संस्काराच्या तीन पायऱ्या
संस्काराच्या तीन पायऱ्या
💐👏🌹👏💐
*********************
...नानाभाऊ माळी
🌺🌺🌺🌺🌺🌺
बंधू-भगिनींनो!आपल्या जन्मासोबत संस्कार नावाचं बिरुद पुढे मागे भक्कम कवच बनून वाटचाल करीत असत!सोनं जमिनीतून कणाकणातून मिळत असतं!सोनं संस्कार केल्याशिवाय शुद्ध होत नसत!तें अस्सल २४कॅरेट होत नसत!संस्काराशिवाय शुद्धता येत नसते!🌷
मनुष्य जन्म देखील संस्काराची शाळा आहे!आईच्या गर्भातूनचं आपल्यावर संस्काराची यादी प्राप्त होत असतें!आई कानांनी जे ऐकेल,बोलेल आणि जी कृती करतें...बाळ तसच घडतं असंतं!
संस्कार आपल्या जन्माचा गुरू असतो!आई आपल्या जन्माचा पहिला गुरू असते!आई संस्काराची पहिली पायरी असतें!तिच्या उबदार गर्भात आणि तदनंतर कुशीत आपण घडतं असतो!वाढत असतो!वागत असतो!तिच्या कृतीतून जन्मविद्या घेत वाटचाल करीत असतो!आईच्या ममतेच्या ओलाव्यातून कच्चे मडके तयार होत असत!ज्ञान घेत असतं!संस्कार विध्येचा पहिला धडा आई शिकवीत असते!बाळ आत्मसात करीत असत!🌷
बाळ आईच्या ममतारुपी कुशीतून संस्कारीत होत वडलांच्या सावलीत दाराबाहेर पडतं!वडलांच्या संस्काररुपी पायरीवरील दुसरा धडा शिकतं असतो!धाडस करीत असतो!कर्तृत्व आणि आत्मविश्वास आपल्या झोळीत दान म्हणून स्वीकारीत..वडलांच्या ऋणात रहाणारा मुलगा आत्मसंतुष्टीने जीवनाकडे पहायला लागतो!वडलांच्या पावलांची पवित्र माती मस्तकी लावणारा मुलगा आदर्श मार्गाचा वाटाड्या होतो! आपले वडील मुलाचे बोट धरून संस्काराच्या दुसऱ्या पायरीवर घेऊन जात असतात!वडलांच्या नावाची गुरुकिल्ली घेऊन मुलगा जीवनाकडे पाहू लागतो!मुलाच्या नावापुढे वडलांचं नाव गौरवाने झळकत असतं!सुसंस्कारित होत असत!....अमक्या तमक्याचा मुलगा म्हणून संस्काराच्या अढळ पायरीवरील ऐतिहासिक वारसा बनत असंतो!🌷
बंधू-भगिनींनो!गुरू शिवाय ज्ञान नाही!गुरू आपल्याला जीवन संस्काराची देणगी देत असतातं!आपण विनम्रपणे ते ज्ञान प्राप्त करीत रहावे!दाताच्या चरणी स्वर्पण होत त्यांच्या उत्तम संस्कारांची देणगी आपण स्वीकारत राहावे असंच वाटत असतं!🌷
शाळा ही आपल्या संस्काराची तिसरी नामदेव पायरी आहे!शिक्षक आपल्या जीवनातील तिसरी पायरी असते!शाळेतील शिक्षकांच्या कर्म सिद्धांतरुपी ज्ञानाने आपलं मडके भाजून निघत असतं!गुरू जीवनाकडे डोळसपणे पहायला शिकवीत असतातं!वर्गात खूप काही शिकत असतो!सहपाठी कडून!गुरुजांकडून!अवलोकणातून!अनुभवातून संस्कार फळाची गोड फळं चाखीत जीवनाचा अध्याय आपण शिकत असतो!🌷
बंधू-भगिनींनो!शाळेत असतानां अनेक गुरुजनांनी ज्ञानामृताचा घडा आमच्यासाठी रिता केला होता!त्यावेळेस मुक्तहस्ते गुरुजनांनी ज्ञान वाटलं होतं!त्यांचं हृदयातून शिकवण मी कधीही विसरू शकत नाही!त्यांचं उत्तम शिकवण नेहमीचं स्मरणात राहील!त्यांच्या संस्काराच्या शिदोरीवरचं आज साठाव्या वर्षात देखील सुंदर जीवन जगण्याचा आनंद अनुभवत आहोत!त्यांच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करीत आहोत!त्यांनी दाखवून दिलेल्या हमरस्त्यावर चालत आहोत!त्यांच्यातीलचं एका गुरुजनांचं नाव निश्चितीचं हृदयात अढळपद घेऊन बसलं आहे!....आदरणीय एम.बी.कुलकर्णी सर त्यां पवित्र ज्ञानियांचे नाव!संस्कार गुरुजींचं नाव!🌷
इयत्ता नवी ते दहावी पर्यंत भूगोल आणि मराठी विषय शिकविणारे आदरणीय कुलकर्णी सर म्हणजे संस्काराचं आकाशा एवढं विशाल वटवृक्षाचं रूप होतं!त्यांची अमोघ वाणी!शिकवण्याची तळमळ!त्यांचं सुंदर अक्षर अक्षरशः इतस्ततः खळखळून मोती संडावे तसे वाटे!मन लावून शिकवणे हिच त्यांची हातोटी होती!त्यांची शिकवण्याची पद्धत म्हणजे अमृतरस हृदयात उतरतं रहावा अशी होती!भाषिक अवघड मराठी आणि रटाळ भूगोल विषय अतिशय सहज सोप्या शब्दांत आमच्या दगडी डोक्यात ज्ञान ठोका मारून बसवला होता!तोंडपाठ करून घेतला होता!त्यांची शिकवण्याची पद्धत म्हणजे एखादे प्रवचन ऐकतं राहावे!..एकचित्त होऊन जावे असे होतें!असे आदर्श शिक्षक आपल्या जगण्यात!जीवनात!वाटचालीत नेहमीचं ऊर्जा बनून राहणार आहेत!दिव्य ज्योत बनून राहणार आहेत!त्यात आदरणीय कुलकर्णी सर होते!🌷
एम.बी.कुलकर्णी सर आदर्शाचें आदर्श होते!अशा जीवन घडवणाऱ्या ज्ञारूपी वटवृक्षाच्या सावलीत राहण्याचा महायोग माझ्या भाग्यात लिहिला होता!म्हणूनच त्यांच्या संस्कारची पुंजी अजूनही हृदयात टिकवून आहे!वातीतील ज्योत बनून उजेड देत आहेत!🌷
संस्कार मोती पेरणाऱ्या आई💐वडील💐आणि गुरुजनांच्या💐 पायांवर माथा टेकवतो!नमन करतो!जीवनांता पर्यंत त्यांच्या ऋणात राहतो!त्यांच्या पावलांची धूळ मस्तकी लावतो!💐💐👏
*********************
....नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं.७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२०डिसेंबर२०२१
Comments
Post a Comment