लव्हाई
🌷🌷🌷🌷
🌹लव्हाई🌹
------------------
...नानाभाऊ माळी
****************
🌷🌷🌷🌷🌷
मुया धरीसनी लव्हाई
हुभी जागावरचं ऱ्हायी
ठनकाडी सांगस दुन्याले
नेम्मंनं गुण तिन्हा दायी...🌷!
दुन्यानां भार व्हावो कितला
गडेल सहेन करत नही
लव्हाईनी जिंदगी आपली
लोंढा ठगाडस ठायी ठायी.🌷!
चाली ऱ्हायना हावू परवास
आक्सी मुयी उखडतं ऱ्हाई
खडंगंनं गोटा-गाटा बठ्ठा
मव्हरे जातीनं लयी व्हायी..🌷!
लोंढा व्हात ग्यात कितला
लव्हाईनं बेट हालनं नही
आठे बुडी ग्यात मुकला
काय देत ऱ्हायना गव्हायी..🌷!
ताठा मुडी ग्यात कितला
काय हाडके मोजत नही
नमी वाकी जगत ऱ्हावो
ह्या ऋणम्हा जग ऱ्हायी....🌷!
वर आभाय फाटो कितलं
खल्ली ताठा सोडी जायी
नमी लव्हाई व्हयी जावो
....वाकी तोंड देत ऱ्हायी...🌷!
पुरन्हा लोंढा सुटी आक्सी
खल्ली मुया उखाडी जायी
झित्रा व्हडोत कोनी कितला
भालंदेवनां लहू हुभा ऱ्हाई..🌷!
************************
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
...नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०८ऑगस्ट२०२१
Comments
Post a Comment