झेप तिमिरातुनी

🌷झेप तिमिरातुनी🌷
              -----------------------
....नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो नमस्कार!
जिकडे पहावे तिकडे फुलांचे बगीचे दिसत आहेत!भिन्न रंगी!लहान मोठी हसरी फुलंतं आहेत! मना मनाला सुंदर फुलं मोहवून घेत आहेत!सप्तरंगी इंद्रधनुष्य तादात्म्य झालेलं आहे!छोट्या-मोठ्या हसऱ्या फुलांनी वाऱ्यासोबत खेळ मांडला आहे!संपूर्ण काश्मीर आणि स्विझरलँड जणू बागेत हुंदळतं आहे!🌷

बगीच्याला लागूनच नदी वहाते आहे!....स्वच्छ आणि निर्मळता घेऊन नदी खळाळते आहे!चौफेर प्रसन्न वातावरण पसरले आहे!सुखाचा स्वर्ग खाली उतरून आला आहे!स्वतःला सुखाच्या! आनंदाच्या!निसर्गाच्या नयनमनोहर सानिध्यात झोकून द्यावेसे वाटतं आहे!गार हवेत झोकून द्यावेसे वाटतं आहे!बस्स मनसोक्तपणे जगून घ्यावेसे वाटतं आहे!उधळून द्यावेसे वाटतं आहे!जगणं सुंदर आहे जगून घ्यावेसे वाटतं आहे!मन तृप्तीच्या या विहंगम दृश्य दृश्यातं एकजीव व्हावेसे वाटतं आहे!विलीन होऊन जावेसे वाटतं आहे!🌷

मन चंचल आहे!नुसतंच उधळत आहे!घोड्यावर बसून सारा स्वर्ग न्याहाळत आहे!स्वर्गास आणावे खाली!त्याची विचारूनि घ्यावी ख्याली!तुझेचं कमळ!तुझांच चाफा!सोबती गुलाब कळींचा ताफा!या बगीच्यात एकत्र खेळताहेत!डुलताहेत!नाचताहेत!वाऱ्यावर बागडताहेत!प्रत्येक सुगंधित क्षणांचा आनंद घेत आहेत!....🌷

स्वर्गावरूनी घोडं उधळले!....सरळ जमिनीवर घेऊनि गेले!उष्ण लाटांच्या तरंगावरती जीव तडफडून लागला,
वाळवंटी उष्ण राजस्थानी रेती चटके देत होती!उभं घोड खाली बसलं होतं!रेतीत गाडले जाऊ लागलं!उष्ण वादळ रेती घेऊन येत होतं!रेतीत मान सोडून घोड गाडले जाऊ लागलें!मातीतून उठता येईना!जीवाची तडफड! जगण्यासाठी तगमग!अन... अन जीव जाणार...... तितक्यात तडफडून!जिवाच्या आकांताने जाग आली होती!अंगाला दरदरून घाम फुटला होता!......एक विचित्र!अनामिक स्वप्न होतं ते!......🌷

स्वप्न आनंद घेऊन येत असतात!दुःखाच्या शेजारी उभे करीत असतात!स्वप्न कधी साकार होतं असतात!....कधी भंग होत असतात!स्वप्ने जरूर पडावीत!ती साकार होतानां सकारात्मक उद्धिष्ट डोळ्यासमोर स्वप्नासंगे तरळत असावी!स्वप्न काट्याकुट्यातून वाट काढीत सुंदर राजमहाली नेत असतातं!स्वप्न उड्डाण घेत असतात!उंच भरारी घेत असतात!आकाशाकडे झेप घेत असतात!अनवाणी पायांनी काट्यावर चालतं!रक्ताळलेली पाऊले हळूहळू फुलांच्या गालीच्यावरून पुढे जात असतात!तेथून निघून राजमहाली!सुखमंदिरी विसावलेली असतातं!स्वप्ने साकार झालेली असतात!पायाखाली टोचणारे काटे सुंदर, मऊशार, सुगंधित फुलं झालेली असतातं!🌷...…...!!!!!

अशाचं एका ध्येयवेड्या मित्राची आठवण झाली!नाव आहे"भिला पाटील"......

