मी तुलाचं शोधितो आहे
#पुष्प_३२वे
🌹मी तुलाचं शोधितो आहे🌹
-----------------------------
...नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो नमस्कार!
ईश्वर नावाचा जीवसृष्टी निर्माता........ जोडतो!मोडतो! अन घडतो देखील!उन,वारा,पाऊस त्याचीच रूपे आहेत!सूर्य,चंद्र अन तारे यांच्यात तो आहे!आई,वडील अन गुरु रुपात दर्शन देत असतो!कणाकणात तो सामावला आहे!प्राण्यांमध्ये त्याचं अस्तित्व आहे!झाडा झुडपात आहे!हसऱ्या कळ्या फुलांमध्ये तोच आहे!लता वेलींमध्ये आहे!चराचरात कर्म रूपाने अस्तित्व आहे!हे विश्व त्याची निर्मिती आणि रूप आहे!🌷
ईश्वर प्रत्येकाच्या रुपात दिसतो आहे!......फक्त रुपात दिसतो आहे!साक्षात्कार झाला नाही अजून!!ईश्वर कसा आहे?कसा दिसतो!त्याचं स्वरूप!आकार! उकार!काही असेलच त्याचं!देहधारी आहे का निराकार आहे?श्रद्धेतून त्याची रूप वर्णिली जातात!....... ईश्वर भेटीची आस मनाला लागून राहिली आहे!कसा आहेस ईश्वरा तू?...डोळे असून आंधळा झालो आहे मी!कर्म रुपात सामावलेला आहे!पण सांग जरा तू दिसतोस कसा रें!....सांग नां जरा!तुझ्या विरहात मी वेडा झालो आहे!तुझ्या दर्शनासाठी व्याकुळ झालो आहे!................🌷🌷🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🙏
"...🌹🌷बालपणापासून पळतो आहे मी!पाठीमागे वळतो आहे मी!शोध तुझा घेतो आहे!ज्याच्यासाठी लढतो आहे!....मज ते ठिकाण गवसले नाही!मन अधीर झाले माझे!मी त्यांस शोधतो आहे!ते पुढेच पळतं आहे!अतृप्तीचं लाकूड होऊन मनात जळतं आहे!दिसतोस कसा तू सांग जरा!🌹
माझ्या मनास भूक आहे!इंद्रियांना धाक आहे!चाक पळतय मनाचे!तरीही अंतकरण व्याकुळ आहे!तृप्तीसाठी माझी व्याकुळ हाक आहे!तू कुठे झोपलेला आहे!अनुभवाने वाकलेला आहे!पूर्ण आकाशी तू झाकलेंला आहे!तुझ्याच भेटीसाठी मी माखलेंला आहे!जरा जाण मनोवस्था माझी!तुझीच आस्था घेऊनि हृदयी वियोगात जळतो आहे!🌹
"कुठे शोधू सांग मला रे
का रूप दाखविले नाही
जन्मापासुनी शोधित आलो
मज दर्शन दिलेचं नाही....!
दूर दूर धावत सुटलो
माझा देह थकूनि गेला
कुठे शोधू सांग मला रे
हा देह वाकुनी गेला......!
नाही कळला जन्म मजला
तुझी आस ठेवुनी आहे
वाल्या बनूनी जगणे माझे
सोबत लूट घेवुनी आहे......!
का जगणे व्यर्थ माझे?
तू अजुन कळला नाही
सांग मजला आता तरी रे चमत्कार दाखव काही...!"🌷
कधी दिसतो बाजारी!हाती घेऊनि बांसरी!तुला बांधीतो हृदयी मी! मन झाले ओसरी!कुठे राहतोस सांग जरा?कुणा गेलास आसरी!बालपणी मी तूला पाहिले!हाती घेऊनि बांसरी!.....तू हसरे गीत गायिले!कधी हसविले!कधी रडविले!मज मायेने बांधीले!स्वार्थी दिवस जाता जाता मज आई देऊनि गेला!सांग जरा तू कोण आहेस मी तुला नं पाहिला!🌷
ममतेच्या कुशीत राहून तुला आई देही पाहिले!जीव लावीत ती... तुझी ओळख करीत राहिले!ओळख पुसटशी आहे मज!माझ्याशी गप्पा मारीत होता!चार महिन्याचा देहापासुनी शब्द चोरीत होता!खळखळून हसतांना तुझं रूप दाखवीत होता!हळूहळू तू दूर गेलास!माझे रडणे स्वार्थी झाले!आईच्या कुशीत तुला शोधित दिवस निघूनी गेले!🌷
"कोण आहेस सांग मला रे
मी भ्रमित झालो होतो
आईच्या कुशीतुनी मी
मागे रांगत गेलो होतो....!
