जीवन_सार
पुष्प_२०वे
🌹"#जीवन_सार"🌹
***********
........नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
मी बऱ्याचदा शेळी,मेंढी,गाय, अन इतर प्राण्यांची पिलं जन्म घेतांना पाहिली आहेत!आपण ही पाहिले असेलचं!निसर्गाने त्यांना स्वयंपूर्णता बहाल केली आहे!ते जन्मल्यावर अवघ्या अर्ध्या तासाच्या आत स्वतःच्या पायावर उड्या मारायला लागतात!बुद्धी सोडली तर निसर्गाने भरभरून दिलेले आहे प्राणी-पक्षांना!पशु-पक्षी थोडाच काळ आपल्या पिलांची निगा राखतात!काळजी घेतात!पक्षी सुद्धा... पिलं स्वतःच्या पंखानी उडायला लागल्यावर त्यांचे पालक त्यांना सोडून दूर उडून जातात!काळजी वाहणारे....दूर जातात!पिलं मागे रहातात अन स्वतःच्या हिमतीने स्वतःचं जगायला शिकतात!नंतर पिलांने स्वहिमतीने,मरण समोर ठेवून अन्न शोधायला बाहेर पडतं असतात!निसर्गाने त्यांना धडपड,चिकाटी अन जिद्द जन्मानेच बहाल केली असाव!
निसर्ग नियमांच पालन निसर्गाशी एकरूप होऊनचं चालू असत!मात्र मनुष्य त्याला अपवाद आहे!🌹
बंधूंनो!बुद्धी सोबत घेऊन आलेला माणूस,जन्मतःच परावलंबी असतो!शी-शु सर्वच इतरांच्या आधाराने चालू असत!तोंडात दात नसतात!कमीत कमी सहा-सात वर्ष तरी पालकांच्या आधाराशिवाय मुल जगूच शकत नाही!निसर्ग नियमांनाही पायदळी तुडवीत निसर्गावर मात करण्याच्या प्रयत्नात पारलौकीकाच्या प्रवासाला!मोक्ष मार्गाला निघून जातो!🌷🌷
'परावलंबी जीवन तुझे रे
लोका पाजितो पाणी!
निराधार हा जन्म बापुड्या
उगा खोटीचं गातो गाणी!
घुसखोरीचें हत्यार हाती
उधार तुझी रे वाणी!
खोट नाट समाज बुडवे
वाजवितो खनखन नाणी!'🌹
अतिलोभ!अतिमत्वकांक्षा घेऊन आयुष्य खेळणारा!जगणारा माणूस... वाळवीगत निसर्गाच्या ऱ्हासा मागे लागला आहे!धरणी पोखरतो आहे!अमानुषपणे वागतो आहे!अतिहिंस्र होत चालला आहे!विकासातून ग्रह-तारे जवळ आणतो आहे! धरतीवरील खजिना मात्र रोज सरतो आहे!🌹
बंधू भगिनींनो!
पूर्वी फक्त मातीचीचं घरं होती!त्यात समाधान होतं!सुख होतं!माणूस माणसात होता!मनाला शांती होती!आपापसात ओलावा होता!सर्वचं आतून बाहेरून आनंदी होते!जन्म मरणाची मनात कसली ही भिती,चिंता,काळजी नव्हती!कुठल्याही फेऱ्याची भिती वाटत नव्हती!त्यावेळेस आता इतका अपेक्षा, गैरसमज,अहंकार कुटून -कुटून भरलेला नव्हता!इतरांशी तुलना होत नसे!हळूहळू माणसं मनाने बदलत गेली!पहिली पिढी गेली!
