माळी समाजाचा वधुवर मेळावा
काल दिनांक२८नोव्हेंबर रोजी माळी समाजाचा वधुवर मेळावा भोसरी,पुण्यातील अंकुशराव लांडगे सभागृहात संपन्न झाला!
मेळाव्या बद्दल ऋण व्यक्त करीत आहे!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आदरणीय!...मानानिय!हृदयस्थ!...सर्व आप्तजन जेष्ठ श्रेष्ठ !समवयस्क तथा काहीजण माझ्या पेक्षा वयाने लहान असतील ही पण मार्गदर्शक!सल्लागार असणारे माझ्या बंधूंनो!....आजचा दिवस जणू पंढरपुरातील जमलेल्या भक्तांचा होता!..वधुवर मेळावा म्हणजे पंढरी!...आपण श्रद्धापूर्वक अतिशय हृदयातून मेळाव्याची सेवा केलीत!..काय बोलू आपल्या आपल्या सेवेबद्दल??...एकजुटीने!एकदिलाने!पळापळी करून आपण मेळावा यशस्वीपणे पार पाडला!🌹🌹
....आपल्या या एकजुटीची व्याख्याचं करता येणार नाही!आपल्या कष्टाचं उत्तम फळ म्हणजे बाहेर गावाहून आलेल्या लोकमुखी शब्दांचे सुंदर फुलं स्वीकारीत होतो!..लोकं भरभरून कौतुक करीत होते!बंधूंनो! एकता यशोबीजमची प्रचिती पावलोपावली अनुभवत होतो!...आपण एकदिलाने केलेले कार्य सतत इतिहास दखल घेत राहील!...🌹🌹
संध्याकाळी अंकुशराव लांडगे सभागृह सोडतांना डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर येत होते!...आपल्या एकमुठी शक्ती मनस्वी आनंद देत गेला!..समाधान देत गेलं!...आपलं गाव सोडून पुण्यात आपण येऊन एकजुटीने कार्य करतोय!आपलं ऋण हृदयाला सांगतंय भिन्न विचारांची एकजूट!एकमुठ आहे!सर्वंच बंधूंचं! आभार मानतो!🌹🌹
खान्देश माळी मंडळ संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेलं मंडळ आहे!...१९९९साला पासून!..संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री एस के माळी साहेब आणि तद्नंतर आदरणीय श्री पी के महाजन साहेब यांनी आखून दिलेल्या आदर्श आचारसंहिता पाळून आम्ही कार्य करीत आहोत!🌹
...मंडळाचे सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांचे!..कार्यकर्त्यांचें!कार्यकारणी सदस्यांचे!वधु-वर समितीच्या सदस्यांचें नतमस्तक होत आभार व्यक्त करतो!...अशी साथ संगत बंधू प्रेमाचे द्योतक आहे!...आपल्या सर्व बंधूंचे आभार मानीत असतांनाच आपल्याच ऋणात रहातो!
🌹🌹🙏🙏😌😌
अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव, संपूर्ण कार्यकारी संचालक मंडळ,वधू-वर समिती अध्यक्ष आणि सदस्य, आजी माजी पदाधिकारी समाज बंधुकडून
ऋण व्यक्त करतो
🌷🌷🌹🌹🌹
....नानाभाऊ माळी, अध्यक्ष
Comments
Post a Comment