बापूंचा गौरव
🌹! बापूंचा गौरव!🌹
***********
....नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!🌹
'गौरव' म्हणजे सन्मान असतो!गौरव म्हणजे पुरस्कार असतो!....गौरव म्हणजेचं कष्टाचं फळ असतं!यातनेतून मिळालेलं समाधान असतं! Achievement असतं!महान कार्याची दखल म्हणजेचं गौरव असतो!गौरव म्हणजे सचोटीचं सुख असतं!सूर्यासमक्ष झालेलं पवित्र कार्य गौरवास पात्र असतं!गौर म्हणजेचं गोरा असतो मनाने, तनाने शुद्ध पवित्र असतं!समाजात चमकून दिसणारा!उत्तम झळाळी असलेला चोवीस कॅरेट दागिना म्हणजेच गौरव असतो!अन दागिना हा अनमोल असतो!....गौरव संपूर्ण मानव समाजात उठून दिसतो!वाह वाह असतो! वेगळाचं असतो!गौरव निखळ असतो! नितळ, स्वच्छ खळखणाऱ्या झऱ्यासारखा असतो!गौरव हा गौरवशाली असतो!गौरवमूर्तीसाठीचं त्याचं आयोजन असतं!बंधूंनो!अशा महान कार्यालाचं गौरव म्हणतात!
गौरव...कणाकणांनी!क्षणाक्षणांनी जवळ येत असतो!वाढत असतो!त्यासाठी अपार कष्ट वाहिलेले असतात!..घणाचे घाव,यातनांचे,शब्दांचे कडवट बोल झेललेलें असतात!अपमान सहन करावा लागलेला असतो!तेव्हा कुठे गौरव प्राप्त होतो!गौवरवापर्यंत पोहचतं असतो!गौरव शब्द व्यक्तीची छाती फुगवतो!उर्मी वाढवतो!कार्यासाठी उद्युक्त करीतअसतो!कार्य दखल घ्यायला भाग पाडत असतं!..गौरव वस्तू वाचक असतो!सन्मान होतो!व्यक्ती नाम वाचकही असतो!....."गौरव" व्यक्तीचं नाव असेल तर??मग "गौरव" घराण्याची शान होतो!आई-बापाचा सन्मान होतो!घराण्याचा वारसदार होतो!पौरुषत्वाची ओळख देतो!आईला पान्हा फोडतो!अनमोल स्त्रीत्वाचं देणं होतो!समाजात इकडे तिकडे गौरव होतो!केंद्रबिंदू होतो!घराण्याची शान आणि मान होतो!सुख अन आनंद होतो!🌹
बंधू-भगिनींनो!🌹
२३एप्रिल१९८७ रोजी दुपारी एक वाजता!दवाखान्यात कापसासारखा मऊ!गोड-गोंडस गुटगुटीत अन सुंदर बाळाचा जन्म झाला!सहा-सात वर्षांपासून अपत्यासाठी व्याकुळ झालेल्या!अपत्यासाठी आतुर असणाऱ्या!तळमळणाऱ्या दाम्पत्यासं गोंडस बाळ झालं!गोंडस मुलगा झाला!सिजरिंगने,आईने यमयातनेतून बाळास जन्म दिला होता!मातृत्वाने कुस उजवली होती!बापाची छाती गौरवाने,अभिमानाने फुलून गेली होती!फुगून गेली होती!बाप झाल्याचा सर्वोच्च आनंद गगनात मावत नव्हता!जीवनातला परमोच्च आनंद झाला होता!स्वतःस धन्यता मानीत होते!गौरवाची अनुभूती घेत,घरचा!कुळाचा "गौरव' म्हणून जागेवरचं पित्याने बाळाचं नामकरण केलं होतं,"गौरव"!नाव ठेवण्यात आलं होतं!🌹
काही तासांचा गौरव!त्याच्या आवाजाने कान तृप्त झाले होते!मातृ-पितृपणाचं समाधान जगातलं सर्वोत्तम समाधान असतं!तृप्तीने मनातल्या मनात अनमोल क्षणांचां आनंद साजरा करीत असतांनाचं सिस्टर icu तून पळत बाहेर आली, "बाळ काळे-निळे पडलं आहे!निपचित पडलं आहे" या शब्दांनी पित्याच्या पायाखालची जमीन सरकली होती!🌺
