ओढ नवतीची
ओढ नवतीची
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
...नानाभाऊ माळी
*********************
कपाळी बांधिले बाशिंग
सखये थांब जराशी....!
उगवेल पहाट नवतीची
तुला घेईल उराशी......!
घटिका मोजित चाललो
तुझ्या येईल दाराशी....!
🌷🌷🌷🌷🌷🌷
नमस्कार बंधू-भगिनींनो!
दर वर्षी थंडी येत असतें!मन पल्लवित करून जात असते!उत्साहाचा अथांग आणि उबदार आनंद सभोवताली कणाकणात भरून राहिलेला असतो!सृष्टीचा गुलाबी स्पर्श मन मोहून टाकीत असतो!थंडी हवी हवीशी वाटते!तिचं सुंदर गारव्याची चादर असते!🌹
सध्या गारव्याने शरीरासोबत मन देखील गारठले आहे!वरून उबदार स्वेटर आहे!मन प्रसन्न आहे!चहाचा कप हातात आहे!हातात घरच्यांनी छोट्याशा ताटलीत गरमागरम भजी ठेवली आहे!भुकेचा काहूर उठला आहे!पोटात आग आहे!काय मज्जा आहे!थंडगार थंडीत मनाला ताजेतवाने करीत आहे!🌹
सकाळीच ढगाळलेल्या खोल खोप्यात सूर्य लपून बसला होता!ढगाळलेली मळकी चादर सृष्टीला लपेटून बसली होती!गार वाऱ्याची झुळूक अंगावरील स्वेटरला उगीचचं चिडवत होती!अंगावरील लव आतल्या आत लपून बसली होती!का कुणास ठाऊक गुलाबी झुळूकनें मनाला भुरळ घातली होती!हवीहवीशी वाटत होती!शेकोटीजवळ नेत होती!🌹
बंधू-भगिनींनो!
आज ३१डिसेंबर!२०२१ला निरोपाचा दिवस!ढगाळलेपण कोंदट कोनाड्यात ठेवल्यागत जाणवत होतं!उत्साह शोषून आकाशाच्या कवटीने धुक्यातून ढग पाठवले होते!सूर्य नारायणाचे हरण केले होते!मानव जातीच्या प्रकाशाला लपवून ठेवले होते!३१तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज केली तर ४ होतात!या गुलाबी थंडीत आनंद ४ पटीने वाढायला हवा होता!..ठिक आहे, त्याचं ३१ अंकांची वजाबाकी केली तर होतात २!जोश आणि आनंद कमीतकमी दुपटीने वाढायला हवा होता!...पण नाही!...सरत्या वर्षाला निरोप देताना उगीचचं ढग दाटून आलेतं!सरत्या पानांवर दव साठवून गेलेत!🌹
वर्षभरात खूप काही शिकायला मिळालं!२०२१नें खूप काही दिल आहे!त्यानें खूप काही घेतले सुद्धा हो!आकाशाहून विशाल हृदय असणाऱ्या २०२१नें आनंद पेहरता पेहरता सोबत दुःख ही पेहरीत गेला!जीवन जगण्याची रीत भात सांगून गेला!प्रत्येकाला एका वर्षानें प्रौढ करून गेला!करोना मानवाला शिकवून गेला!डोळ्यात अश्रू साठवून गेला!फाटक्या झोळीत दुःख ओतुनी गेला!सुखाची नवीन व्याख्या आपल्या मनात ठेवून गेला!२०२१ चा करोना अजूनही आपल्या आसपासच रेंगाळतो आहे!त्याला हद्दपार करण्यासाठी जुन्याचा भरभक्कम आधार घेत नव्या जोमाने नव्या वर्षात पदार्पण करण्याची जय्यत तयारी करीत आहोत!🌹
बंधू-भगिनींनो!
आजचा दिवस मोठा वाटतो आहे!एक एक तास संपूर्ण दिवसासारखा वाटतोय!आज कधी रात्र होईल!दिवस पश्चिमेला कधी जाईल!रात्रीचे१२कधी वाजतीलं हिच आतुरता प्रत्येकाच्या मनात हुरहूर लावून आहे!प्रत्येकजन नव्याच्या नवेपणासाठी आतुर झालेला आहे!स्वागताची पाटी तयार आहे!स्वागताचा आरसा तयार आहे!प्रतिमा टिपण्यास आतुर आहोत!पुष्पगुच्छ तयार आहे!फक्त उद्याचा सूर्य उगवू तर द्या!मनाची अवस्था लग्न घटिका सारख झाली आहे!🌹
मागच्याचां हृदयातून आधार घेत!मागचा होता म्हणून पुढे चाललो आहोत!आणि येणाऱ्यांची देखील आतुरतेने वाट पाहात आहोत!दोन प्रेमी एकमेकांच्या भेटीसाठी आतुर आहेत!पृथ्वीचे प्रेम गीत रचून तयार आहे! येणाऱ्या नव्या चाहुलसाठी आपण ही या निसर्ग निर्मितीचा एक भाग आहोत!...मनात खूप योजना साठवल्या असतील!आजची रात्र विरह सहन करीत काढावयाची आहे!उद्याचा प्रेमी भेटणार आहे!काही तास!काही काळ सहन करावे लागणार आहे!काळ विरहाचा दुश्मन असतो असं समजूयात!तो जाता जात नाही! पुढे सरकत नाही!हृदयांची धडकन वाढवतो आहे!🌹
बंधू-भगिनींनो!
मागचं नकोस ते टाकून देऊ!उपयोगी साध्य म्हणून संगतीला घेऊ!उद्याच्या सूर्योदयाची वाट पाहू!माझ्याकडुन वर्षभरात जे चुकीचं घडले असेल!कोणाला वेदना आणि दुःख झालं असेल!चुकून वेडेवाकडे बोलले गेले असेल..... तर त्यासाठी साऱ्यांचीच....अर्थात मित्रांची!सहकाऱ्यांची!आप्तांची!स्नेहीजनांची!मातृ-पितृ यांची!गुरुजांची!सरत्या काळाची!मावळत्या सूर्याची!काळीभोर निद्रेची!समस्त मानव समाजाची!आणि या विश्वाची!मनोभावे माथा टेकून क्षमायाचना मगतो!...माफी मागतो!मागील घटनांच्या दुःखद स्मृतींना विनम्रपणे अभिवादन करीत उद्याचा!...ताजा!तजेलदार!मन ओढून घेणाऱ्या रवीराजाच्या स्वागताची जय्यत तयारी करूयात!...उद्याच्या हसऱ्या मनोहारी सुर्यदेवाची वाट पहात अर्ध्य देत कमळ वाहूयात!आजची३१डिसेंबरची शेवटची रात्र गत काळाची साक्षी
मानूयात!
🙏🙏🌹🌹🙏🙏
***********************
..नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-वर्षाचा सरता दिवस
३१डिसेंबर२०२१
Comments
Post a Comment