हा-जेव्हा ही जाणीव मनाला स्पर्श करते तेव्हा-तेव्हा माणसाच्या आयुष्याची अपूर्णता!तोकडे पणाची जाणीव होत असते! जीवनाची मर्यादा लक्षात येत असते!आयुष्याच्या तोकड्या वेळेचा सदुपयोग करून आम्ही कोकणातील 'नागाव' समुद्र किनारी गेलो होतो!समुद्राच्या निळसर अतिविशाल रूपात एकरूप झालो होतो!वरती सुद्धा *'अनंत'भासणारे निळसर आकाश दिसत होतं!सर्वच अनाकलनीय होत!निसर्गाने मुक्तहस्त वाढून ठेवलं होत! आमच्या चेहऱ्यावरील ताण तणावाच्या सुरकुत्या कुठल्या कुठे पळाल्या होत्या!* 🌹
समुद्राच्या महाकाय अन अति विशाल त्या रूपाच्या सानिध्यात माझ्या क्षुल्लक अस्तित्वाची पदोपदी जाणीव होत होती!मी त्या रुपात कधीचं विलीन झालो होतो!माझं अस्तित्व नगण्य होतं अतिविशाल सागर मोहवीत होता!नारळाच्या बागा हवेवर,वाऱ्यावर नाचत होत्या मी ही तल्लीन झालो होतो.....🌹
*आपण जन्मून आईवडिलांच्या सानिध्यात येतो!ममता,माया, प्रेम,संस्कार अन शिस्तीच सानिध्य हवं हवस वाटत असतं!पुढे खाली पडतो!उठतो!घडतो!अन आयुष्यभर लढत असतो*
सानिध्य संस्कार आहे!परोपकार आहे!कोण कुणाच्या सानिध्यात येईल!सानिध्याच्या वलयातून घडून जाईल ते सांगता येत नसतं! .........🌹
बंधू-भगिनींनो!
असाच सुवर्ण संधीचा योग्य जुळून आला होता!निमित्त होत 'अभ्यास दौरा'!निमित्त होत 'प्रबोधन सहल! *'सहलीचा मूळ अर्थच असा आहे की एक दुसऱ्याची जवळून ओळख करता येते!पारख करता येते!एकमेकांच्या संपर्कातून, सानिध्यातून समाजहित पाहिले जातं असत!संपर्कातून,सानिध्यातून मनं जोडली जात असतात!विचार जोडले जात असतातं!दुरावलेले जोडले जातात!माणसं जवळ येत असतात!विरोधी आचार विचारांचे!विरोधाभासचे अंतर कमी होण्यास निश्चितच मदत होत असते!* 🌹
आपण या सृष्टीचा,निसर्गाचा एक भाग आहोत!निसर्ग सानिध्याने,त्याच्या अनाकलनीय चमत्काराने मनुष्य मोहित होत असतो!माणसं जोडण्यासाठी उत्तम वातावरण असावे लागते! त्यासाठी निसर्ग सानिध्य सर्वोत्तम ठिकाण असतं!आपण निसर्गाचाचं एक अंश आहोत! आपण त्याच्याशी समरस होण्याचा प्रयत्न करीत असतो!
*बदलांचे संकेत देत नवविचारांना साथीला घेऊन निसर्ग उत्थापन घडवीत असतो* !व्यक्तीपरत्व्य विचारांच्या चुली भिन्न असतातच!प्रवाहाच्या चुली भिन्न मांडल्या असल्या तरी उद्देश्य मात्र एकच असतो!निसर्गाशी एकरूप होऊन जगणे!पंचमहाभूतांशी एकजीव होणे!शेवटी त्यातच आपलं अस्तित्व सोडून जाणे आहे! हा निसर्ग नियमचं आहे!निसर्ग आपल्याला विनामूल्य सर्व काही देत असतो!देऊन संगोपन करीत असतो!...भरभरून देणाऱ्या या दात्याच्या कुशीत आनंद घेऊ या!
.....रचियेताच्या माध्यमातून, निमिर्तीच्या सवयीमुळे सम्पूर्ण जीवसृष्टीचं हित पाहिलं जातं असतं!मानवी समाजाचाही विकास होत असतो!जगरहाटीमुळे सामाजिक बदल घडून येत असतात!सृष्टीत दूरदृष्टी ठेऊन मनुष्यप्राणी जगत आहे!संघर्षातून पुढे जात आहे!विचारांच्या मत भिन्नतेमुळे मनाने दूर गेलेल्या व्यक्तीना एकत्र आणून बदल घडवून आणले जात असतात!🌹
आपापसातले भेद विसरून जगणं सहज!सोफ!साध!सरळ-धोपट जीवनाचा मार्ग बनत असतो!वातावरण बदलामुळे विचारांची देवाण-घेवाण सुकर होत असते!मन एकमेकांशी जोडले जात असतात! बंधूंनो!...अभ्यास यात्रा खूपच लाभदायक ठरली होती!
आपण तेच करावं जे निसर्गाला मान्य आहे!निसर्गाच्या सानिध्यात आम्ही ही गेलो होतो!समुद्र तटावर उभे होतो!संध्याकाळच्या मावळत्या सुर्यदेवास उचंबळणाऱ्या लाटांच्या साक्षीने निरोप देत होतो!किनारी लाटा धडका देत होत्या!जात येत होत्या!विचारांची वादळ मनात हळूहळू शांत होत होती!संवाद साधला जात होता!आम्ही नवीन अध्यायासाठी...देवांणघेवाणीसाठी!नवीन साध्यासाठी कटिबद्ध होत गेलो!🌹
नारळाच्या बागेतून!उंचचं उंच झाड दिसत होती!अनंत नारळ मान वर केल्यावर दिसतं होती!हळूहळू विशाल सागर आणि सृष्टीवर अंधाराची चादर पांघरली जातांना दिसत होती!निसर्गाने आम्हा सर्वांना आपलेपणाची गोड जाणीव करून दिली होती! उत्साहाने!तृप्तीने!प्रसन्नतेचा आनंद घेत!अभ्यास यात्रेचा सर्वांच्या सानिध्यात 'एक मत' होत गेले!आणि आमच्या यात्रेचा समारोप करीत आम्ही माघारी परतलो!🌹
हेच जगणं आहे!
सुंदर जगणं आहे!
हेवा दाव्याच्या पलीकडचे आमुचे वागणे आहे!निसर्गाच्या सानिध्यातून खूप काही शिकत गेलो!हा संदेश देत या पुष्पाचाही निरोप घेतो!अन आपणास दिपावलीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा देतो!🌹
🌷***********🌷
🌷🙏
#श्री_नानाभाऊ_माळी,
लेखक ,कवी
#साहित्यसम्राट, हडपसर,पुणे-४११०२८
मो.न ७५८८२२९५४६/ ९९२३०७६५००
दि.२२नोव्हेंबर २०२०
Comments
Post a Comment