डभुई पानीनं डाबरं
🌷डभुई पानीनं डाबरं🌷
************
...नानाभाऊ माळी
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
भाऊ-बहिनस्वनं!
दहा-बारा दिन व्हयना व्हतीन! मी बिनकामनां चपला घसी रस्ते रस्ते भवडी ऱ्हायंथु!चांगला पानी पडी जायेलं व्हता!रस्ताधरी आथा-तथा धाकला-मोठा
पानीनां डाबरां भरेल व्हतातं!त्या टायीटुयी कसरत करी चाली ऱ्हायंतू!मांगेथिन एक फटफटी उनी!तो नव्वा डंगरा व्हता आस वाटस!त्या वात्रायेल धांड्यानी गाडीन्हा हँडल जोरमां पिया व्हयी!रेस करी भुर्रर्रकन चालनां गया!🌷
गाडी डाबराम्हायीन सर्रर्रकनं आंगवर डबूई पानी उडायी नींघी गयती!आंगवरनी धव्वी कुडची
माटाये पानीम्हा रंगायी गयती!मी कुडचिंगम दखतचं ऱ्हायी गवू!डोकाम्हा उज्जी तिडीक उठनी व्हती!पन गाडीवाला तो मोक्या धांड्या जागावर सापडता तव्हय नां!!मालेचं भवडानी हाउस व्हती!🌷
याले सापडाव त्याले सापडाव आस करत बिनकामनं डोकाम्हा तिखी मिर्ची घाली फिरत ऱ्हातंस आपन!डोकाम्हा राग घाली बयत ऱ्हातंस! तयतय करी जगत ऱ्हातंस!पन हातलें काहीचं लागत नई!मनलें बायत ऱ्हातंस फटफटीवाला उना माले फुकटम्हा
राग दिसनी दूर चालना गया!भाऊ-बहिनीस्वन!..राग आपलं रंगत बायत ऱ्हास!आपलं मन उकयेत ऱ्हास!आपलावरी नको ते घडत ऱ्हास!चढता तापलें संगे लयी फिरनं म्हणजे आंगवर डभुई पानी उडासारखंचं ऱ्हास!🌷
पानीलें रंग नई ऱ्हास! ड+भुई म्हणजे भुईवर सांडायेल पानी ऱ्हास!भुईवर पडावर ते माटाये व्हयी जास!रंग-रूप बदली लेस!निर्मयपना सोडी देस!आस्सल काचनांमायेक दिखनारं पानी डभुई व्हयी जास!दुन्यानं माटडं लयी फिरस🌷
भाऊ-बहिणीस्वन!.....
आपलं जीवनमा भी डभुई व्हात ऱ्हास!डोकाम्हा दुन्यानं माटडं लयी फिरतस!....आस्सल पानीदार,टोकदार नाकनां मव्हरे चालणारा मानोस एकदम बदली जास!राख भरी लेस डोकाम्हा!लोके डभुई पानिंगत व्हावाले लागी जातस!ती येयचं आशी ऱ्हास!जवलोंग मनम्हा बठेल डभुई इचार नींघतस नहीं!मन शांत व्हत नई!... तवलोंग आपन बयेत ऱ्हातंस!उपसी उपसी झिरानं डभुई पानी
आस्सल व्हत ऱ्हास!मन थकी जास!जीव थकी जास!शरीर थकी जास तवलोंग येडानंमायेक उपसीचं ऱ्हावो!तव्हय कोठे ते पेवा सारख व्हस!लेवा सारख व्हत ऱ्हास!🌷
कव्हय-मव्हय आपलाचं मनम्हानी बठेल आठी ढिल्ली व्हत नई!बांधेल गाठ मोकी व्हत नई!डभुई पानीनां गय तयलें बठत नई !डभुई पानी वरवर!खालें-वर डूबुक डूबुक व्हत ऱ्हास!मन जोगत काम व्हत नई! तवलोंग आपन तयतय-बयबय करत ऱ्हातंस!डाबराम्हा मुकला दिन पानी ऱ्हायन ते मव्हरे सडालें लागी जास!त्यान्हा इसडाफोक,गंधा वास येवाले लागी जास!आपला मनमा संगयेल डभुई पानीनं डाबरं टाईमें टाईम उपसी टाकत ऱ्हावो!🌷
डाबरं खाली व्हत !...आपलं मन हालकं व्हत ऱ्हास!आपलं जगनं सोफ व्हतं ऱ्हास!डभुई इचार आपली आक्कल हुशारी खायी टाकत ऱ्हातंस!डभुई डभुई तयलें चिटकू देवो,बठू देवो!आस्सल आस्सल मनन्ही लांघीथुन मोकेचोके व्हाऊ देत ऱ्हावो!🌷
चांगला इचारन्ह आमरुद आपला हिरदनी धमनीस्मा वतत ऱ्हावो!आंगम्हानं खराब सडेल-डभुई रंगत मव्हरे सरकत ऱ्हावू देवो!मांगेथुन आमरुद नसा नसास्ले पवतीर करत ऱ्हास! जग सुंदर आनी चिरंजीवी दिखालें लागी जास!डभुई जे से ते माटीम्हा एकजीव-एकरूप व्हयी जिरत ऱ्हास!.. मंग त्या माटीम्हायीन आस्सल कव्व्या कोंब वर येत ऱ्हातंस!आपन त्या कव्व्या
कोंबस्ले दखी खुश व्हयी मव्हरे चालत ऱ्हावो!पयेत ऱ्हावो!
आनंनम्हा जगत ऱ्हावो!🌷
*****************
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
...नानाभाऊ माळी,
मु.पो.ता.शिंदखेडा, जि. धुळे
(ह.मु.हडपसर, पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२०ऑक्टोबर२०२१
Comments
Post a Comment