सकाय सवरी ऱ्हायंती

🌹सकाय सवरी ऱ्हायंती🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷
  ********************
....नानाभाऊ माळी

भाऊ-बहिणीस्वन!
पाह्येटे झपाटाम्हा...हेट्या दूर दूर  आभाय टेकेल दिखन!तथ  शेंदूरें-पिव्वेधमक उजाये नजरे पडी ऱ्हायन्त!सूर्यदेवनां रथन्या  त्या खानाखुना दिखी ऱ्हायंत्यांत!वाडघाम्हा 'सर्र सर्र' करी खट्टानां आवाज काने पडी ऱ्हायंता!🌹

धल्ला झाडी-झुडी शेनपुंजा आवरी ऱ्हायंता!ढोरेस्ना शेन-मूतनां वास नाकम्हा ऱ्हाई 
 ऱ्हाई घुशी ऱ्हायंता!ढोरे आंग झटकी-झुटकी,शिंगडा हालाई-हुलाई,घुमायी-फिराई
 सोतांनी पाठवर शेपट्या हानी- मारी ऱ्हायंतात!पट्ट्याऱ्या गोमाशा फिरी फिरी आंगवर बठी ऱ्हायंत्यांत!🌹🍀

 बैलस्ना गयालें भांदेलं घंट्यास्ना गोड आवाज कान टिपी ऱ्हायंतात!सकाय जशी फुल हार लिसनी हुभी व्हती!ताजी ताजी दिखी ऱ्हायंती!वाढगाम्हा भांदेल ढोरे येरायेरलें घोमाली-घामाली
 एक दुसरास्ले ढकली-ढूकली उठाडी ऱ्हायंतात!खुटालें भांदेलं गावडी दुरथीनं वासरूगंम दखी  पान्हा फोडी,शिंगे हालाई-हुलाई आल्लायी ऱ्हायंती!गावडीनां हंबराना आवाजम्हा गयालें बांधेल
 घंटीस्नि गोड-गुईचीटिंग धून  कान तृप्त करी ऱ्हायंती! नव निव्हायनी सकाय जशी सनईवर धून लायी मोरन्हा मायेक नाची ऱ्हायंती!🌹 

पाह्यटानं आंधारं सासुले-सासुले   मव्हरे पयी ऱ्हायतं!हेट्या पिव्व्याधमक सूर्यदेव रथवर बठी वरवर चढी ऱ्हायंता!अथा तथा झाडेस्वर बठेल हाड्या-चिडया आपला पखे पसारी सोतांनां 
आंगम्हा चोचा खुपसी-खापसी!टोचीटाची उठी ऱ्हायंतात!त्यास्ना  जोर्बन चिवचिवाट चालू व्हता!बठ्ठा सजीव दुन्याले सक्कायं व्हवानी दवंडी दि ऱ्हायंतात!त्यासना आल्लग आल्लग आवाजम्हा सकाय कव्वी जरत उगी ऱ्हायंती!ताजी ताजी वाटी ऱ्हायंती!खुशी खुशी वाटी ऱ्हायंती!आंगे-पांगेस्ना झाडेस्वर बठेल चिवचिवाट आनी मिठूस्ना गोड आवाजम्हा धरनीमाय
 फुली जायेलं व्हती! हारकी जायेलं व्हती!नव्वी नवरींगत सजेल व्हती!🌹
 
धरणीमाय हिरवायीनां सुपडामां ज्योती लिसनी सूर्यनारायणलें ववाइं ऱ्हायंती!लामेंनंथिन, दूरथींन बल्लावरनां मंदिरथुन घंटानां आवाज काने घुमी ऱ्हायंता!🌹

  व्हवूबेटी गावडीनं शेन लोखंडी बादलीम्हा कुस्करी-कास्करी आंगनम्हा सडा टाकी ऱ्हायंती!घरनां मव्हरे सारसूर करी ऱ्हायंती!गावे गावसन्या व्हवाबेट्या पाह्येटे लव्हकर उठी!हात जोडी सकायनी आरती उतारी ऱ्हायंत्यांत!🌹

 बैलगाडानां चाकल्हे लांब दोरीघाई भांदेलं बकरी...सोतांन्हा  बच्चास्कडे दखी दखी ब्या.. ब्या..करी कोकायी ऱ्हायंती!बगर बगर निय्येगार गवत खात,वागूल करी ऱ्हायंती!थानालें उज्जी पान्हा फोडी ऱ्हायंती!धाक्कला बच्चा दावन तानीतानी त्यासनी मायंगम व्हडी  ऱ्हायंतात! सक्कायनां हाऊ खेय बठ्ठा दुन्याम्हा चाली ऱ्हायंता!आनंदलें हिरदमा बठाडी,जगदुन्यानां दिन उगी ऱ्हायंता!आयीशीस्ले उठाडी ऱ्हायंती!

 सक्कायम्हा धल्ला उज्जी पयापय करी ऱ्हायंता!दिन 
उगानां पहिलेंग बठ्ठ आवरी सावरी आंग धवालें बठ्नं व्हत!धल्ली आंग धोयी-चोयी तांब्याम्हा पानी लिसनी तुईसी मायलें टाकी ऱ्हायंती!डोया बन करी देवन्ह नाव ली ऱ्हायंती!सुखी सवसार गुंता देवले रावनायी करी ऱ्हाइंती!सूर्यनारायणलें डोया बन करी, दोन्ही हात जोडी पूजी ऱ्हायंती!

आंगनंन्हा मव्हरे जेंव्नां हातलें लालभुदूंग शेंदूऱ्या रंगन्हा जास्वंदीनां फुलें झाडलें बिलगी
 बिलगी हासी खुशी ऱ्हायंतात! वार्गानां झोयींवर नाची ऱ्हायंतात!नजरम्हा भराई ऱ्हायंतात! धल्लीनी एक फुल खुडीसनी तुईसी मायलें व्हाये!डोयालायी आनी दोन्ही हात जोडी कवलोंग पाउत हुभी व्हती!खोल पंतीम्हा सोनान्ही ज्योत चमकी ऱ्हायंती!सक्काय नेम्मनं पवतीर व्हयी उठाडी ऱ्हायंती! 🌹

सूर्यकिरणनी लगाम धरी सूर्यनारायण पयता घोडास्ना रथ वर बठी जिमीननां खालतून वर वर यी ऱ्हायंता!घोडास्नि लगाम  व्हडी सूर्यनारायण वरवर चढि ऱ्हायंता!धरतीनी हिरवी-निय्यी साडी नेसेल व्हती!हिरवा चुडा घालीसनी तम्हानंम्हानी पंतीघायी सूर्यनारायणलें मनलायी ववाइं ऱ्हायंती!धरतीवर सूर्यनारायण प्रसन्न व्हयेल व्हता!धरतीमाय सूर्यनारायणन्हा कव्व्याजरत उनम्हा आंग धोयी ऱ्हायंती!एकजीव व्हयी ऱ्हायंती!🌹

हिरवाईनी रजई आनी दुलई जीव जीवस्ले गुदगुल्या करी उठाडी ऱ्हायंत्यात!सूर्यनारायण रथवर बठी वर वर सरकी ऱ्हायंता!सक्कायन्ह कव्वेजरत उन धरतीवर पडी ऱ्हायंत!हाशी-खुशी पवतीर सकाय जीव जीवस्ले खेवाडी ऱ्हायंती!उठाडी ऱ्हायंती!नाचाडी ऱ्हायंती!जगाडी ऱ्हायंती!🌹
 🌷*******🌷*******🌷
...नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
         ९९२३०७६५००
दिनांक-२७ऑक्टोबर२०२१

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)