"आई माझी"
"आई माझी"
*********
.....नानाभाऊ माळी
कधी तरी निघून जातील
माझ्या कंठातील श्वास
अडकेल गळ्यात तेव्हा
मज भरविलेला घास!
विश्व निर्मिती जननी आई
अडकवूनि ठेवियले श्वासात
दाराबाहेर विश्व लांघतो
दडवूनि ठेवियले आसात!
पेहरूंनी ठेविले मनात तू ,
शुद्ध ममतेच बीज,
सत्कर्माचे पीक उगवले,
जन्मोजन्मीचा साज!
तूच विठाई आई माझी,
माझ्या वैंकुंठीचा श्वास
पुंडलिक होवू दे मजला
होतो विटेचाचं भास!
धागा धागा विणून शिवला,
नाते शिवली प्रेमाची
युगायुगाचे ऋण मजवर
किर्ती तुझ्याचं नामाची!
विठाईहुन ही श्रेष्ठ आई
प्राण भरीला कंठात
चारही तीर्थें तुझ्यात दिसती
आई ब्रम्हरुपी पंथात!
ऋणानुबंधाचे शिखर आई,
भरीला वैकुंटीचा थाट!
राहून उपाशी वाढिते तू,
सरकवित असतें पाट
डोळे मिटुनी दर्शन घ्यावे,
आई देव्हाऱ्यातील देव
चंदनापरी झिजली आई
चौफेर दरवळे चंदनसुहास
---------
....नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं.९९२३०७६५००/
७५८८२२९५४६
दिनांक-१६ऑक्टोबर२०२०
Comments
Post a Comment