चालू लागले पाय माझे
तुला शोधित पुढे गेलो
उचलुनी घेतले आईने
आपण दूर दूर झालो....!
बोट धरूनि शाळेत गेलो
तेथे गुरुजी शिकवीत होते
'ग म भ' अक्षरं गिरवीत
बोट शब्द वाकवीत होते.....!
तुला शोधिले गुरुजनात
मज डोळस करुनि गेले
विद्या ज्ञानी झालो होतो
हृदयी अमृत भरुनी झाले.!"🌷
तुला शोधित शोधित मी मध्येच गहाळ झालो!प्रेमाराधानेत संसाराच्या पुरता गाळ झालो!काळ शोधित आला तेव्हा वर्षे सरली होती!नव्या जुन्यांचे पात्रे तेथे सभा भरली होती!हिशेब चुकता करण्याची तारीख धरली होती!तुला शोधित तेथे आलो!तू लपुनी बसला होता!दोघांमध्ये तेव्हा रें "दो गज का फासला होता!"मन व्याकुळ झाले माझे!तू असे कसे रें केले!तू कसा आहेस डोळ्यांनां रूप दिसेना मला!🌷
का लपुनी बसला आहे?मजवरी रुसला आहे?तुझ्या रूपात पाहुनी माणूस खळखळून हसला आहे!.....कित्येक दिवस गेलेतं!जीवनी पाणी भरले आहे!तुला पाहण्या आतुर झालो दिवस थोडेचं उरले आहेत!.....संकटात सापडलो होतो!हतबल झालो होतो!तुझेचं रूप आठवुनी मी बाहेर पडलो होतो!आहे कुठे रें सांग जरा मी कसा घडलो होतो! चराचरात असतो तू!चैतन्य स्वरूपी असतो तू!🌷
"वाहत्या नदीत पाहिले
खळखळूनि हसत होता
नागमोडी वळणे घेत
धबधब्यात बरसत होता...!
विशाल रूप तुझे रें
सागर मी पाहिला....
दूर आकाश टेकला
सांग कोणी देखिला?.....
मी मातीत लोळतं होतो
खोदीत शोधीत होतो
घामाने थकलो होतो
मी झालो बोधित होतो.....
तुझ्या जवळी पोहचून
डोळ्यांत शोधित होतो!
गाळणीत चाळून तुला रें!
कोंडाचं रांधित होतो!"🌷
तुझ्याचंपाठी लागून माझे भाग्य पाहिले रें!तू शब्दांचा भुकेला आहे?पुढे पुढेंच पळतो आहे!तू साक्षात्कारी आहे?का स्फूर्तिदायी आहे?चैतन्यस्वरूप तुझे रूप मी अजुन ही पाहिले नाही!सगुण निर्गुण आहे?का आहे निराकार तू!तुझे मंदिर बांधिले आहे!हृदयीं बसविले आहे!मस्जित,मंदिर गुरुद्वारी डोळ्यांत पाहिले नाही!सांग आता रें रूप तुझे मज कसे दसते आहे?🌹
चर्चची घंटा वाजली होती!शांत निवांत बसलो होतो!डोळ्यात साठवून तुलाचं शोधित भटकत गेलो होतो!तुला भेटण्या अधीर झालो होतो!तू डोळ्यात बसला नाही!असा कसा रें वेड लाविले मज डोळ्यास दिसला नाही?तू स्वप्नात आला नाही!मज आशीर्वाद दिला नाही!थोडा नास्तिक झालो होतो!तुलाच चिडवीत होतो!तू हसला असेल कदाचित!मग दारोदारी गेलो!🌷
मी रोज पळतो आहे!थोडा मागे वळतो आहे!कधीतरी,कुठेतरी अघटित घडलें आहे!माणूस अपघाताने जिवंत भेटला आहे!श्रद्धेतून तू तेथे मज माणसात भेटला आहे!थेट इस्पितळात गेलो!जगण्यासाठी माणसे तुला डॉक्टर समजतं होते!मी पुढे पुढे गेलो!तुझा आकार पाहिला होता!डॉक्टर हसत राहिला होता!थोडा आस्तिक जवळी गेलो!आस्तिकाशी भेटलो!हे विश्व निर्माता तुझीच निर्मिती मी तुलाचं शोधितो आहे!तुलाच वंदितो आहे!डोळयातुनी टिपण्या तुझे रूप मी आतुर झालो आहे!व्याकुळ झालो आहे!तुझ्या दर्शनासाठीची मज आस लागली आहे!🌷
🌹--------------------🌹
....#नानाभाऊ_माळी
लेखक, कवी
(साहित्यसम्राट)
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०२ मे २०२१
Comments
Post a Comment