"काट्याकुट्यावंर चालणे
फाटक्याचा धर्म होता!
 गाव वेशीवर टांगलेला
  गरिबीचा धर्मा होता...!

 झोपडीचा आसरा हा
मज ठेवियले काय येथे
बुद्धिदाता विद्यादाता
मज भेटलेतं रोज येथे....!

रोज विस्तवावर चालणे
.......उन तेथे थांबलेलें
  आधार शोधू कुणाचा रे
 तेथे काटे उरी झोबंलेलें....!"

बंधू-भगिनींनो!
जेथे राहायला घर नाही!पोटाला अन्न नाही!आई-वडिलांना गुरंढोर बांधण्याच्या जागी रहायला जागा मिळालेली होती!झोपडीवजा घरात अंग टाकायला जागा होती! ज्यांच्याकडे तिन्ही काळांनी पाठ फिरवली होती!अशा आकाश फाटलेल्या!पण आदर्श आधार भेटलेल्या गरिबीतील सुगरणीची साथ होती!..🌷
 
"न मागे भूतकाळ होता
सांगण्यास वर्तमान नव्हते
 दूर मागे अंधकार होता
भविष्य कोणी लिहिले होते?..!

 उभी काटेरी झोपडी ती
सावलीचा आधार होता
टोचणारे काटे तेथील
आमुचा पहारेदार होता.....!

होती न पत शिल्लक तेथे
मागे पुढे अंधार होता
ऊन पावसाळे सोबतीला
 शब्द ही तेथे गद्दार होता..!"

बंधू-भगिनींनो!
"भिला"हा शब्द अनेक अर्थ सोबत घेऊन चालला आहे!...कधी भिलावा होतो!...तेल अंगावर पडलं तर जखम होते!"भिला" तत्कालीन भिल्ल परिवारातील व्यक्तीने नाव ठेवले असेल!...पण 'भि'पासून भीम समजू या!...त्याला त्याची पराक्रमाची जाणीव करून देण्यासाठी त्याच्या मनात 'ला'गलेला वनवा असावा!"शब्दांची वानवा थांबली तर भिला"दारिद्र्याचा उद्धारकर्ता आहे असं मी समजतो!"भिला पाटील" हे नाव काटेरी कुंपणावर सुद्धा कोरले गेलेले नाव असावे!तळपाय हेचं चप्पल होऊन चालणे त्याचे काम होते!काट्याकुट्यातून वाट काढीत भिला पाटील नाव झाले!🌷

"काटे वेचिता वेचिता
गेलेत दिवस अन रात्र
न राहिले काटे तेथे
फुलें अंथरली सर्वत्र...!

भिमासम तेजाळला रे
जीवनाला अर्थ दिला
ठिगळलेल्या आकाशाला
शिवूनि भिलार्थ झाला.....!"

भिला पाटील यांच मूळ गावं कापडणे जि धुळे!...निराधार ओळख घेऊन जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील लहानशा झुरखेड्या तं नातेवाईकांच्या गुरांच्या गोठ्यात बालपणीच संगोपन होतं!बाळ कृष्णास देखील जगण्याचा आधार गोकुळाने दिला होता!येथे सर्व जाती धर्माच्या निराधार लोकांच्या झोपडीत जीवन व्यथित झाले होते!🌷

पुढे झुरखेड्यातील शाळेतचं रात्रीला आठवी ते दहावी पर्यंत राहून शिक्षण घेतले!रात्री भयाण एकांत असायचा!...एवढया मोठ्या शाळेतील एका वर्गात आठवी ते दहावी पर्यंत राहून शिक्षण चालू होतं!रात्र नकोशी वाटायची!भुता खेतांची भीतीने अंगावर शहारे येत असत!जेथे जिद्द मनी असते!तेथे कधीच भूत नसतात!स्वतः भूत होवून एकांतात अश्रू गाळीत जगणे!शिक्षण घेऊन पुढे जाणे यालाचं जीवन म्हणतात!भिला पाटील यांनी बालपणीच भीतीला आव्हान दिले होते!त्यात जिंकून मॅट्रिकमध्ये तालुक्यातील चौदा शाळांमध्ये पहिले आले होते!गरिबीची साथ सोबत असल्याने पुढे उच्च शिक्षणासाठी पैसेही नव्हते!🌷

बंधू भगिनींनो!
पुढे जायचं असेल तर!....बुद्धी, पैसा आणि पुढे चल असं म्हणणारे असावे लागतात!ते मानसिक आधार असतातं!हे तिघेही भिला पाटील यांना नव्हते!उत्तम गुण भेटूनही त्यांना मार्गदर्शक कोणीही नव्हते!शेवटी एम जे कॉलेज जळगावात हॉस्टेल वर वेटर म्हणून काम करण्याची संधी मिळाली!जेणेकरून तेथेच राहून सायन्स कॉलेज करता येईल!परंतु होस्टेलवर कामासाठी रुजू होण्या अगोदर मेकॅनिकल ड्राफ्टसन कोर्सला नंबर लागला होता!योगायोगाने कोर्स पूर्ण होण्या पूर्वीचं जैन पाईप जळगांव सारख्या मोठ्या कंपनीत वयाच्या१९व्या वर्षीच कायम स्वरूपी नोकरी मिळाली होती!🌷

"मेकॅनिकल ड्राफ्टस्मनचा" कोर्स पूर्ण करून योगायोगाने जळगावात जैन इरिगेशन पाईप मध्ये नोकरी मिळाली!....हा जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण होता!🌷

"आसवांच्या वर्षावाने
आनंद ही भिजला होता
दुःखाच्या पायपीटीने
शब्द शांत निजला होता..!

कोणा म्हणू मी सगे सोयरे
अश्रू ज्यांनी पुसले माझे
क्षणोक्षणीं साथ देती
सुख वाढती ताजे ताजे...!"
 
बंधू-भगिनींनो!
सर्वस्व झोकून दिले तर आकाश ही ठेंगणे होते!आपल्याशी नाते जोडते!कार्य तसंच असतं!पुरस्कार आपल्याला बोलावत असतो!..उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून उत्कृष्ट डिझाइनचा पुरस्काराने भिला पाटील यांनां गौरविण्यात आले!कामाशी प्रामाणिक आणि समर्पण असेल तर त्याची नोंद होत असते!..🌷
 
चौदा वर्ष सेवा ही उपलब्धी आहे!पुढे पार्ट टाइम मेकॅनिकल डिप्लोमा करून नवीन क्षेत्रात यशस्वी सुरुवात केली!पुण्यातील एम एन सी कंपनीत आपल्या कार्याचा ठसा उमटवतं "भिला पाटील"ब्रँड नेम झाले आहे! आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांत त्यांचं विमान उड्डाण घेत आहे!..झेप घेत आहे!भिला या शब्दाला नवीन अर्थ देत आहेत!
तीस ते चाळीस वेळा आजपर्यंत अनेक देशांमध्ये कंपनी साठी भेटी दिलेल्या आहेत!🌷

"जन्मतःच का जन्मलो?
तेव्हा माझा प्रश्न होता
काट्यांवर चालतांना
देह माझा उष्ण होता...!

गेला तो भूत माझा
 भूत होऊनि जगलो मी
माझ्यातला अहं जळला
तुम्हा समोर वाकलो मी..!

 मज भिला हे नाम दिले
भल्यासाठी जगेन मी
दैवताची भूल होती
बोरं होऊनि पीकेन मी...!

दुःख झेलण्या हात माझे
ओंजळीत अश्रू घेईन मी
मानवतेच्या भल्यासाठी
विष देखील पियीन मी...!"
 
बंधू-भगिनींनो!
रस्त्यातले काटे वेचून भाकरी साठी चूलीत टाकणारे!रक्ताळलेल्या पाऊलांवर फुलं सुगंधी सांडणारे!....आज विमानाने झेप घेत आहेत!....शून्याला लाजवणारे हे परममित्र जगण्याची रीत सांगून जातात!🌷
       🌹-------------------🌹
.....नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं ७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-२५एप्रिल२०२१

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)