शब्दयोगी प्रकाश पाटील सरांसोबत एक अविस्मरणीय भेट!!!!!!!
शब्दयोगी प्रकाश पाटील सरांसोबत एक अविस्मरणीय भेट!!!!!!!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
***********************
....नानाभाऊ माळी
शब्द ताकद देतो!उत्साह देतो!आनंद देतो!मनाला समाधान ही देतो!अक्षर अक्षर वेचून शब्द गोळा करीत राहावीत!....लेखणीतील, मुखातील शब्द चंदनासारखे झिजून विरघळून सुवासिक होत जावीत! कमळासारखी फुलत राहावीत!आनंद वाटत राहावीत!सतारीतील सूर शब्द घेऊन अर्थ सांगतं राहावीत!मंदिरातील
घंटानाद कानांनी शोषून घेत हळुवारपणे हृदयातल्या खोल खोल कप्प्यात पोहचवत राहावीत!नादब्रम्हातं एकजीव होऊन जावीत!शब्दांची गुंफण फुलमाळासारखी सुगंधित होत जावी!शब्द पावित्र्याचा अनमोल हिरा बनून जावा!ते अनेक शक्तीशाली कठीण शब्दांचा कधीही मागे न हटणारं संयुग बनून जावं!तेच शब्द कठीण धक्के सहन करीत इतिहास बनून राहावीत!🌷
शब्द जात-धर्मापासून दूर अलिप्तपणे प्रवास करीत रहावा!प्रवाहित होत, गोडवा गात फिरत रहावा!आकाशातील तारे सुंदर शब्द होऊनि आपल्या मनाला आणि बुद्धीला ज्ञानप्रकाश देत फिरत राहावेत!🌹
कठोर तपस्ये नंतर शब्दसिद्धी प्राप्त होत असते!प्रतिभेचा उजेड हळूहळू होत असतो!त्या उजेडात थोर विचारवंत आणि थोर साहित्यिकांचा जन्म होत असतो! प्रज्ञावंत शब्दांची पूजा करीत महान शिखरावर जाऊन बसत असतात!आपल्या मनावर अधिराज्य करीत रहातात!आपण त्यांना देवत्व बहाल करीत असतो!आपल्या हृदयात श्रद्धा भाव जन्म घेत रहातो!आपण भक्त म्हणून त्यांची पूजा करीत राहतो!ते सुर्यासम तेजाळत राहतात!बंधूंनो!..असे अनेक विद्वान साहित्यिक होऊन गेलीत जे पृथ्वीच्या आयुष्यापर्यंत मानवी मनावर अधिराज्य करीत राहतील!🌹🙏
...प्रकाश पाटील पिंगळवाडेकर!शब्दांचा जादूगार!शब्द किमयागार!आपल्या प्रतिभेतून सतत विचारांचे दान मुक्तहस्ते वाटणारे शब्दयोगी!विविध विषयांवर अतिशय सखोल, सुरेख आणि खोल खोल समुद्रासारखे विचारांचें भांडार असणारें! सामाजिक जाणिवेचं समृद्ध साहित्य लिहिणारे थोर साहित्यिक, प्रसिद्ध कवी म्हणजेच आदरणीय भाऊसाहेब प्रकाशजी पाटील सर आहेत!समाज मनाचे प्रबोधनात्मक रंजन करणारे आहेत!🌷
शब्दांची समृद्धी लेखकाची श्रीमंती असते!या श्रीमंतीचा कुठलाही गर्व नसणारे! पण कवी आणि साहित्यिकांना सतत मार्गदर्शन करणाऱ्या या शब्द देवदूताची पालखी पुण्यातल्या चिंचवडमध्ये विसावली असल्याचं कळलं!मी त्यांच्या दर्शनार्थ आतुर झालो होतो!आणि त्यांच्या परवानगीने त्यांना भेटावयास गेलो!🌷
समृद्ध!..संपन्न प्रतिभा लाभलेले सद्गुरू,शब्दगुरू भाऊसाहेब प्रकाशजी पाटील सर!अगदी साध्या कपड्यातं होते!जीवन मार्गदर्शकाची तत्वे अंगिकारलेल्या व्यक्तिमत्वास वाकून नमन केले!त्यांच्या दर्शनाने भेटीची लालसा तृप्तीत रुपांतरीत झाली!मराठी आणि अहिराणी भाषेचा अफाट शब्द भांडार असलेल्या व्यक्तिमत्वाची भेट झाली!....मी माझं भाग्य समजत होतो!विविध विषयांवरील त्यांचं अनमोल मार्गदर्शन मी माझ्या मनात साठवत होतो!🌷
साहित्याची परिभाषा सहज सुंदर मांडणारे आदरणीय प्रकाशजी पाटील सरांना आमच्या घराला पदस्पर्श करण्याचा आग्रह केला! उदार मनाने माझा आग्रह मान्य करीत दिनांक ५ऑक्टोबर रोजी आमच्या हडपसर, पुणे येथील घराला त्यांच्या पवित्र पदस्पर्शाने आम्ही पावन झालोतं!त्यांच्या प्रतिभेचा!बुद्धिमत्तेचा!अनेक अनुभव कथनाचा मुक्तपणे लाभ घेत राहिलो!रात्री उशिरापर्यंत त्यांनी त्यांच्या अनुभव संपन्न विचारांचं समृद्ध भांडार मनसोक्तपणे वाटीत राहिले!मी आधाशीपणे त्यांचं ज्ञानभांडार घेत राहिलो,ऐकत राहिलो!...विविध साहित्यिक गप्पातून,त्यांच्या मार्गदर्शनातून मी ही श्रीमंत होत गेलो!...त्यांच्या ज्ञानरुपी महामार्गावर,आदर्शांवर चालण्याचा मनोमनी ठाम विश्वास निर्माण झाला!सकाळी त्यांच्या पायांवर डोके टेकवून मी कृतकृत्य झालो!.....तृप्त झालो!थोर लेखकासोबत दहा-बारा तास रहाता आले हे मी माझं सौभाग्य समजतो!🌷
----------------------------
🌷🌷🌷🌷🌷🌷
*********************
...नानाभाऊ माळी,
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-७ऑक्टोबर२०२१
Comments
Post a Comment