नवा यांयनं स्वागत
नवा यांयनं स्वागत
🌹🌹🌹🌹🌹🌹
******************
..नानाभाऊ माळी
नमस्कार भाऊ-बहिनीस्वनं!💐
चौक!बठ्ठ गावं जठे गोया व्हस!च्यार गल्ल्या येरायेरले भेटतीस! तो चौक ऱ्हास!शानलां-सुरता रातले जेवा-खावावर चौकम्हा पान टपरीनांगे वावर खेतीन्या गफाडा मारत बटतसं!गोयंम करी च्यार गोठा सांगत बठतसं!ते ठिकाण गावनी शान ऱ्हास!अथा- तथा थुकी-थाकी पान टपरीनां धंदा वाढवत बठ्तसं!आस ठिकाण चौक ऱ्हास!🌹
कालदिंनं रातले मित्रांसंगे त्याचं चौकम्हा हेट्या वरान्ह्या कोल्ल्या-मोल्ल्या गफ-गफाडया मारी ऱ्हायंतूत!त्यांन्या गप्पा सरेत नई!येरं मांगे येर,हारपाटी सबदल्हे सबद लायी गुताडी ऱ्हायंता!सबदलें सबद भिडी ऱ्हायंतातं!तोंडन्ह बोयकं वाजी ऱ्हायंत!चामडी से म्हनीस्नि वाजी ऱ्हायंत!ठिकरानं ठायकेचं फुटी जात!🌹
मित्र सोता गप्पास्मा गुती,माले गुताडी ऱ्हायंता!लोके कितला गुंगाडतसं पन??दुसरान्हा
इचारचं करो नई?आपली फुटेल डफडी बिनकामनी वाजाडत ऱ्हावो?माले मनमन हिव वाजी ऱ्हायंतं!मी थंडीलें भ्याई आंग चोरी,पॅन्टनां दोन्ही खिसास्मा हात टाकी कुडकुड करत हुभा व्हतु!ना आंगम्हा स्वेटर ना डोकालें मफलर व्हत!थंडीमां नाक भी गयी ऱ्हायंत!कानभी ठनंकाडी ऱ्हायंत!🌹
हातमां मोबाईलनं डीबरं धरी!डोया मिचकाडी, मोबाईलम्हा
काय तरी चाफलतं, मित्र बोलता बोलता मन्ही वाट आडायी बठेल व्हता!रातनां नऊ वाजेल व्हतीन! गावनां आंगेपांगे बागायती खेती से!थंडी ते मजबूत कुमचाडालें लाग्नी व्हती!मी भी इतला टाईम थांबतू नई!...माले त्यानंफाईन पैसा उपाडना व्हतातं!उसनवारीनी माय मरो आस म्हणतस!...मी त्याले दोन हजार रुप्या दि बठ्नू व्हतु!आठ दिन नं नाव करी दोन महिना व्हवामां वूनात तरी भी भाऊ घनघनी नई ऱ्हायंता!आजनां वायदा देलं व्हता!पैसासगुंता आंगवर थंडी झेली ऱ्हायंतू!🌹
मित्रानं हातमां एक गुलाबी रंगनी गांधी नोट दखी मन्हा डोया एकदम चमकनात!भरोसा बठ्ठनां नई हो! म्हणीसनी हातलें चिमटी लिधी!मी जागांवरचं व्हतु!खरचं दोन हजारनी नोट त्यानां हातमां नाची ऱ्हायंती!काकूंयदी करी पहिलेंग ताबाम्हा लिधी!🌹
दोन हजारनी नोटगुंता बयजबरी त्यानंसंगे हुभा व्हतु!आते जथा बन तथा थंडीना अंमल चढेल व्हता!गल्ल्या सामसूम व्हयी गयथ्यात!कुत्रा भुकी भुकी त्यासनी ड्युटी करी ऱ्हायंतात!रात किरकोडास्ना संगीत धरेल आवाज कानवर यी ऱ्हायंता!मी दोन हजार रुप्या खिसाम्हा ठिसनी खुश व्हतू!🌹
रात मव्हरे सरकी ऱ्हायंती!कायी कुट्ट रातम्हा धव्या चांन्या उजाये दखाडी ऱ्हायंत्यांत!रातले भी
हेरीसन्या मोटरी चालू व्हत्यात! भाऊभन पायी पायीवर बागायत करी ऱ्हायंतात!सक्कायम्हा त्यांनी पानी भरानी पायी व्हती! गुइलें मुंग्या लागतसं तश्या भाऊ माले चिटकेल व्हता!रातन्हा बारा वजना व्हतीन!...तीतलामां तो बोलना,"happy New year"!
भाऊ बारावी शिकनां आनी सोतानी खेती समायाले लाग्ना!इंग्रजी नवीन सालनी नेम्मंनं याद ठी त्यांनीं!🌹
मित्र!.. त्यानां मयाम्हा रातपायीनां नंबर व्हता म्हणीसनी पयभारा मयाम्हा पयना!मी नवीन सालनं तोंड दखागुंता खिसाम्हानी नोटलें नेम्मंनं व्हडी धरी घरनां रस्ते लागनू!...२०२२ना सूर्य कव्हय उगना तेच संमजन नई!२०२२नां नव्वा-ताजा सूर्य देव वर चढी ऱ्हायंता!आज मी जाडजूड झावर पंघरीं पडेल व्हतु!तिथलाम्हा
आंगेनां वावरवाला आराया मारत पयेत उना!🌹🌹
तो भो गया काढी आल्लायी ऱ्हायंता,"रातभर तून्ही मोटर चालू व्हती!...गवावरनं पोट भरी!बारा फोडी,पानी आम्हना
वावरम्हा घुशी जयेलं से!आनी आठे तू बैल-जोडी ईकी-फुकी घोरत पडनां?"मी भेमकायीस्नि उठनू!वावरनागंम पयेत सुटनू!आज हेट्या नवा 2022 ना सूर्य वर यी ऱ्हायंता! मनगम दखी-दखी हासी ऱ्हायंता!मी सरमायी गवू!वावरम्हा बारान्ह पोट फोडी पानी ढागेंढागं आंगेना दुसरानां वावरम्हा पयी ऱ्हायंत!व्हायी ऱ्हायंत!गहू-हरभरा बारं फोडी व्हायी ऱ्हायंतातं!पाहयेटे झपाटामां मोटर कोनी चालू कयी ते समजन नही!पहिलेंग हेरनांगम पयनू!मोटर बन करी!ढोका उचकी मारी थांमनां! आज नवा
यांयनी!नवा सालनी परचोती उनी!नवा सालनी हिव कुमचाडतं मनसारखा आयशीलें टकोरा दि उठाडं!🌹🌹
नवा इंग्रजी वरीस्न स्वागत करुत!आपला बठ्ठा गणगोतलें!नवा सालन्ह्या अभायभरी शुभेच्छा!मन्ह मांगल बठ्ठ चुकायेल-चुकायेल इसरी जावा!मानोस से,चुका करी!चुका व्हतीन!काम करी तोच चुका करी! काम नई कर ते तो चुका करी का?मांगल चांगलं ते लेउत!गायनीम्हा गायी लेउत!बाकिनं व्हाता पानीमां सोडी देउत!नवीन वरीस्न!नवा सालनं!इंग्रजी एक जानेवारीनं उगता यांय मव्हरे स्वागत करूतं!🌹🌹
*********************
...नानाभाऊ माळी
मु पो ता शिंदखेडा, जि.धुळे
(ह मु हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं.७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०१जानेवारी२०२२
थंडीनां जोर कमी व्हयना व्हता!
Comments
Post a Comment