बैलं पोया
🌹।।बैलं पोया।।🌹
********
...नानाभाऊ माळी
----------------------------
रोज रोज राबाना
बैलेस्ना धरम
एक दिन पुंजील्ह्यारे
दिनभर आराम........!
खांदा चोयील्ह्यारे
तेल गरम.......
वरीसभर त्यास्ले
ऱ्हास आराम हराम...!
लांब सेफटींनां सेत
रंग धव्या काया
सिंगे रंगायनातं
लाल पिव्या निया.....!
मय माटी आंगनी
खल्ली खुल्ली चोया
ढवळ्या पवळ्याल्हे
पानी लाई धोया......!
मिरवनूक त्यास्नि
भर गावंमा काढी
गोड पुरनंपोयी
माय आते व्हाढि.....!
रांगोयी टाकी आंगनलें
पोरं मन्ही सजाडी
बायकोनी नेसेलं से
नवी कोरी साडी.....!
आरती धरेलं दख
बैलंस्नि मोठमायलें
निख्खार आराम भेटनां
आम्हनां हेरनी धावलें..!
वरीस भर बैलं मन्हा
कायी माटीलें झाया
घरे दारे गावंनां आज
मन्हा बैलंस्ना पोया.....!
🌹 ************🌹
.......नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं.७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक- ०६सप्टेंबर२०२१
Comments
Post a Comment