अमृत_देवकामाय

#पुष्प_२३वे...

                    🌹#अमृत_देवकामाय🌹    

                      ......नानाभाऊ माळी
 
बंधू-भगिनींनो!
तांब्या हा तांब्याचा असतो
अमृत भरुनी वाटीत असतो!
 मीच माझा तेंव्हा नसतो
स्वर्ग जगाला उगीच हसतो !
माता पित्यात वैकुंठ दिसतो 
गुरू स्वरूपात लपुनि बसतो! मनात मीच मग हरखुनी जातो!

आई!!!हे दैवत निर्माण करतांना ईश्वराला कितीतरी प्रयोग करावे लागले असतील!ईश्वराच्या प्रयोगशाळेत अनंत चाचण्या पार पडल्या असतील!अमृतात्मा घुसळून-घुसळून शुद्धात्म्यात रुपांतरीत झाला असेल!🌹

समयानुरूप त्या दिव्य ज्योतिनें हाडामासाची प्रकृती शोधली असावी!त्यात प्रवेश करतांना लाखो करोडो सहनशीलतेचा,करुणेचा, ममतेचा,मायेचा पुकारा झाला असावा!ईश्वराने!देव नावाच्या वैज्ञानिकाने 'आ-ई' या दोन अक्षराना भक्कम इच्छाशक्तीच वरदान दिलं असाव!'आत्म्यातून ईश्वरात' विलीन होताना आध्याक्षर 'आ' आणि 'ई' असे दोन भिन्न रासायनिक गुणधर्म असलेली कोमलता टाकली असावी!त्यात सहनशीलतेचा विशेष गुणधर्म असलेली रासायनिक प्रक्रिया केली गेली असेल!या आराध्य दैवतास, आविष्कारास,ईश्वराच्या चमत्कारास 'आई' संबोधण्यात आलं असावे!🌹 

कोमलता,ममता,कैवल्य आदी भावनांचा रस त्यात ओतला असावा!महान दैवताची ख्याती मनुष्य जन्मापासून उत्तरोत्तर जगद्विख्यात होत गेली असावी! 
मला अशाचं आई नावाच्या एका
 महान दैवताच दर्शन घेण्याचा योग दि २२जानेवारी२०२०ला आला होता!
त्या आईचं नाव आहे 'देवकाबाई'!!देवकामाय!!🌹

देवकामायनं वय गेल्या वर्षी पंचाहत्तरी पार केली आहे!सुरकूतलेला चेहरा पण तेजस्वी कांती!रंग गोरापान दिसत होता!मनस्वी प्रसन्न दिसत होती!कष्टाने शरीर थकलेलं पण निरोगी,उत्साही वाटत होत!चेहरा हसतमूख दिसत होता!कष्ट माणसाला तंदुरुस्त ठेवत असतं!उत्तम आरोग्य देत असत!वय झालं तरी ते लपत असतं!देवकामाय पंचाहत्तर वर्षाची आहे असं चेहरा सांगत नव्हता!चेहरा साठ वर्ष सांगत होता!प्रसन्नता माणसाच आयुष्य वाढवत असते!

प्रसिद्ध कामगार नेते,उत्तम वक्ते,पुण्यातील अनेक सामाजिक संस्थांमध्ये ज्यांचा सहभाग असतो अशा आणि नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आलेले श्री गणेश चौधरी यांच्या त्या मातूश्री!आईचा वाढदिवस त्यांच्याच गावी कळमसरे ता.अमळनेर जि.जळगाव येथे साजरा झाला होता!🌹

अमृत महोत्सव साजरा करणे जीवन सफलतेची तिसरी पायरी आहे!नवचैतन्याची स्फूर्तीची दिशा असते!वयाने रौप्य अन सुवर्ण अनुक्रमे पहिले-दुसरे येतात!अमृताच दान घेऊन 'आई' हिरकमहोत्सवाकडे वाटचाल करीत आहे!देवकामायचा शत चंद्रदर्शन सोहळा साजरा होईलच अशी त्यांची प्रकृती सांगत होती!

