अडगळ
🌹!!अडगळ!!🌹
----------------
...नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
मी नोकरीला लागलो आणि लागलीच सात आठ महिन्यात माझं लग्न झालं होतं!नंतर दुसऱ्या वर्षी दोन जीवांना रहायला पुरेल एवढं दोन खोल्यांचं घर बांधले होतें!मला पहिल्या वर्षी लग्नाचा आणि दुसऱ्या वर्षी बांधलेल्या घराचा ताण पडला होता!आर्थिक परिस्थिती बेताचीच होती!अर्थार्जनातूनचं ऐहिक सुख साधलं जातं असंत असं माझं मत बनलं होतं!संसारी संस्कार शिकत होतो!🌷
आपण दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत नाव टाकलेली असते!तिला वल्हविता यावे हिच शिकवण दिलेली असते!तेथे वाचविणारा धनी असतो..... माता पित्यांचे आशीर्वाद!त्यांचे संस्कार आणि साथ देणारी पत्नी!🌷
बंधू-भगिनींनो!
आपण संसाररुपी नावेचे नावाडी असतो!नाव वाहत्या लाटांवर तरंगत असते!नाव झोकांड्या घेत असते!मध्येचं एखाद्या दगडी बेटाला नाव धडकण्याचीही भीती असते!कसब पणाला लावून आपण पुढे जात असतो!नाव पुढे जात असतें!सुखी सुंदर फुलांचें बगीचे नजरेच्या टप्यात येतं असतात!सुगंधी फुलांची दरवळ मनाला मोहीत करीत असते!तर कधी दुःखाचे आडदांड डोंगर विकट हास्य करीत आडवे उभे येतं असतात!जगणे नकोसे करीत असतात!डोक्यावर बर्फाचा तुकडा ठेवून संकटाला तोंड देत जगणे!तडजोडीचं उत्तम सार काढितं संसार सुखावह करायचा असतो!🌷
आम्ही ही उभयतां प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाईंच्या पिठाची भाकर रांधून तप्त तव्यावर भाजीत होतो!चटका घेतहोतो!पुढे चाललो होतो!भूतकाळाला अडगळीत टाकून वर्तमान जगत होतो!भविष्याचा वेध घेत जगणं सुंदर करीत होतो!🌷
सुखाची!आनंदाची झाडे जगवीत असतांना आपल्या घरातही खट्याळ नटखट .....कान्हा रांगत घरी आला होता!सुखाची व्याप्ती वाढली होती!काही वर्षांनी पुन्हा लक्ष्मीने प्रवेशद्वारातून मुक्तहस्ते! स्मितहास्य वादनाने ...बालरूपात घरात प्रवेश करती झाली होती!दोन्ही हातांच्या कवेत बसणार नाही एवढं सुख घरातल्या कणाकणात!कानाकोपऱ्यात नांदत होतं!सुख ताटात वाढलेलं होतं!लक्ष्मी पावलांची आठवण रहावी म्हणून!घराला घरपन असावं म्हणून!... लाकडी दिवाण ही बनवून घेतले होतें!🌷
बंधू-भगिनींनो!
फरशीवर चादर टाकून!गोधडीची ऊब घेत!दररोज मस्तपैकी..बेफिकिरीनें बैल विकून झोपेत घोरणारा....चक्क--चक्क दिवाणवरील गादीनें अंग दुखतंय असं सांगू लागलो होतो!सुख भरभरून येत असतं!सुख आनंदाने नाचत असतं!सुख हसरे फुलं असतं!कान्हासारख नटखट असतं!घरभर नाचत असतं!सुख पाण्यावरील बुडबुडा असतो!मग.. मग गादीवर झोपतांनाही अंग दुखेपर्यंत प्रेम मिळतं असतं! शेवटी काय....सुख खट्याळ असतं!
