धरण भाग 1

! !धरण!!-भाग-१
   🌹----------------🌹
......नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!
धरणाचा जन्म होतं असतो!धरण जन्माला घातलं जातं असतं!धरण म्हणजे नदी तीर आणि आसपासच्या परिसरातील राहणाऱ्या लोकसमूहाचं भरन करण्याचं साधन असतं!आत्महत्या,मरण टाळण्याची जलकुपी असते!मानवाच्या कल्याणासाठी मानवाने बांधलेला जलसेतु असतो!सुजलाम: सुफलाम: सस्ये शामलांम:चं सुंदर रूप असतं!'जल ही जीवन हैं'..... निसर्गाने!मेघांनी मनसोक्तपणे उधळलेलें तुषार नदीत गोळा होत असतात!तेच सागरास जाऊन मिळतात!🌷

"कळा येऊनि मेघास
शुभ्र तुषार उडती
सृष्टी भिजली चिंब
थेंब हुशार पडती....!

अलोटाचे लोट सारे
ओढ्या-नाल्यात भेटती
उफाळलें रें नालें सारे
प्रेमे.….अंग चाटती ....!

बेफाम होतें नदी
नाले सर्व भेटती
गर्व होताचं तिला
गावं पडदे फाटती....!

बेबंध झाली कशी
स्व-राणीसम थाटते
नागमोडी वळणातून
 सागरास......भेटते...!"🌹

पाण्याचा जन्म समुद्रावरून वाहून नेणाऱ्या मेघातून होतो!पुन्हा तेच पाणी सागरात येऊन विलीन होतं!...एकजीव होतं!शेवट त्या विशाल सागरात एकरूप होऊन जातं!सृष्टीची तृष्णा अपूर्ण रहाते!नदी पुन्हा वाळूत लुप्त होते!गुप्त होते!वाळू चोरीला जाते!नदी खडकात जाते!नदीकाठ अतृप रहातो!मानव समूह स्थलांतर करीत असतात!शेवटी जल ही जीवन हैं!🌹

जल संवर्धन आणि सिंचनातून माणूस आणि जमिनीची तहान भागविली जात असतें!हिरवाईचं स्वप्न साकारलं जात असत! नदीचं पाणी अडवलं जात असत!भौगोलिक स्थान निश्चित करून नदीवर धरणे बांधली जातं असतातं!पोटासाठी झालेलं स्थलांतर थांबवलं जातं असतं!नापिकीचा शिक्का पुसला जात असतो!🌹

महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र हा सुजलाम: सुफलाम: झालेला आहे!कृष्णा-कोयना जीवन दायिनी झालेल्या आहेत!जीवन संजीवनी झालेल्या आहेत!खडकाळ जमिनीत ऊस ताठ मानेने उभा आहे!हरीत पट्टा म्हणून कृष्णा काठ,कोयना काठ समृद्ध झालेला आहे!पाण्यावर मानसं पुढारली!पाण्यामुळे पुढारलेला पश्चिम पट्टा सुख समृद्धीने,भरभराटीने आपला विकास साधतो आहे!🌹

मानवी जीवनमान उंचावण्यासाठी जलसमृद्धी अत्यंत आवश्यक असते!कृष्णा-कोयना नद्यांना धरणे बांधून गाव शिवार हरीत झालेले आहे!हरीत पट्टा आर्थिक समृद्धीने पुढारलेला आहे!उर्वरित महाराष्ट्रावर त्यांचीच सत्ता सातत्याने चालत आलेली आहे!आर्थिक ताकद सत्ता प्रस्थापित करीत असते!एकमेकांचं राजकीय कितीही हाड वैर असलं तरी आपल्या भागाच्या विकासासाठी एकत्र येण्याची अत्यतं आक्रमक वृत्ती पुढारलेला!आर्थिक!राजकीय!सामाजिकदृष्ट्या विकसित हा पश्चिम पट्टा मुंबईत बसून महाराष्ट्राची धुरा सांभाळीत असतो!...याला म्हणतात विकास!याला म्हणतात समृद्धी!याला म्हणतात पुढारलेपन!🌹

सत्येत वाटा पाहिजे असेल तर आर्थिक लॉबिंग करावी लागते!....आपण जर दुष्काळग्रस्त असलो!...शंभर एकर जमीन आहे पण कोरडवाहू!पावसावर अवलंबून!चार महिने संपले की!...आठ महिने शेतकरी घरात बसून असतो!पाणी नाही!नद्या आहेत!..पाणी वाहून जातंय थेट समुद्रात जाऊन मिळतं!शेतकरी उपाशी!...घर उपाशी!गावं उपाशी!तालुका उपाशी!.जिल्हा उपाशी! ..पूर्ण पट्टा तहानलेला!..आत्महत्येचं हत्यार घेऊन वेशीवर उभा असलेला हा दुष्काळी पट्टा म्हणजे उत्तर महाराष्ट्र आहे!🌹

शेतकरी कंगाल!...तेथील माणूस कंगाल!विकास नाममात्र!...काळीभोर माय फक्त दरवर्षी नांगरून ठेवली जाते!तिची तहान कोण भागवणार?नद्या आहेत!...पावसात खळखळ वाहतात!...नदीत गणपती विसर्जनाला देखील पाणी राहू नये?हे भयाण चित्र उत्तर महाराष्ट्राचे आहे!🌹

"शेतीस औत आहे
जुंपण्यास बैल आहे
पाणीविना सांग देवा
शेतकऱ्यास जेल आहे?..

विहिरीत ढुंकतो कधी
झिर जिवंत होतील
पाणी ओढूनी घ्यावे
पिकं अनंत राहतील...!

डोक्यावर येतो सूर्य
परीक्षा रोज घेतो
ढगांची छत्री येते
आश्वासन रोज देतो...!

ढेकाळल्या जमिनीत
झोपुनी घ्यावे आता
ढगास सांगावे ओरडून
कोरडया करू नकोस बाता!

कधी नदी ओलांडून
येईल का शेतात
फाटकी लक्तरे ही
रोज सांगूनि जातात..!

पाणी तहानलेले
की मी तहानलेलो
शब्द दोन उभे आता
मीच गहाण लेलो......!
     🌹------------------🌹
.....नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे
मो नं ७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-०६मे२०२१

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)