लहानशा खेडेगावातील शहरातील,घराघरातील व्यक्तींसाठी तो समारोह आदर्श दिशादर्शक होता!अनेक ठिकाणी म्हाताऱ्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष होत असतं!कित्येक घरात हाल केले जातात!त्यांच्याच मालमत्तेवर डल्ला मारून निराधार करणारे महाभाग ही असतात!आईची ग्रंथ तुला अन जिलेबी तुला करून आलेल्या पाहुण्याना जेवणासोबत गोड जिलभी वाढवणारे मातृभक्त गणेश चौधरी आहेत!🌹

गणेश!!देवी पार्वती पूत्र!सर्वांचे आराध्य दैवत गणेश! देवकामायचा समारोह आयोजित करणारा सुपुत्र ही गणेशचं आहे!श्रावण बाळने कावडीत आई-वडिलांना बसवून यात्रा केली होती!🌹

 शुभ कार्याचा प्रारंभ श्री गणेशाने होतो!गणेश चौधरी यांनी जेष्ठांची सेवा करण्याचा आदर्श घालून दिला आहे!सामाजिक बदलाचे प्रतीक अन मूर्तीमंत उदाहरण आहेत!गुरू बाह्य ज्ञान देतो!वडील धैर्याने तोंड देण्यास शिकवीतात तर आई दाराआडची पहिला गुरू असते! आईचे उत्तम संस्कार गणेश चौधरी यांच्यावरती झाले असावेत!बंधूरक्षक,मातृ पूजक!समाज सेवक!अत्यंत सेवाभावी व्यक्तिमत्व!देवकामायचे थोरले सुपुत्र आणि आईच्या अमृत महोत्सवी कार्यक्रममाचे आदर्श आहेत!🌷 

बंधू-भगिनींनो!
आई-वडील आणि गुरू ही तीन महादैवत आहेत!ते परमेश्वराच्या,सत्य साकार स्वरूपाची ओळख करून देत असतात!संपूर्ण विश्वाची ओळख करून देत असतात!🌹

गंगेची निर्मलता!सागराची अथांगता अन पृथ्वीची महानता आई या दोन अक्षरी शब्दात असते!साऱ्या विद्या आई भोवतीचं फिरतांना दिसतात!आई अमृताचा अखंड झरा असतो!आईवडिलांच्या सेवेतच अखंड पुण्य सामावलेले असतातं!आई सारखे दैवत जगात कुठेच भेटणार नसतं!सापडणार ही नसतं!🌹

आईच हृदय अथांग सागरासारखे असतं!विशाल आकाशासरखे असतं!देवकामाय तुझा कष्टाचा 'घाम' गणेशाने आपल्या हृदयाने,आपल्या हाताने अमृत महोत्सवानिमित्त थोडा तरी पुसला आहे!🌹

आई मुलांसाठी सर्व काही असते!'आई' विश्वातील एक आश्चर्य आहे!तिची माया कोणालाचं कळली नाही!स्वतःचे अश्रू पदरात लपवून तोंडावर हासू दाखवीत असणारी!मुलांसाठी काळीज देणारी असते!🌹

 'फोडीते पान्हा कुशीत धरूनि, काढिते डोळ्यातूनि पाणी!
 बालरूपात कधी येतो ईश्वर
 तुझी ऐकण्या मधुर वाणी!
 वाहते शुद्ध निर्मळ प्रेम
 तुझे फेडील ऋण कोणी!'🌹