🌷🌷🌷🌷🌷🌹🌷🌷🌷🌷वर्षामागून वर्षे लोटली!मुलं मोठी झालीत!मनाने!तनाने!ज्ञानाने खरोखरचं मोठी झालीत हो.........!आपण ओझी वाहतचं जगलो!काळ आपल्या संयमित चालीने पुढे सरकतं असतो!मुलं कधी मोठी झाली कळले देखील नाही!आपण अनेक संकटांना, प्रसंगांना तोंड देत!...आव्हानांचां सामना करीत येथवर येवून पोचलेलों आहोत!चटणी,मीठ-भाकरी पुरणपोळी सारखे गोड करीत!.. पोटाची भूक शांत करीत जगणारी आमची पिढी!पोट अन जगणं शोधण्यातचं काळ संपवला आम्ही!...🌷
आपल्या घरातल्या कोपऱ्यात अनेक वस्तू पडलेल्या दिसतात!जुन्या असल्या तरी कुठेतरी नाळ जोडली गेलेली असते!मन जोडले गेलेले असतं!जुन्या आठवणींचा खजिना असलेल्या त्या वस्तू.... !...विकत घेतांना तेव्हा शंभर वेळा खिशाला विचारावे लागलें होतें!खिसा नकार देत असतांना देखील सुख पदरी पाडण्यासाठी .....त्या वस्तू विकत घेऊन घराची शोभा वाढविली होती!🌷
घरातल्या सुंदर नक्षीकाम केलेल्या वस्तू दररोज घरात आल्यावर आपल्या स्वागतास तयार असतात!आपण आनंदित होतं असतो!.....पण आता काळ बदलला अन modernisation च्या नावाखाली आपण ही बदलतं चाललो आहोत!त्याचं जुन्या वस्तू घरातल्या एका कोपऱ्यात निर्जीव अवस्थेत घटिका मोजत पडलेल्या असतात!भंगारवाल्याची बोलावणे येई पर्यंत पडलेल्या असतात!कोपऱ्यातल्या त्या वस्तू पाहतांना मन हळहळतं असतं!त्या वस्तूंची गरज संपलेली असेलही!मुलांच्या दृष्टीने त्यांची किंमत नगण्य असेलही!बदल आणि तडजोड स्विकारत आमच्या सारख्या जुन्या पिढीने वाहणाऱ्या नव्या वाऱ्यासोबत वहात राहिले पाहिजे हे मान्य आहे!नेहमीचं एक पाऊल मागे येतं मी मनाची समजूत काढीत असतो!घराला घरपन येण्यासाठी जिवंतपणा असावा लागतो!प्रत्येकाची मन सांभाळीत वाटचाल सुरूच असतें!🌷
…......पाच-सहा दिवसापूर्वी मुलगा बोलला,"बाबा!मी दोन-तीन वर्षांचा असतांना आपण सुतारा कडून दिवाण बनवून घेतला असेल!आज मी बत्तीस वर्षांचा झालो आहे!तोच दिवाण नजरेला दिसतोय हो!तो बदला आता!नवा आणूयात!"मुलगा त्याच्या जागेवर बरोबर होता!मी जुन्यातं गुरफटलो होतो!जीव अडकत होता!नातू चार वर्षाचा आहे!तो ही फक्त हसत होता!त्याच्या पप्पांच्या सुरात सूर मिसळत होता!पुढील पिढीचा संदेश देत होता!🌷
.....कालचं मी मित्राकडे गेलो होतो!त्याच्या घरी खूप वर्षांनी गेलो होतो!गप्पा टप्पा झाल्या!हॉलमध्ये बसलो होतो!...मध्येच त्याच्या वडलांची आठवण झाले म्हणून विचारले,"अरे आप्पा दिसत नाहीयेत!आहेत कुठे हल्ली?"मित्राच्या चेहऱ्यावरील भाव काहीतरी अगम्य सांगत होते!तो म्हणाला,"हो आप्पा आतल्या खोलीत आहेत!थकले आहेत रे ते!"मी उत्सुतेपोटी त्यांना आतल्या खोलीत पाहायला गेलो! पाहून माझे मन चरकलेचं!नेहमीचं उत्तम तब्येत सांभाळून इतरांना आनंद देणारें!मार्गदर्शन करणारे आप्पा आज खाटेवर असाह्य पणे पडले होते!वय झालं होतं पण इतकही झालं नव्हतं!त्यांची ती असाह्य अवस्था माझ्या मनाला दुःखाची संवेदना देऊन गेली!🌷
बंधू-भगिनींनो!
ज्या वस्तूची!व्यक्तीची सेवा संपली आहे!ऊसाचा चोथा झाला आहे!ती फेकून देत असतात नाही तर अडगळीत टाकली जात असते का?वय झाल्यावर सन्मानाने!आनंदाने!जगत असतांनाचं आयुष्याचा सद्गदित समारोप करायचा असतो!पैल तिरीचा किनाऱ्याला लागायचं असतं!मनाची खिन्नता मनालाच विचारीत होती!मी ही भावी अडगळीतील वस्तुरूपी व्यक्ती तर नाही नां?मग माझ्यावर झालेल्या संस्कारचं काय?मी स्वतः केलेल्या संस्कारांचं काय?आज मीचं मला विचारतो आहे!आम्ही उभयतां ९६वर्षीय आईच्या पायांवर डोके ठेवून बसलो होतो!आईच्या आमच्या डोक्यावरील थकलेल्या हस्तस्पर्शानें!आशीर्वादाने! तिच्या पायांवर आमच्या डोळ्यातील अश्रुंचे कोमट थेंब पडत होते!आम्ही सद्गदित झालो होतो🌷
🌹--------------------🌹
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२६मे२०२१
Comments
Post a Comment