क्रांतीज्योती_सावित्रीबाई_फुले
#पुष्प_१९वे
🌹#क्रांतीज्योती_सावित्रीबाई_फुले🌹
***********
.......नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
ज्ञान ज्योत घेऊन निघालेली!समस्त अज्ञानी समाजाला डोळस करणारी!ग म भ म चा पाढा शिकवणारी पहिली स्त्री शिक्षिका जीवनज्योती!शिक्षण ज्योती!ज्ञान ज्योती!....सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांच्या!..... ०३जानेवारीला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो!त्या प्रचंड रूढी परंपरांना विनम्रपणे लाथाडतं visionary शिक्षणाची कास धरत अखंड आयुष्य महात्मा फुले यांच्या वाटेने चालणाऱ्या महान समाजसेविका होत्या!💐💐
अज्ञानी समाजास डोळस करावयाचे असेल तर अंधश्रद्धाचं निर्मूलन झालं पाहिजे याचं ठाम मताने आयुष्यभर जगलेल्या थोर माता सावित्रीबाई फुले अखंडंपणे व्रतस्थ जीवन जगत असतांना तप्त तव्यावर,धगधगत्या निखाऱ्यावर चालत राहिल्या!अज्ञानाच्या अंधकारात ज्ञानाची दिव्य ज्योत होत राहिल्या!....समाज जागृती करीत राहिल्या!महात्मा फुले यांना साथ देत त्यांच्या नंतर देखील अखंडपणे प्रबोधन करीत राहिल्या!💐💐
व्यक्तीची बदनामी करायची असेल तर चार चौघात त्यांच्यावर हल्ला करा,निंदा नालस्ती करा, हीन कृत्य करा!शरमेने मान खाली जाईल असे काम करा!अशा वृत्तीवर,अशा सर्वांवर विजय मिळवत!सहनशक्तीच्या कसोटीवर स्वतःला झोकून दिलेल्या सावित्रीबाई यांनी समाज जागृतीचं व्रत पत्करलं होत!अंगावर चिखल-शेण झेलत अज्ञानी समाजाला शिक्षणाचं दार उघड करीत पुढेंच जात राहिल्या! तात्विक मूल्यांची जपणूक आयुष्यभर करीत राहिल्या!माघार शब्द त्यांनी आपल्यापासून दूरच ठेवला होता!अशा महान समाजसेविकेचा०३जानेवारी जन्मदिन आहे!दिव्य ज्योतीचा जन्मदिन!जयंती आहे!💐💐
स्त्री शिक्षणासाठी!समानतेसाठी !समाजकल्याणासाठी!आपलं उभं आयुष्य झिजविणाऱ्या पहिल्या भारतीय शिक्षिका सावित्रीबाई फुले या स्त्री असून देखील तत्कालीन परंपरावादी!रूढीवाद्यांच्या निखाऱ्यावर चालत राहिल्या!त्यावेळच्या रुढीवाद्यांनी स्त्री शिक्षण म्हणजे महापाप आहे असे पक्के मनावर रुजविले होते!बिंबविले होते!त्याला छेद देत!प्रतिकार करत फुलें दाम्पत्यानी ज्ञानगंगा घराघरात आणून सोडली!प्रचंड चिडलेल्या रूढी वाद्यांनी त्यांना समाजबहिष्कृत केले होते!....न डगमगता आपलं आयुष्य खर्ची घालत समाज जागृती,समाज प्रबोधन करीत राहिले!💐💐
स्त्री शिक्षणाची ज्योत पेटविणाऱ्या!स्त्री शिक्षणाच्या महान शिल्पकार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आहेत!विद्येची जननी आहेत!अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरुमाऊली आहेत!ज्ञानज्योति आहेत!उजेडाची पाऊले आहेत!तप्त उन्हातील सावली आहेत!सत्यशोधक आहेत!अज्ञान,दैववाद,अंधश्रद्धेच्या विरोधी आहेत!💐💐
ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांचं जीवन अपमान आणि संघर्षाने भरलेलं होत!परिवर्तनाची ज्योत पेटवलेल्या या दिव्याज्योतीस अखंड आयुष्य रूढी वाद्यांचा तिरस्कार सहन करावा लागला होता!तरीही बहुजनांचा उद्धाराचं व्रत फुले दाम्पत्याने घेतलं होतं!💐💐
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा लढा हा अज्ञाना विरुद्ध होता!अंधश्रद्धे विरुद्ध होता!कर्मठवृत्ती विरुद्ध होता!सामाजिक परिवर्तनाचा होता!सत्याच्या विचारांचा लढा होता!वास्तव दाखविण्याचा होता!संपूर्ण हयात हा लढा दोघेही लढत राहिले!शेण,चिखलास फुले समजून अंगावर घेत राहिले!रूढी वादी हसत राहिले!सावित्रीबाई पुढेंच चालतं राहिल्या!पुढे म्हणूनच सावित्रीबाईं संपूर्ण भारताची ज्ञानाई झाल्या!💐💐
जोतिबांनी लावलेली विद्येची ज्योत अखंडपणे तेवत ठेवणाऱ्या सावित्रीबाई फुले निर्भीडपणे सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत राहिल्या!पहिली स्त्री शिक्षिका म्हणून स्त्रीयांच्या मनाच्या प्रेरणास्त्रोत बनून राहिल्या!ज्योतीबांच्या कार्यास विस्तृत रूप देत आपलं आयुष्य झिजत खर्ची घातलं !त्यांचे विचार डोळस होते!अज्ञानीस उजेड दाखविण्याचे होते!अस्सल भारतीय होते!निर्मळ आणि वाहत्या झऱ्यासारखे स्वच्छ होते!प्लेगच्या साथीत स्वतः मदत करीत लढत राहिल्या!तात्विक सत्यशोधकी विचार घेऊन पुढे पुढे चालत राहिल्या!💐💐
सावित्रीबाई फुलेंना विद्येची माता म्हणतात!ज्ञानाई म्हणतात!प्रत्येकाच्या अंतकरणातील ममताई म्हणतात!प्रेरणाई म्हणतात!ऊर्जा म्हणतात...अशा या महान साध्वीने त्या काळात आपलं जगणं समाज उद्धारासाठी आहे हे जगासमोर दाखवलं!सर्व घरदार,पैसा अडका काहीही स्वतःजवळ ठेवले नाही!सर्व सत्यशोधकी कार्यासअर्पण केलेलं होतं!वास्तववादी जीवनास समर्पित केलं होतं!महात्मा फुलेंनी सुरू केलेलं वास्तववादी सत्यशोधकी तत्वज्ञान जनतेला कळावे हिच कळकळ सावित्रीबाई फुलेंची होती!नंतर शिक्षणतज्ञ म्हणूनही त्यांचं नाव घेतलं गेलं!शिक्षण नसेल तर माणूस आंधळा अज्ञानी राहिलं!वंचित समाज मागे राहील...पुढे शोषण होईल!लुबाडणूक होईल!रूढी वादी गुलाम बनवतील...असे त्यांना सतत वाटतं होतं!महात्मा फुलेंचा भक्कम पाया अजून मजबूत करावा म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाच्या चळवळीला आपलं आयुष्य मानलं होतं!बहुजनांसाठी,शूद्रांसाठी,स्त्रियांसाठी शैक्षणिक विचारांचे जाळे नव्याने विणले! समाज शहाणा करावे हेचं सावित्रीबाई फुलेंच जीवन बनलं होतं!💐💐
अत्यंत शुद्ध!आदर्शवत!अत्यंत निर्मळ!तेजस्वी!ममतामयी!समतावादी!पहिल्या भारतीय स्त्री शिक्षिका!सामाजिक परीवर्तनाच्या पुरस्कारत्या आणि प्रतिभावंत लेखिका...क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्रअभिवादन करतो!💐💐
🌺************🌺
........#नानाभाऊ_माळी
साहित्यसाम्राट-पुणे,हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं ७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०३जानेवारी२०२१
Comments
Post a Comment