अमृत देवादिक प्याले होते!अमर -सुखासीन झाले होते!स्वर्गात रमले होते!देव आणि अमृताचा जसा संबंध आहे तसाच देवकामाय आणि अमृताचा आहे!वयाची पंचाहत्तरीचाअमृत योग्!अमृताचा स्पर्श आईला झाला होता!अमृत महोत्सव आयोजित करून देवकामायला अमृत प्यायल्याचे समाधान वाटले असेलच!पंचाहत्तरी पार केल्याचे समाधान वेगळंच असतं!काबाड-कष्ट,दुःख अन विरह यांतून पुढे सरकत!शेतात मोलमजुरी करीत!संसाराचा गाढा ओढीत!मुलांवर चांगले संस्कर
करीत देवकामायने
पंचाहत्तरी गाठलेंली आहे!🌹

'प्रेमळ भक्ती कृतज्ञतेची,सदैव झोळी करिते खाली!
देण्या काळीज ममतेच,तू पृथ्वी तलावर आली!
पहिला गुरू या जगाचा,आई कल्पतरू झाली!'🌹

आईचा अमृत महोत्सव सर्वांदेखत,सर्वांच्या साक्षीने साजरा झाला होता!
प्लॅटिनम जुबली साजरी केली!अलीकडे आपण रौप्य,सुवर्ण,अमृत,हिरक असे वाढ दिवस साजरा करीत असतो!तर देवकामायने ७५ री पूर्ण केली 
आहे!🌹

देवकामाय साठी म्हणावसं वाटतं,
 'तुम एक बहेता पानी हो, 
करूना की हो जननी माँ!
 ईश्वर की हो वाणी तुम,
किसको सूनाऊ कहानी माँ!
 हरपलं छाया देनेवाली,
ईश्वर की हो रचना तुम!
प्रेमभाव का घडा हो तुम 
बरगद का है पेड माँ!
जन्मोसे श्वासो में बसी,
अंत तक रहनेवाली तुंम!
आकाश से पाताल तक,
कण कण में हो बसी माँ!'🌹

देवकामायला अमृत संजीवनीचा स्पर्श झालेला आहे!कष्टाचं फळ म्हणजेच या मातेला वंदन करण्याचा तो सुदिन होता!🌹

पुन्हा म्हणावसं वाटतं, 
 'पैरो पे चलना सिखाया,
बचपन की पाठशाला तुम!
पानी से भी पतला ज्ञान,
तेरे कोखं से मिला है माँ!'..

आई सारखे दैवत संपूर्ण विश्वात कुठेही मिळणार नाही!आई मुलांना स्वतःच्या हृदयाहून जास्त जपलेल असतं!

' आई!पवित्र झालीत महाकाव्य 
 ही तुझ्याच नावामुळे!
फुटती मधूर शब्द ओठांवर, मनातलेवअहंकार होती खुळे!
मुखात येता नाम तुझे 
झुकते आकाश तुझ्याचमुळे!'🌹

 मातेचा अमृत समारोह आयोजित करून भाग्याचा दिवस सर्वांसाठी उघडून दिला!इतरांनी हा आदर्श जपावा असे कार्य केले आहे!तो दिवस आईसाठी अति महत्वाचा असतो!

अमळनेर हे थोर सुपुत्र!महान साहित्यिक!..समाजसेवक साने गुरुजींची कर्मभूमी आहे!याच कर्मभूमीत गणेश चौधरीचां जन्म झाला! सानेगुरुजीं 'श्यामच्या आई' मध्ये गुरुजी सर्वोत्तम संस्कारा विषयी हितगुज करतात!आईची महती वर्णन करतात!गणेश चौधरी यांच आईवर तेवढेच प्रेम आहे!आईचे उत्तम संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत !त्यांनी आईची उत्तम सेवा केलेली आहे!गणेश हे श्रावण बाळाचे प्रतीक आहेत!अतिभव्य समारोह त्याचंचं प्रतिबिंब आहे!आईला व्यासपीठावरील सिहंसनावर बसलेलं पाहून साहजिकच राजमाता जिजाऊ डोळ्यासमोर दिसत होत्या!सर्व जनांची आई जिजाऊ सारखीच असावी!मला माता जिजाऊंत देवकामाय दिसली होती!
आईसाठी म्हणावेसे वाटते,