आयुष्य परीक्षा भूमी आहे!पदोपदी उत्तीर्ण होत पुढे सरकत रहावं लागतं!...."बाप"बनण्याची संधी मिळाली होती!अपत्य जन्माला आलं होतं!बाळाची आई बेशुद्ध होती!भूल देवून इंजेक्शनमुळे आईला शुद्ध नव्हती!बाळ काळे निळे पडलेलं होतं!बाप त्या दोघांनां पाहून हतबल झालेला होता!काळजाची जखम आतल्या आत असते!बाहेर दिसत नसते..वेदनेची कळ निघत असते!फक्त बापालाचं कळत असते! ज्याने वेदनेचा,यातनेचा अनुभव घेतलेला असतो!चटका सहन केलेला असतो!तो वास्तवतेकडे वाटचाल करीत आसतो!तोच खरा वाटाड्या असतो!बाळाला जीवन संजीवनी मिळावी म्हणून बाप धापा टाकीत पळत होता! उपचारासाठी वेगवेगळे दवाखाने बदलत होता!🌷बाळ जिवंत राहावे म्हणून बाप धापा टाकीत पळत होता!आतल्या आत कुढत होता!पाय भोवऱ्यागत गोल गोल फिरत होते!पोटच्या पोरासाठी,गोळ्यासाठी पळत होते!बाप मनातल्या मनात कळत होता!🌹
🌹जैविक शास्त्र जेथे थांबतं!हात टेकतं!बंधूंनो,तिथूनचं एखादा धूसर किरण वर येत असतो!आशेचा किरण येत असतो!विश्व निर्मात्याची क्षणिक संधी उपलब्ध होत असतें!वास्तवाला स्पर्शून,घटना बाह्य चमत्काराच्या अनुभूतीतून जीवनदान प्राप्त होत असतं!कदाचित अशाच चमत्कारामुळे मृत्यूच्या दारात गेलेला गौरव भरभक्कम जीवन शिदोरी घेऊन!संघर्ष करीत आई-वडिलांच्या कुशीत सुखरूप सुखावला होता!विसावला होता!"गौरव"दवाखान्यातून काही दिवसानी घरी आला होता!आई-वडिलांच्या अपत्य आसक्तीची ओढ गौरव होता!काळजाची ओढ गौरव होता!अन तो सुखरूप घरी आला होता!आनंद सागरात दोघेही पूर्णतः न्हाऊन निघाले होते!मूल जन्माने स्त्रीत्वाला न्याय मिळाला होता!काही वर्षांपासूनच्या अतुरतेला गोड फळ आलं होतं!डोळे तृप्तीचे अश्रू गाळत होते!जमाण्याची तिक्ष्ण नजर आता वांझोटी अन मुकी झाली होती!🌹
बंधू-भगिनींनो!
कधी कधी 'अल्पकाळ टिकणारा' आनंद उगाचचं क्षणिक डांगोरा पिटीत असतो!आनंद स्वार्थी असतो!यातना आणि वेदना झेलण्यासाठी पुन्हा संघर्ष सुरू होतो!पुन्हा पुन्हा हृदयाला,मनाला,उभ्या देहाला आगीच्या ज्वालेत ढकलत असतो!वेदनेचा दाह तनाला,मनाला चटका देत असतो!जीवन नवीन धडा देत असतो!घेत असतो!🌹
बाळ घरी आलं होतं!गौरव घरी आला होता!पण वैदिक शास्राला वळसा घालून...!डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे.....डोक्यातील नस दाबली गेल्याने 'मतिमंद','आंधळा' आणि 'फिट येणे' अशी निरपोयोगी संगत विधात्याने सोबतीला पाठविली होती!🌺
ज्याच्यासाठी जगणं असतं!उत्तरायनाचं स्वप्न असतं!उगवत्या पिढीकडे सर्व सोपवून निघून जायचं असतं!पिढीचा शिलेदार परावलंबित्व जीवन घेऊन आला असेल तर आई-वडिलांची मानसिक अवस्था कशी होत असते,जे त्या वेदनेचे भागीदार असतात!यातनां भोगीत असतात तेच खरे जीवन दर्शक असतात!
