तेथे दिव्यत्वाची प्रचिती
तेथे दिव्यत्वाची प्रचिती
कार्यकारणी आणि वधु-वर समितीतील सर्व समाज बंधूंनो!....प्रत्येक व्यक्ती पोटासाठी पळत असतो!पोटाची भूक भागवून पुढे माणूस सामाजमनाची ही भूक भागवत असतो!त्यासाठी व्यक्तिगत गरजा अन वेळ बाजूला ठेवाव्या लागतात!मुरड घालावी लागते!अंगी समाजासाठी झपाटलेपण येत असत!
बंधूंनो!.. काल दिनांक०३ऑक्टोबर रोजी आपण वेळ,अंतर आणि स्वतःच्या गरजांनां मुरड घालीत बालेवाडी,चिखली,आकुर्डी,
चिंचवड,भोसरी, सांगवी-पिंपळेगुरव,कात्रज,पुणे शहर,वाघोली,हडपसर अशा भिन्न ठिकाणाहून मिटिंगसाठी घरी आलात!मन तृप्त झाले!मन भरून आले!याला म्हणतात समाजासाठी झपाटलेपण!समाजासाठी दायित्वभाव!
आपणास येतांना रहदारीचा मानसिक त्रास झाला असेल!दूरचे अंतर पार करतांना नकोसे झाले असेल पण तरी देखील करोना या संकटाला सामोरे जात आपण प्रेमापोटी आलात!आमच्या अरुंद गल्लीमुळे वाहने लांब ठेवावी लागलीत!रिस्क घेत आलात!...
रिस्क घेणे जीवनाचा अविभाज्य अंग झालेच पाहिजे!...रिस्क दृष्टी देत असते!...माणसाला घडवीत असते!सामाजिक जाणिवांचं भान येत असत!जे कार्य आपण करतोय त्याकडे निरपेक्षपणे आपण पाहू लागतो!माणूस समाजप्रिय होत जातो!स्वतः घडतांना!शिकतांना समाजाला वळण लावीत असतो!
काल सर्व बांधवांनी विविध विषयांवर चर्चा केली! गुणवंत विध्यार्थ्यांचे स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्रासोबत रोख स्वरूपातील बक्षीस रक्कम वितरण अशी अतिशय किचकट विषय सहज सोपा करीत विषय हातावेगळे केलेत!..वधू-वर मेळाव्या संदर्भात चर्चा झाली! विशेषतः मंडळाच्या जागेच्या ७/१२ विषयी सकारात्मक चर्चा झाली!
बंधूंनो!विचारमंथनातून संवाद साधला जातो!मंडळासाठी झटणाऱ्या सर्वचं हृदयस्थ बंधूंनो माझी आग्रहाची विनंती आहे आपण कुठलेही मतभेद व्यक्तिगत पातळीवर घेऊ नयेत! जो कोणी बोलतो तो मंडळाच्या उज्वल भवितव्यासाठीचं बोलत असतो!सकारात्मक मतभेदानी मंडळाचा विकासचं होत राहील!अजून एक-दोन वर्षांनी आपल्या मंडळाचं रौप्य महोत्सवी वर्ष होईल!पंचवीस वर्षे मंडळ हिरीरीने कार्य करीत आहे!हे विचार स्वातंत्र्य आणि आपणा सर्व बांधवांच्या एकीच द्योतक आहे!...
मागील पिढीने "खान्देश माळी मंडळाचे" छोटेसे रोपटे लावले!त्या पिढीला खूप त्रास झाला आहे!त्यांचे अनुभव आपले मार्गदर्शक आहेत!ते आपले गुरुजन आहेत!त्यांच्या कार्यप्रति आदर व्यक्त करून त्यांच्या आदर्शांवर मंडळाचा हा महामेरू पुढे नेत राहू!..चुकत असेल तर कान धरा!जाब विचारा!..जाब व्यक्तिगत पातळीवर घेऊ नयेत!
आपण३००-४००किलोमीटर अंतरावरून आलो आहोत!आपल्या विकासासोबत खान्देश माळी मंडळाला शिखरावर नेत राहू!आनंद देऊ!आनंद घेऊ!एकी हेच बळ ठेऊ!...
जय ज्योती!जय क्रांती🌷🌷💐💐💐🙏😌
...नानाभाऊ माळी
दिनांक-४ऑक्टोबर२०२१
वेळ- रात्र२-३४
Comments
Post a Comment