भूक
#PoetMeNotLeave
* पहिली कविता *
प्रिय काव्यरसिकहो,
#PoetMeNotLeave या उपक्रमात सहभागी होण्याकरिता माझे नाव *कवयित्री/लेखिका/कादंबरीकार /कथाकार /ललीतलेखिका /गझलकार -लतिका चौधरी ,दोंडाईचा, जि.धुळे* यांनी सुचवले व मला नामांकित केले त्याबद्दल मी त्यांचा अंत:करणापासून ऋणी आहे. या काव्य-मॅरेथाॅन मधील कविता रशियन अलमॅनक मध्ये प्रकाशित होणार आहेत.
आज मी माझी पहिली कविता-' *भूक*' पोस्ट करत आहे. हि मराठी कविता मी स्वत: भाषांतरीत केली आहे. या काव्य-मॅरेथॉनची साखळी पुढे सुरु ठेवण्यासाठी मी सुप्रसिद्ध गझलकार "बिस्मिल"लेखक/कवी श्री.उद्धध महाजन सर,मुंढवा पुणे,यांना आमंत्रित करीत असून त्यांचे नामांकन करत आहे. त्यांना मी विनंती करते की, त्यांनी पुढचे आठ दिवस दररोज स्वत:ची मुळ कविता व तिचे इंग्रजी भाषांतर येथे आपल्या छायाचित्रासह प्रकाशित करावे. आणि हे काव्य-मॅरेथाॅन सुरु ठेवण्यासाठी दररोज एका कवीचे नामांकन करावे.
कवी
नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे
Dear Poetry Lovers
*Latika Chaudhari,Dondaicha-* eminent poet has suggested my name for this #PoetMeNotLeave poetry marathon. He nominated me to participate in this poetry marathon. I am very grateful for this nomination. These compositions will be published in Russian Almanac.
Today I am submitting my first poem *Hunger*with its English translation. I have translated this by my own.
To continue the chain of this poetry marathon I nominate eminent Ghazal,Writer, poet Ghazalkar "Bismil"Shri Uddhav Mahajan sir Mundhva,Pune and request her to continue this for eight days by publishing original composition with its English translation and nominate a poet/ poetess everyday.
🟢🔴🟢🔴🟢🔴🟢
!!..भूक..!!
रस्त्यांवर जगणे ज्यांचे
भुकेचा काहूर उठतो
भाकरीच्या तुकड्यांसाठी
खळगी वीतभर लुटतो........!
गर्वाच्या इमल्यांवरती
पैशांचा वारा सुटतो
दोन घास तुकड्यांसाठी
माणसाला माणूस लूटतो....!
पाठीला बांधीत माणूस
पोटाचाचं लिलाव करतो
रोज विकुनी माणुसकीला
शेवटी सरणासाठीचं उरतो..!
श्रीमंतीच्या पायाखाली
रस्त्यालाचं घाम फुटतो
तळमळूनि उठतो माणूस
भुकेलाचं कंठ फुटतो.........!
हे जगणे सर्वांसाठी
स्वतःलाचं मातीत पुरतो
या खेळाच्या पटावरती
माणूस जखमी झुरत फिरतो..!
कवी:-
नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो. नं.
७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२८ऑक्टोबर२०२०
🟢🔴🟢🔴🟢🔴🟢
!! .. Hunger .. !!
Those who live on the streets
Kahoor wakes up hungry
For bread crumbs
Upset loots all over ........!
On the emeralds of pride
The wind of money blows
For two pieces of grass
Man robs man ....!
The man with the back tied
Auctions the stomach
Everyday sales to humanity
In the end, it remains for balefire..!
Under the feet of the rich
The road sweats
The man wakes up anxiously
Hungry throat breaks .........!
It's for everyone to live
Buries itself in the soil
On the board of this game
The man is walking around injured ..!
Poet
Nanabhau Mali
Hadapsar, Pune-411028
Mo. No.
7588229546
9923076500
Dated October 28, 2020
🟢🔴🟢🔴🟢🔴🟢
Comments
Post a Comment