'पेरीत आलीस बीज शुद्ध
 मनाच्या निर्मळ मातीवरी!
 अढळ ग्रह-तारे ही फिरताहेत आपुल्याच मार्गावरी!
परी ताऱ्यांचा तारा राहते आई, आपुल्याचं भूतलावरी!'🌹

गणेश म्हणजे अतिशय मितभाषी!मनमिळाऊ अन उमदे व्यक्तिमत्व,विचारवंत आहेत!सेवाभावी विचारांचे आहेत!पुण्यातल्या नामांकित खान्देश माळी मंडळाचे तरुण तडफदार उपाध्यक्ष आहेत!जागोजागी आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवला आहे!🌹

आईच्या
काबाड कष्टाची जाण त्यांच्या मनातल्या कुठल्यातरी कप्प्यात घर करून होती!आई चांदनासारखी झिजली! हाडे झिजले पण कष्ट करीत राहीली! तिचे उपकार कधीही फेडले जाणार नाहीत!पण आईचा वाढदिवस साजरा करून कमीत कमी तिच्या काबाड कष्टाला थोडं तरी जागावं!उतराई व्हावं अशी त्यांची मनीषा होती!ती पूर्ण झाली!देवकामाय बद्दल बोलावसं वाटतं!

 'लिहितो तुजवर आसवांनी, घेऊन चैतन्याची शाई!
घन अंधारी चंद्र आकाशी 
आम्हा तू शीतलता देई!
ठेविते पवित्र देव्हारा मनाचा सुगंधी कस्तुरी तू आई!'🌹

 *आईची थोरवी सांगतांना अस वाटतं,* 
 'उपकार तुझे शतजन्मीचे
झाकूनि पदरातुनी!
नऊ मासाच्या कळा सोशिल्या, टाहो फुटला उदारातुनि!'🌹

पुढे म्हणावसं वाटतं,
' मातृत्व कसे हे फुलूनि गेले, झोपलो उबदार कुशीत कधी!नयन माझे दिपुनि गेले 
आलो सूर्यप्रकाशा आधी!'🌹

 गावातील अनेक जणांच्या शेतात देवकामाय मजुरी करून,कष्ट करून राबली !मुलांवर उत्तम संस्कार केले!
आई अमृतकुपी घेऊन अमृताचे थेंब स्वतः वाटतांना दिसली!
आई महान असतेचं!तिचे आशीर्वाद लाख पटीचे असतात,!

 'पावसातील छत्री माझी,
उन्हातील सावली तू!
उबदार पांघरून झालीस कधी, स्वतः गोठलीस तू!'🌹

 पुन्हा आई साठी बोलावेसे वाटत
 कि,
 'चमचम तारे लेखणीत भरावे, आकाशी लिहावी कहाणी!
चरण तुझे रोज धुवावे 
माझ्या अश्रू नयनातुनी!
कडेवर घेता-घेता
ममता ओतलीसमजवरी!
तुझ्या पाठीचा केला घोडा
हक्क माझा तुजवरी!'🌹

गणेश यांनी आईची 'तुला' गुळाच्या जिलेबीने केली!असे भाग्य थोड्याच पुण्यवानांना मिळतं!म्हाताऱ्या आई-वडिलांची सेवा कशी करावी हा उत्तम संदेश दिला गेला!असे सुपुत्र जन्माला येण हे ही ईश्वरी भाग्यच समजावं!

गणेश तुम्ही नावाप्रमाणे गणेश आहात!मातृ पूजक आहात!देवी पार्वतीचा पुत्र गणेश जसा आहे!तसाच आपण देवका आईचा पुत्र 'गणेश' आहात!पायात काटा रुतला की आईचा पुकारा होतो!वाघ दिसला की बापाचा पुकारा होतो!अन अज्ञान दिसलं की गुरू डोळ्यासमोर दिसतात!कोमलता,करूणा सोशिकता आई जन्मजात घेऊन आलेली असते!
 ती मुलाला आपलं काळीज देते ती आईच असते!आई उन्हातील सावली असते!आई म्हणजे ईश्वराचच एक रूप असत!सतत हसत प्रसंगांना सामोरे जात असते!.....आई संस्कार असतें!श्रध्दा असतें!स्वास असतें!विश्वास असतें!आपलं अस्तित्व असतें!आपलं जीवन असतें!🌹