"जन्म माणसाला नं मागता मिळाला
देऊनि संगत खुजी विधाता तू पळाला!🌺
जगण्यास साथ होती भक्कम तटबंदी
अरे मानवा तुझा रे राजमहाल जळाला!"🌺
आनंद जवळ येत असतो!..अगदी स्पर्श देखील करीत असतो!...तो क्षण सुखावह वाटतो!वाटतं हा क्षण सतत सोबतीला रहावा!आनंद संपूच नये असं वाटत असतं!..हळूहळू आपल्याला मोहवीत दूर दूर निघून जातो!दृष्टिपलीकडे लांब लांब निघून जातो!..अन!..अन आपण उगाचंच दुःखाचे भारे वहात असतो!सोशीक दुःखात ही आनंद घेत जगत असतात🌹
गौरव वयाने ३३वर्षाचा झाला आहे!आई-वडिलांजवळ हट्ट धरतो आहे!मनाला वाटेल तसं करतो आहे!गाणं म्हणतो आहे!कविता करतो आहे!डोळ्याने अधू आहे!त्यात मतिमंद!फिट आली तर मरण यातनेतून रोजचं नवा जन्म घेतो आहे!🌷
सहानुभूती आणि समुपदेशन करणारे भेटत असतात!आत्मविश्वास आणि श्रद्धा ठेवून जीवनाची सुंदर वाट काढीत पुढे चालणे आहे!आसवांना माघारी बोलवीत सुखाच्या कुशीत विसावण्यासाठी अंतरीची वेडी आशा मनाला सोडत नसते!आशेवर जगण्याची उमेद वाट दाखवीत असते!डोळ्यातली शाई पेनात उतरते!डोळे बंद होतात!झरणी कागदावर सर सर चालूच आहे!मनावर बर्फाचा गोळा ठेऊन उमेद जागवीत!बंड करणाऱ्या घायाळ,वेदनादायी मनाला आदर्शाचा पाठ पढवीत!चटके सोसणाऱ्या हातातून ओरिजिनल लेखन चालूच आहे!🌹
गौरवच्या चार भिंतीतलं विश्व शब्दरूप घेत आहेत!शब्द हृदयाला छेदून जात आहेत!आई-वडील अर्थात आदर्श जोडपे!प्रसिद्ध लेखक!प्रबोधन कार!आनंदऋषी आदरणीय बापूसाहेब मोहनदास भामरे सर त्यांच्या काळजाच्या तुकड्याला!सुपुत्राला! "गौरव"ला हृदयातल्या कोमल कुशीत ठेऊन!मानसा मानसात अतिशय सुंदर,सुरेख अन सुखाचे ....मावळतीचे रंग भरत आहेत!स्वतःचे आसवं झाकून दुसऱ्याला आनंद वाटीत आहेत!खुडमिर्चीचं पाणी देत आहेत!गौरवला "बुदुमम्बा"भरवीत आहेत!खिचडी वाढीत आहेत!🌹
सुख पेरणाऱ्या जोडप्यास ...सौ विजया ताईसाहेब आणि आदरणीय श्री बापूसाहेबांना नमन करतो!💐💐💐
*************
.......नानाभाऊ माळी,
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं ७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०५जानेवारी२०२१
Comments
Post a Comment