जन्म म्हणजे उत्पत्ती!
जन्म म्हणजे उत्पत्ती! विश्वातील प्रत्येक ग्रह ताऱ्यांची,सजीवांची उत्पत्ती म्हणजेच जन्माला येणे असतं!...
मानवाचं देखील असेंच आहे!जन्म होणे!विलय होणे!आणि विलीन होणे हा सृष्टीचा नियम आहे!...जन्माला जो येत आहे विशिष्ठ कालावधी नंतर वयपरत्वे त्याला जाणे आहेचं!
माणसाचं तसंच आहे!जन्म कुठे होत असतो!मरण कुठे येतं असतं!स्थलांतरानें हे सर्व घडत असतं!तरीही जन्म झालेल्या ठिकाणची ती पवित्र भूमी सतत लोहचुंबका सारखी आपणास ओढीत असते!
काल दिनांक २१डिसेंबर रोजी माझा जन्म जेथे झाला त्या हृदयातल्या गावाने लोहचुंबका गत ओढून नेले होतें!गेल्या दोन महिन्यात तीन वेळा गेलो!तेथील पवित्र माती नेहमीचं बोलवीत असते!...त्या हृदयात वसलेल्या जन्म गावाचं नाव!मामांच्या गावाचं नाव "म्हसाळे"असून ता. साक्री, जि.धुळ्यातील छोटंसं टुमदार खेड आहे!पाणी भरपूर!तरीही सधन म्हणता येणार नाही!हातात मोबाईल घेऊन कांदे, मेथी, हरभरा, गहू यांच्या वाफ्यांमध्ये पाणी घालन्याचे दिवस आले आहेत!
बालपणीच्या अनेक ओळखीच्या खुणा अजूनही वैभव जपून आहेत!ते सतत खाणाखुणा करून बोलवीत असतात!ढासळत चाललेले आहेत!तरीही ओळख ठेऊन आहेत! पुढे देखील ते ढासळलेल्या अवस्थेत आपलं अस्तित्व टिकवून ठेवतीलही!आपण वयपरत्वे या जगाचा निरोप घेऊन जाणार आहोत!..अशा अस्तित्वांच्या खानाखुणांसाठी डोळ्यांत जे मावेल ते अधाशी पणाने प्रत्येक भेटीत डोळ्यांनी टिपित असतो!💐💐🌹🌹🌷🙏😌
..नानाभाऊ माळी
२२डिसेंबर२०२१
Comments
Post a Comment