वधू-वर मेळावा काळाची गरज
वधू-वर मेळावा काळाची गरज
🌹🌹***********🌹🌹
....नानाभाऊ माळी
🌷***************🌷
बंधू-भगिनींनो!
काळ वेळ पळत आहे!काळासोबत माणूस पळत आहे!पूर्वी पळण्याचा वेग वाढलेला नव्हता!शेतीप्रधान अर्थ व्यवस्थेमुळे गावं खेडी
बैलगाडीनें जोडलेली होती!दळणवळणाची साधन मर्यादित असल्याने कमी अंतर पार करून साधारणपणे २०-२२ किलोमीटरच्या परिघात मुलं-मुली पसंत केल्या जात असतं!शिक्षणाचा प्रसार देखील जास्त नव्हता!त्यामुळे शेतीत राबणाऱ्या मुलाला शेतीत कष्ट करेल अशीचं मुलगी पसंत केली जात असे!विवाह सोहळा पार पाडून दोघेही आपल्या संसारात एकरूप होऊन जात असतं!🌷
बंधू-भगिनींनो!
दळणवळणाची साधनं वाढली!शिक्षणाचा फायदा कळला!खेडयातून पोट भरण्यासाठी लोकं शहरात जाऊ लागली!तेथेचं स्थायिक होऊ लागली!पोटासाठी गावं सोडू लागली!गावांकडे संपर्क कमी कमी होत गेला!पुढे आपली मुलं मोठी होऊ लागली!लग्नाळू होऊ लागली!....संपर्क पाहिजे तेवढा राहिला नाही म्हणून विवाहाच्छुक स्थळ मिळणं कठीण जाऊ लागलं!🌷
गाव आणि शहर जुडे भावंड आहेत!एकमेकांशिवाय राहू शकत नाही!पूर्वी गावात मजुरी करणारा व्यक्ती शहरात जाऊन राहिला!कष्टाच्या जोरावर हिमतीने...धन संपत्तीनें खूप मोठा झाला!काहीजन शहरं सोडून गावात माघारी आलीत!...आधुनिक शेतीच्या जोरावर धनवान सुद्धा झालीत!पैसा आला,मुलं मोठी झालीत!त्यांच्या लग्नासाठी लांब लांबच्या नातेवाईकांना आर्जव कर!विनंती कर!शब्द टाक असें मानसिक त्रासाचीच कटकटी होत्या! स्थळ शोधायला मार्ग सापडत नव्हता!मुलांचं लग्नाचं वय वाढत जात होतं!स्थळा पर्यंत पोहचायला मध्यस्थ भेटत नव्हता!नातेवाईनी देखील स्थळ पाहून थकल्यावर योग्य स्थळ मिळत नव्हती!योग्य मुलगी भेटत नव्हती!मना जोगता मुलगा भेटत नव्हता!...त्यामुळे आई-वडीलांची तगमग होत होती!...काय करावे या संभ्रमात होती!🌷
शेवटी प्रत्येक प्रश्नांवरं उत्तरं सापडत असतातं!अनेक ठिकाणी लोकांच्या गरजांची जाणीव अनेक सामाजिक संस्थानां झाली असावी!सामाजिक बांधिलकी म्हणून वधू-वर मेळाव्याचे आयोजन होऊ लागलं!...भावी वधु-वर आणि पालकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत गेला!एकाच छताखाली ओळख, परिचय,मुलाखत होऊ लागल्याने माता-पित्यांनां समाधान मिळालं!स्थळ पाहण्याच्या विवंचनेतून सुटका झाली!विवाह जमू लागले!मेळाव्यातून विवाह सोहळा संपन्न होऊ लागला!...आनंदाचं झाड दारात लावल्यागत!मेळाव्यानें माणसं जोडली जाऊ लागली!समाज जोडला जाऊ लागला! नवीन नातेवाईकांचा धागा जोडला जाऊ लागला!मेळाव्याचं ठिकाण वधू-वर सोहळ्याचे केंद्र बिंदू बनू लागले!भावी वधु-वर या सोहळ्याचा लाभ घेऊ लागले!संसार वेलीचं स्वप्न पहात मेळाव्याला येऊ लागले!🌹
बंधू-भगिनींनो!
लग्न म्हणजे एक स्वप्न असतं!खऱ्या जीवनाची सुरुवात असते!संसार वेलीचां प्रारंभ असतो!लग्न म्हणजे दोन नात्यातील विश्वास असतो!अतिशय नाजूक धाग्यांनी बांधलेली गाठ असते!हृदयातील श्रध्दा आणि विश्वास यांचा संगम म्हणजेच लग्न असतं!त्याची सुरुवात वधू-वर मेळाव्यातून सध्या होत आहे!महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील धुरीण या मार्गाचा यशस्वीपणे अवलंब करीत आहेत!नाते जोडीत आहेत!संबंध जोडीत आहेत!समाजाच्या अडचणी समजून वधु-वर मेळाव्याचे आयोजन करीत आहेत!जीवन आनंदमय आणि सुखकर होण्यासाठी माध्यम म्हणून कार्य करीत आहेत!🌹
🌷**************🌷
.....नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-१२ नोव्हेंबर २०२१
Comments
Post a Comment