सुखाच्या जवळी
#PoetMeNotLeave
*सातवी कविता *
प्रिय काव्यरसिकहो,
#PoetMeNotLeave या उपक्रमात सहभागी होण्याकरिता माझे नाव *कवि/लेखक/गितकार/गझलकार -विजय व्ही.निकम,
धामणगावकर, चाळीसगांव* यांनी सुचवले व मला नामांकित केले त्याबद्दल मी त्यांचा अंत:करणापासून ऋणी आहे. या काव्य-मॅरेथाॅन मधील कविता रशियन अलमॅनक मध्ये प्रकाशित होणार आहेत.
आज मी माझी सातवी कविता-' *सुखाच्या जवळी*' पोस्ट करत आहे. हि मराठी कविता मी स्वत: भाषांतरीत केली आहे. या काव्य-मॅरेथॉनची साखळी पुढे सुरु ठेवण्यासाठी मी लेखक/कवि आदरणीय श्री.ह.भ.प.बडधे महाराज,हडपसर, पुणे,यांना आमंत्रित करीत असून त्यांचे नामांकन करत आहे. त्यांना मी विनंती करतो की, त्यांनी पुढचे आठ दिवस दररोज स्वत:ची मुळ कविता व तिचे इंग्रजी भाषांतर येथे आपल्या छायाचित्रासह प्रकाशित करावे. आणि हे काव्य-मॅरेथाॅन सुरु ठेवण्यासाठी दररोज एका कवीचे नामांकन करावे.
कवी
नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे
Dear Poetry Lovers
*Vijay V.Nikam, Dhamangaonkar,
Chalisgaon* eminent poet has suggested my name for this #PoetMeNotLeave poetry marathon. He nominated me to participate in this poetry marathon. I am very grateful for this nomination. These compositions will be published in Russian Almanac.
Today I am submitting my 7th poem *Near Happiness*
with its English translation. I have translated this by my own.
To continue the chain of this poetry marathon I nominate eminent Writer, poet Shri.H.B.P.Badadhe Maharaj,Hadapsar,
Pune and request her to continue this for eight days by publishing original composition with its English translation and nominate a poet/ poetess everyday.
🌹सुखाच्या जवळी🌹
********
झोप येईना रात्री मजला
काळजी बंगला गाडीची
आनंद हिरावूनि गेलो दूर
चिंता सलते माडीची.........!
आहे काय माझ्या जवळी
तोंड देखल्या सुखी मी
गाड्या बंगले आहेत माझे
सोडोनि एकदा जाईन मी.
पैसा पैसा करतोय रोज
पैसा पुढे पळतो आहे
झोप येईना रात्री मजला
आतुनी रोज जळतो आहे....!
आहे काय माझ्या जवळी
सुख सोडोनि सर्व काही
पेन कागद घेऊनि हाती
आरशावरती लिहिते शाई...!
पळुनी थकलो आता थांबलो
सुखाजवळी आलो मी
माझे माझे सोडूनि आता
माणसा जवळी गेलो मी.....!
🌹*********🌹
…...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं.७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०९नोव्हेंबर २०२०
🟢🔴🟢🔴🟢🔴🟢
Comments
Post a Comment