जुन्या मातीची घरं गेली!काळानुरूप सिमेंटची घरं आली!घरांसारखाचं माणूस ही बदलला!माणूसपण मानसातून दूर गेलं!मातीरद्धाच्या जाड भरड भिंती गेल्या!पुढे माणसाच्या मनात स्वार्थाच्या भिंती उभ्या राहिल्या!मातीच्या घरातून भक्कम,मजबूत सिमेंटच्या घरांत आलो!सिमेंटच्या उष्णतेने हिवाळ्यातही फॅनशिवाय झोप येत नाही!मनाला सुख नाही!शांती नाही!भरभक्कम माणुसकी सोडून गेलेल्या घरात मनाला शांती नाही!घरात दोन पैसे आहेत!वस्तू बाजारातून विकत आणू शकतो!पण माणुसकी हरवलेल्या दुनियेत घरपण विकत घेऊ शकत नाही!🌹
बंधूंनो!नात्यांचं,मैत्रीचं मोल पैशात होऊ लागलय!आपलं जगणं सिमेंट सारख टणक व्हायला लागलं आहे!आपलं जगणं व्यापार होत चालला आहे!महाग होत चाललं आहे!आतला उमाळा सोडून दूरदूर चालला आहे! नानाभाऊ म्हणजे मी आता अंतरंगातल्या गोडव्याच्या! मातीच्या!कुडाच्या!पत्र्याच्या घरातला राहिलो नाही!माणूसपण हरवलेल्या घरात राहतो आहे!मी सिमेंटच्या जंगलातील भावनाहीन व्यापारी झालो आहे!मातीचं,
धाब्याच घर पावसाळ्यात टिपटिप गळायच!खारी-माती टाकून पूर्वी टिपटिप थांबायची!🌹
'माती-रद्दाच्या भिंतीवर
बांबू कुडाच छत होत!
मनाचं मनाला कळणारं
भावनांचं एकमत होतं!
गल्ली गल्लीतून साऱ्या
दूध ताक वहात होतं!
सूर्य साक्षीने सार जग
एकोप्याने रहात होतं!'🌹
बंधूंनो!इतरांनाही मनातल्या भावना कळायच्या,
'प्रेमळ माती ओलाव्याने
जोडला होता धागा!
सिमेंटच्या अहंकाराने आज
गर्वाने घेतलीय जागा!'🌹
अहंकार आणि गर्वाची चिता जळली पाहिजे!खाक झाली पाहिजे!पण आज जेष्ठांबद्दलचा आदरभाव गर्वाने खाऊन टाकला आहे!पिता-पुत्रांमध्ये विचारांची मोठी दरी निर्माण झाली आहे! नात्यातीतल अंतर आणि पातळी खालावली आहे!पूर्वी पुत्राच्या भल्यासाठी आईवडील आपलं आयुष्य झिजवंत असत!आयुष्य पणाला लावत असत!🌹...
'आज काल स्वार्थासाठीच
जगणारी पिढी घडते आहे! माणुसकीला विकून ती
फोटोत स्वतःला मढते आहे!'🌹
आपण शहरात बघतो आहोत!गावं खेड्यात पहातो आहोत! काहींचे म्हातारे आई वडील एक तर वृद्धाश्रमात किंवा घरातीलचं एखादया अडगळीत!कुबट वातावरणातील एखाद्या खोलीत दिसतं आहे!जीवनाचा श्वास मोजीत आहेत!आई-वडिलांनी जन्म दिला!नवा सूर्य दाखवला!चंद्र-तारे दाखवले!तेच अंधार खोलीत!एखाद्या पाताळात खितपत पडलेली कधी कधी आपण पाहतो आहोत!🌹
बंधू-भगिनींनो!
हरवलेलं माणूसपण जागोजागी पहायला मिळते आहे!माणूसपण हरवल्याची लक्षणं आहेत!कधी कधी आई-वडिलांसाठी वेळ देता येत नाही म्हणून पैशातून वृद्धाश्रम दाखवणारी मुलं ही आपण पहात आहोत!आपल्याला काळजात ठेवलेल्या!फुलासारख जपलेल्या जन्मदात्यानांचं बाजारातील पैशातून कृत्रिम भावना आणून देत आहोत!जन्मदात्यानां राहायला अशी किती जागा लागते हो?त्यांनीच हालअपेष्टा भोगून त्यांनीच स्वतःबांधलेल्या घरातला एखादा कोपरा त्यांच्या निवासासाठी पुरे असतो हो!जास्त काहीही नको असतं त्यांना!🌹
खरचं मातापित्यांनां जास्त काहीही नको असतं हो!पोटाची भूक?...नाही!तर ते फक्त आपुलकीचे,प्रेमाचे,
जिव्हाळ्याचे,ओलाव्याचे अन आपले दोन शब्द कानी ऐकण्यासाठी भुकेले असतात!चार-दोन आपुलकीच्या शब्दांनी त्यांचं रक्त वाढत असतं!उभारी येत असते त्यांच्या अंगात!त्यांच्या अनुभवांचं जग खूप विशाल असतं!आभाळा एवढ असतं!घरात आई-वडील!आजोबा-आजी असतील तर घराला घरपण असतं!कुटुंबाला अर्थ असतो!घरात स्वर्ग अन गोकुळ नांदत असतं!ते नात्यातील वहाता झरा असतात! झुळझुळ वारा असतात!त्यांच्या शब्दा शब्दात नातवंड हसतात!ते अनुभवांचा विशाल वटवृक्ष असतात!🌷
घरातल्या कोंडवड्याने मनीच्या भावना मरून जातात!भावनाहीन मन मशीन होत!माणूस रक्त मासाचा!मन असलेला!भावना असलेला जिवंत देह आहे!🌹
'जगणं सूंदर आहे
तोवर जगून घ्यावं!