आई आचार आहे!आई विचार आहे!आई विश्व आहे!आई भक्ती असते!शक्ती आहे!गुरू असतें!आई माऊलींच पसायदान असते!जगावरती आईचे लाखो उपकार असतातं!आई आकाश आहे!सागर आहे!आई माया आहे!ममता आहे!आई दिपक ज्योती असतें!🌹

आई प्रकाश आहे!आपल्या जीवनाच मूळ आहे!आई आपल्या जीवनाच सार आहे!आई चेतना असते !आई मंदिराचा पवित्र गाभारा असते!आई ईश्वराचच रूप असते!आई ज्ञान असतें!आई दृष्टी असतें!आई आशीर्वादाची खान असते!🌹

आई वात्सल्य असते!आई वैंकुठीच द्वार असतें!आई डॉक्टर ही असते!आई चार धामांच विचारपीठ असतें!आई परीस असतें!आई चैतन्यस्वरूप असतें!आई पवित्र चंदन असते!

नेहमीच सत्याचा सुगंध आईत दरवळत असतो!आई पावसातील छत्री असते!हिवाळ्यातील उबदार स्वेटर असतें!आई उन्हाळ्यातील सावली असते!आई अंतरंगाचा उमाळा असतो!आई अमृताचा झरा असतो!अनमोल आशीर्वाद लाखमोलाचे असतात त्यास कुठलेही शस्र भेदू शकत नाही!

आई तीर्थक्षेत्र असते!आई ऊर्जा असते!आई सुईचा दोरा असते, सतत नाती-गोती शिवत असते!पत्नी फुलांचा गुच्छ असते तर आई त्याचं फुलांचं झाड असते!बाप ओसरीतला सूर्य असतो! आई माजघरातल प्रतिबिंब असते!दिपज्योति असते!वडील आयुष्याचं पुस्तक असतात!आई त्या पुस्तकातील अमृत पाने असते!🌹

बाप शेताच भक्कम कुंपण असतात !
आई पीक पाणी असते!आई घराच्या भिंती असतात!बाप घराचं छत असत!आई घरातली पेटती ज्योत असते!वात असते!पोटच्या गोळ्यासाठी आई वेडी असते!भवितव्य असते!जिंकणं बघून गालात हसते!खरचं आई वेडी असते!स्वतःची तर ती कधीच नसतें!आई वेडी असते!आपल्या मुलांसाठी आई वेडी असते!🌹

देवकामायने पंचाहत्तरी गाठेपर्यंत खूप कष्ट उपसले आहेत!आतापर्यंत जगण्यातल माय तू आयुष्याचं मुद्दल वसूल केलं आहे!यापुढे बोनस आयुष्य आनंदाने जगावे!शंभरी गाठावी! शतक महोत्सवी समारंभ साजरा करावा!याचं शुभेच्छा!!!

शेवटी म्हणावसं वाटतं,
 'हरियाली की चादर तुम खुशीयोका सागर हो माँ!
छुने निकले आसमा को
 पहली सिडी तुम हो माँ!
तुम ना होती इस धरती पर
कभी ना होता जीवन यहा!
इस जगत की जननी तुम
 तुम ही जीवन ज्योति माँ!🌹

बंधू-भगिनींनो!
पुन्हा भेटूया पुढील पुष्पा सोबत!🌷......🌷🙏
......धन्यवाद!
.... नानाभाऊ माळी, 
लेखक, कवी
#साहित्यसम्राट
हडपसर, पुणे-२८
मो.नं.९९२३०७६५००
       ७५८८२२९५४६
 दि.१४फेब्रुवारी२०२१

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol