किती रें विशाल रूप तुझे

किती रें विशाल रूप तुझे
🌹🌹🌹🌹🌹🌹
******************
..नानाभाऊ माळी
................….............

निळ्या आकाशी क्षितिज टेकले
किती रें विशाल रूप तुझे
दिवस निघता दर्शन देतो
नयनी तेजोमय रूप तुझे.....!

उजेड देऊनि अंधार करीतो
 सुंदरतेचा आरसा होतो 
हसरी हिरवळ देऊनि देवा
अस्तित्वाचा वारसा देतो.....!

वरती चंद्र हसत हिंडतो
चांदण्यासोबत फेर धरितो
सागराची अथांग लीला
तूच त्यात पाणी भरितो.....!


 नव सुखाचा आनंद पेरीत
अंकुर सृष्टीचा उमलत जातो
श्वास तुझा रें देतो आम्हा
धमनीतुनी जीवन वहातो......!

निळ्या आकाशी क्षितिज टेकले
किती रें विशाल रूप तुझे
दिवस निघता दर्शन देतो
तेजोमय विशाल रूप तुझे......!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
********************
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे
मो नं ७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-१७डिसेंबर२०२१

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)