माणसातल्या राक्षसाला
थोडा वागून पहावं!
श्रावण बाळाचं जगणं
जरा तोलून घ्यावं!
पुंडलिकाच्या विटेजवळी
थोडं झुकूनी जावं!🌹
आई-वडील मुलांसाठी कमवतात!पुढे तेच मुलं आई-वडील होतात!ते ही त्यांच्या पुढील पिढीसाठी कमवून ठेवतात अन इहलोकीचा प्रवासाला निघून जातात!अशी ही न तुटणारी वंशवेल साखळी आहे!शृंखला आहे, चालूच राहील!त्यात भावना,आपुलकी,आदर ओतला तर आदर्श अजाण वटवृक्ष सावली बनून पिढ्यानपिढ्याना सावली देत राहील!🌹
बंधू-भगिनींनो!
माणसांने व्यापारीवृत्ती!स्वार्थवृत्ती न जोपासता माणूसपण मनात जोपासून मनसोक्तपणे जगावं!भरभरून प्रेम करावं!परोपकारी होऊन जगावं!माणसातल्या देवत्वास जागे करावं!भाव भावनांच्या खेळात नानाभाऊ माळीने सुद्धा मातापित्यांच्या आदर्शवत मार्गाचा अवलंब करतं जगावं!माणसाने सिमेंटच्या बंगल्यात थंडगार विचारांचा माठ ठेवावा!दारोदारी शांत शीतल,प्रेमवत्सल अन भक्तगुणी श्रद्धेचं तुळसी रुंदावन असावं!घराला घरपण असावं!सदविचारांचं मंगलमय वातावरण घरात असावं!🌹
जीवनाच्या संध्याकाळी मधूर,मंगलमय स्वर कानी पडत रहावा!आनंद देत-घेत मोर पिसारा फुलवित रहावा!आपल्या आत्म्याने पंख पसरवीत हळूहळू साता समुद्रा पार!आकाशा पलीकडे!अनंताकडे!मोक्ष प्राप्तीसाठी उडुनी जावं!🌷
मातीचा सुगंध..सिमेंटच्या ही रुंदावणात सतत दरवळत रहावा!धाब्याचें जुने-जीर्ण,पडकं घर पडलं तरी सिमेंटच्या बंगल्यामधून ही आजी-आजोबाची
काळजी घेणारे!सुदृढ भावनांचा ओलावा असलेली मुलं
असावीत!🌹
"अमृतपाणी माठामधले
गोड मधुर होत जावे!
थेंब थेंब नसानसातुनी
रक्त होऊनि सरकत रहावे!
मी पणाचा मिथ्या अहंम
आतून पूर्ण गळून जावा!
बंगला गाडी येथे ठेवुनी
एकटेच जाणे आपुल्या गावा!
मनुष्य नाम धारण करोनी
आलो होतो परक्या गावा
नानाभाऊ हे नाम माझे
कधी शब्दमुखी तुमच्या रहावा!'🌹
संथगती तृप्तीने माझा
देह कुडीतून उडुनी जावा!
शत उपकार मजवरी देवा
सोडोनि जाईन माझ्या गावा!'🌹
बंधू-भगिनींनो !
हा जीवन सार दररोज मला सत्कर्माची आठवण करून देत असतो!......🌹🌹🌹
'नकोस देवू लोभ मजला!
डोळे गळुनी देह भिजला!
नकोस बनवू स्वार्थी आता
रेड्याचा गळ्यातील घंटा वाजला'
🌹**************🌹
🙏🙏🙏
....#नानाभाऊ_माळी'
लेखक,कवी
#साहित्यसम्राट
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं.७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१७/०१/२०२१
Comments
Post a Comment