उभ्या आडव्या भिंती!

🌹!उभ्या आडव्या भिंती!🌹
  🌷--------🌹--------🌷
...नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!
आमच्या नात्यातील आजोबा-आजींची चार मुलं होती!चौघेही कर्तृत्वान होती!शेती भरपूर होती!चौघही मुलं वाघासारखी होती!हत्ती सारखी होती!कर्तृत्ववान होती!गावात मानमरातब होता! आजोबा-आजीनां आपल्या मुलांच्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान होता!चौघांची लग्न झालेली होती!सुना लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या होत्या!त्या एक दुसऱ्यावर स्वतःचा जीव ओवाळून टाकणाऱ्या होत्या!एक दुसऱ्याला टाळून जेवन सुद्धा करीत नव्हत्या!चौघींना मुलंबाळ होती!अर्थात आजोबा-आजींना नात-नातवंड होती!सुख उदार अंतःकरणाने आनंद नांदत होतं!सढळ हाताने सर्व काही देत होतं!
गावात कोणीही हितशत्रू नव्हते! गावातील एक आदर्श कुटुंब म्हणून त्यांच्या घराकडे बोट दाखवीलें जात असे!🌹

 श्रद्धेसोबत विश्वास.... सुखाला नांदवीत असतो!विश्वास सर्वांचा सखा असतो!विश्वास मनामनातं ला श्वास असतो!अंधार दूर करीत असतो!मन काचेसारख असतं!पारदर्शक असतं!मात्र काच खाली पडायला नको!प्रतिमेला तडा जायला नको!मन जोपासता आलं पाहिजे!...विश्वास काचेसारख मनाला स्वच्छ करीत असतो!काच तुटली-फुटली तर तिची किंमत शून्य होऊन जातं असते!काच तुटल्यावर तिचे अणकुचीदार तुकडे अतिशय घातक असतात!माणसाच्याही विश्वासाला तडा गेला तर विश्वासघात म्हणतात!जोपासलेल्या श्रद्धेवर कायमचाच आघात होऊन बसतो!नातेसंबंध विश्वासावर टिकून असतातं!चार भावांची वज्रमुठ म्हणजे चार वाघांच्या पंज्यांची शक्ती होती!कोणीतरी रात्र-पहाटे त्यांच्या घरावर दगड मारला!काच तडकली!अन...फुटली देखील!..चारही वाघ एकमेकांवर गुरगुरायला लागली!एकमेकांचा गळा धरू लागली!गावातला विश्वासरूपी आदर्श कुठल्यातरी आघाताने रक्तबंबाळ झाला होता!

आजोबा-आजींचं घर म्हणजे प्रशस्त असा मोठा वाडा होता!गावात कोणाचाही नसेल एवढा मोठा होता!येणाऱ्या जाणाऱ्यांचं हमखास स्वागत व्हायचं!...दूध नाहीतर चहा तरी मिळायचा!चौघी घरलक्ष्मी वाड्याच्या पवित्र तुळस होत्या!संस्कार वृंदावनात सुखावल्या होत्या!त्यांच्या पवित्र सानिध्यात चंदनाचा सुवास येत होता!सासू-सासरे त्यांचे जणू आईवडीलचं होते!....पण...पण आनंदाच्या!...सुखाने तुडुंब भरलेल्या सागरात कोणीतरी मीठ टाकले होते!अखंड सागर मिठागर झाले होते!अन मिठात नाते गोडवा शोधत होते!.... देवत्वाच्या भिंतीचा पाया खचला होता!विश्वासरुपी अखंड भिंत कोसळली होती!चौघी सुना स्वतंत्र... स्वार्थाच्या निर्जीव भिंती बांधीत होत्या!चार स्वतंत्र घराच्या चार भिन्न भिंती बांधीत होत्या🌷

नेहमीचं शुद्ध!निर्मळ!आल्हाददायक वाहणारा वारा वाड्यात गुदमरतं होता!वाड्याची अखंड भिंत कोसळली होती!वाड्यात भिन्न चार भिंती उभ्या राहिल्या होत्या!चार चुली लाकडं जाळीत होत्या!आग ओकीत होत्या!नव्या भिंती स्वतःचं अस्तित्व शोधित होत्या!कर्तृत्वाचं गीत गाणारा वाडा वेदनेचा आलाप लावीत बसला होता!बेसूर झाला होता!एकतेची...एक विचारांची अखंड भिंत कोसळून नातेसंबंधांना बेगडी रूप आलं होतं!🌷

मनात श्रद्धा असेल तर विश्वास नावाची नातीगोती जन्माला येत असतात!कुटुंबात कितीहीजन असू द्यात हो!...पणजोबा-पणजी!आजी-आजोबा!आई-वडील!....ही मंडळी घरातील मनामनातल्या भिंतीचा पाया असतातं!हा भक्कम पाया आपल्यावर नितीमूल्यांचा संस्कार करीत असतात!घराला घरपन असतं!एकमेकांत प्रेम असतं!माया असते!नाते अतूट असतात!भक्कम पायाची भिंत अनेक वादळ सहन करीत ताठपणे उभी असते!भिंत मजबूत असेल तर नात्यांमध्ये जिव्हाळा असतो!🌷

चुली वाढल्या कि भिंती वाढतात!स्वयंपूर्तीने उभ्या केलेल्या भिंती नातेसंबंध टिकूवून ठेवत असतात!...बळजबरीने उभ्या केलेल्या भिंतीच्या आत कुटून- कुटून मत्सर भरलेला असंतो!नाते तुटत जातात!भिंत ढासळत जाते!मनाला देखील उभ्या भेगा पडत रहातात!घरात जेष्ठ नसल्याने सांधनारा ही कोणी नसतो!🌷

भिंत उज्वल भविष्य दाखविणारी असतें!नुसतीच जोडलेल्या नात्यांची नसतें!मजबूत मनाची भिंत अभेद्य असते!तेथे कुविचारांना थारा नसतो!..त्यांचा कपाळमोक्ष होत असतो!सद्विचारांच्या मजबूत मनाच्या भिंती माणसं जोडून ठेवण्याचं महान कार्य करीत असतात!एका घराची चार घर झाली तरी मन एकमेकांशी घट्ट सांधलेली असतात!....केवळ अर्थार्जनासाठी दोनच्या चार भिंतीं झाल्या तरी हृदयाने सांधलेली असतात!त्यांच्यातला सलोखा माणूसपण जपणारा असेल तर त्या भिंती देखील मजबूत असतात!स्वार्थाच्या भिंती पाडून हृदय जोडणाऱ्या माणसातील माणूस शोधणाऱ्या भक्कम भिंती बांधायला पाहिजे!जेष्ठांच्या आदर्शांवर उभ्या असलेल्या भिन्न भिंती समाज मन जोडण्याचं!देश जोडण्याचं महान कार्य करीत असतातं!अशा भिंती बांधत राहू!अखंड मानव समाज जोडत
राहू!आडव्या झालेल्या भिंती उभ्या करू!जीवन सुखमय बनवू!
--------------------------
🌷🌷🌷🌷🌷🌷
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-०१जून२०२१

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol