खाकी वर्दीतील माणूसपण

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
खाकी वर्दीतील माणूसपण
🌷---------🌹----------🌷
.....नानाभाऊ माळी
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

बंधू-भगिनींनो!
खाकी वर्दी गौरवाचें प्रतीक आहे!सन्मानाचे प्रतीक आहे!आदर्श समाज निर्माणाचं प्रतीक आहे! पदोपदी खाकीतून देशभक्तीची आणि एकात्मतेची भावना जन्माला येत असते!मानव समाजाला भयमुक्त जीवन जगण्याची हमी पोलिसांनी दिलेली असते!🌹

"पोलीस"या शब्दातून कर्तव्यदक्ष!कायद्याचं पालन करणारा!करारीपणा!समाज रक्षक!समाजमित्र!कर्तव्य कठोरपणा!...या महत्वपूर्ण गोष्टी खाकी वर्दीचा सन्मान करीत असतातं!कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठीचं पोलिसांचं आयुष्य असतं! समाजरक्षक पोलीस समाजाची सेवा करीत असतो!समाजात शांती नांदावी म्हणून कर्तव्य कठोर होत असतो!कायद्याचा योग्य वेळी हंटर वापरीत असतो!समाज स्वास्थ्यासाठी दिवस-रात्र सतर्क रहात असतो!🌹

पोलीस खात्यातील व्यक्तीनें साहित्यिक म्हणून जर हातात लेखणी घेतली!...त्यांच्या मनात  विषय कुठला असणार आहे मग? चोर-पोलीस!खून!बलात्कार!दरोडा!राजकीय बुडवे-भडवेगिरी!गुन्हेगारी!दहशतवाद!मारामारी! कौटुंबिक वादविवाद!अत्याचार!जासुसगीरी!असे अनेक विषय लेखणीतून जन्माला येतील!स्वानुभवांचं कथन लेखणी करत राहील!व्यक्ती पोलीस खात्यातील असल्याने विषय भराभर पुढे सरकत राहील!ज्वलंत विषय मांडण्याचा प्रयत्न असेल!..पण जर तिचं व्यक्ती पोलीस खात्यातील समृद्ध स्वानुभवांची शिदोरी सोडून वेगळ्याच विषयाला भावनिक स्पर्श करीत असेल तरती व्यक्ती सुख,शांती,श्रद्धा आणि स्वास्थ्याच्या मार्गावरील वाटसरू आहे असं आपण समजतो!🌹

वाटसरूची वाट वेडीवाकडी!निमुळती!अरुंद!खाचखळग्याची  असेल तर यातना कठीण असतात!अशा वेळेस 
अध्यात्माची!निष्कलंक दातृत्वभावानें जगण्याची ओढ लागायला लावते!मोहापासून,लोभापासून मुक्तीचा निवृत्तीचा अध्याय सुरू होतो!🌹

बंधू-भगिनींनो!
मी सुद्धा एका पोलीस 
अधिकाऱ्यांच्या सानिध्यात आलो होतो!निर्गवी आणि साधेपणाचं भक्कम कवच आपल्या चालण्या बोलण्यातून,वागण्यातून परिधान केलेलं दिसलं!त्यांच्या हृदयात कोमल पावित्र्याची कमळाची फुलें उमलतानां दिसत होती!हो..  सहायक पोलीस आयुक्त या पदावरून नुकतेच ३६वर्षे सेवा पूर्ण करून पोलीस खात्यातून  निवृत्त झालेले अधिकारी श्री "नरसिंह मन्याबापू भोसले साहेब" आहेत!🌹

पोलिस कर्तव्यदक्ष अन कर्तव्यकठोर,अशा तालमीत घडलेले,वाढलेले!नावारूपाला आलेले!भोसले सरांच्या हृदयात माणुसकीचा अखंड वाहणारा झरा दिसला!सामाजिक भान आणि बांधिलकीची जाणीव दिसली!संवेदनशील,कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणूनही नावाजलेले दिसले!नोकरीची पहिली इंनिंग संपवून निवृत्तीनंतर आता सुखाचे क्षण वेचित आहेत!साहित्यातून शांतीचा मार्ग दाखवीत आहेत!जीवन जगण्याची कला शिकवीत आहेत!पोलिसपणाचे लेबल हृदयातून पूर्णतः काढून टाकले आहे!🌹

'जन्म ते पुनर्जन्म"हे श्री नरसिंह भोसले सरांचं प्रकाशित पुस्तक आहे!पुस्तकातून समाज स्वास्थ्यासाठी!मन शांतीसाठी उत्तम प्रबोधन केलेले आहे! मार्गदर्शन केलेलं आहे!अखिल मानव समाजास डोळस
नजरेतून संवेदनशील विषय कळावा!...मानसिक ताण-तणावापासून मुक्तीचा मार्ग मोकळा करावा म्हणून आनंदी आणि उत्साही जगण्याची गुरुकिल्ली  भोसले सर आपल्या हाती देत आहेत!🌹

पोलिसांचं नाव घेतलं की भय किंवा भीती वाटते!मवाळपणा बाजूला सारून कर्तव्यदक्ष खाकी वर्दीतील व्यक्ती आपल्या नजरेत भरते!आदरणीय भोसले सर आपण सर्व पाश दूर लोटून शांतीच्या महामार्गावरील शांतीदूत म्हणून कार्य पार पाडतं आहात!सुख समाधानाचा उत्तम मार्ग दाखवीत आहात!अध्यात्माचा सुंदर आविष्कार आपल्या लेखणीतून अवतरतो आहे!सामाजिक स्वास्थ्यासाठी पुढे येऊन विडा उचलला आहे!🌹

साहित्याच्या माध्यमातून कौटुंबिक सुसंवाद साधत आहात!मना मनात आनंदी, उत्साही आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत बनून समाज सेवा करीत आहात!🌹

मानव समाजाचे मानसरोगतज्ञ म्हणून विधायक कार्य करीत आहात!भेडसावणाऱ्या अनेक समस्यांच्या मुळापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहात!आपल्या "जन्म ते पुनर्जन्म"या ग्रंथातून स्वास्थ्यासंबंधी उत्तम विवेचन आहे!कौटुंबिक समस्येवर उपाय सांगितलेलें आहेत!🌹

मुळातच नरसिंह भोसले सरांनी खाकी वर्दीतीलं अनेक समस्या हाताळल्या आहेत!घर कुटुंबाची सुरक्षा महत्वपूर्ण असते!चोऱ्या- माऱ्या,महिला सुरक्षा,सायबर गुन्हे याविषयी उत्तम माहिती प्राप्त होते!🌹

आपल्या जीवनात अनेक धोके उद्भवत असंतात कधी आर्थिक परिस्थिती,तर कधी घर-शेतीची वाटणी!अशा अनेक घडामोडींनीं ताणतणाव वाढत असतात!त्यांच्यावर उपाय सांगितले आहेत!दिर्घआयुषी जीवन जगण्यासाठी "जन्म ते पुनर्जन्म' या ग्रंथातून जनजागृतीची उत्तम माहिती मिळते!योग साधनेचा अर्थ समजावून सांगितला आहे!

शांतीपूर्ण जगण्यातून जीवन समृद्ध होत असत!अनुभवांचे शहाणपण आपल्याजवळ असेल तर समस्येवर मात करता येते!आपल्या समृद्ध अनुभवांची शिदोरी म्हणजेचं आपला ग्रंथ आहे!वेगळ्या वाटेवरचा!वेगळ्या धाटणीचा ग्रंथ आहे!समाज सुरक्षित रहावा!आरोग्यसंपन्न रहावा!यासाठी आपण कुशलतेने विषय हाताळला आहे!शांतिदुत बनून शांतिदुत परिवाराचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहात! सुखी संसाराची उत्तम मांडणी केलेली आहे!विज्ञान आणि अध्यात्माची योग्य सांगड घातली आहे!आरोग्यासंबंधी अनेक उपाययोजना सांगितल्या आहेत!  वयोवृद्ध व्यक्तींच्या समस्यावंर प्रकाश टाकला आहे!वृद्धाश्रम विषयी उत्तम प्रबोधन केलेले आहे! हा ग्रंथ भाषिक सीमा ओलांडून जागतिक स्तरावर मार्गदर्शन करेल अशी माहिती त्यात आहे!
प्रत्येक व्यक्तीचा आत्मविश्वास वाढावा म्हणून महत्वपूर्ण विवेच आपल्या ग्रंथातून दिलेले आहे

यशस्वी वाटचालीसाठी आपल्यावर झालेले आदर्श संस्कार आपल्याकडून कार्य करून घेत असतात!आपण संस्काराची शाळा उघडली आहे!  ग्रंथरूपाने उत्तम मार्गदर्शन करीत आहात!आपल्या पोलीस सेवेचा  उत्तम-समृद्ध अनुभव ग्रंथातून पदोपदी जाणवतो आहे!काही वेळेस आपण उत्तम डॉक्टर म्हणून मार्गदर्शन करतात तर काहीवेळा अर्थगुरु म्हणून सल्ला देत असतात!अडचणींवर मात करण्याची शिकवण देत असतात!दुःखहरणाचा मार्ग देखील सांगून जातात!समाजाच्या विस्कटलेल्या घडीतून नवा समाज निर्मितीचा ध्यास आपण घेतला आहे!प्रस्तुत ग्रंथातील पान नं पान जगण्याची उमेद देत आहे!🌹

मानवी जीवनातील विसंवाद विकोपाला चालला आहे!प्रचंड स्पर्धा आहे!सुसंवादी जीवन शैलीची कास धरीत,शांतीचा संदेश देत आहात !आपण उत्तम प्रतिभेच्या समन्वयातून सुंदर अन सुखमय जीवनाची आस्था मांडलेली आहे!सहजपणे विज्ञानातून अध्यात्म मांडलें आहे!अध्यात्मातून संस्कृतीचं
सुंदर रूप दिसत आहे!🌹

स्वतःच्या घरापासून सुरू होणारा सुसंवादी आणि सुखमय प्रवास, शेतीच्या बांधापर्यंत येऊन पोहचतो!शेतातील पीकपाणी,खत, बी-बियाणे आणि सेंद्रिय खतांचा वापर करून शेती उत्पादन घेण्याचा सल्ला ही देत आहात!🌹

पोलीस खात्यातील व्यक्ती मसालेदार,चमचमीत लिखान करू शकले असते!पोलिसी अनुभवांची माहितीपूर्ण आणि खट्टा-मिठ्ठासहित रसदार लेखन केले असते!परंतु भोसले सरांनी वेगळीच वाट निवडलेली आहे!विज्ञान,अध्यात्म,अर्थकारण आणि समाजशास्त्रचा आधार घेऊन मन शांतीचा मार्ग निवडला आहे!आपण ग्रंथातून उत्तम मार्गदर्शन करीत आहात!सामाजिक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहात!आपला ग्रंथ खरोखर समाज जीवनाचा गाईड म्हणून कार्य करीत राहील!डोळसपणे जगण्याचा अधिकार देत राहील! सुसंवादी विचारांची पेरणी करीत राहील!भारतीय संस्कृतीचा वारसा जपतं राहील!🌹

"जन्म ते पुनर्जन्म" सर्व वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त आहे!मिळालेल्या जन्माचं सार्थक होईल अशी अपेक्षा ठेऊन! भूतलावरील मानवाचं कल्याण व्हावे अशी तळमळ आपण व्यक्त केली आहे!आपल्या प्रतिभेतून संपन्न विचार ग्रंथात उतरले आहेत!अमृताच्या पेल्यातून अमृत प्राक्षुन घ्यावं तसा आपला ग्रंथ वाचावयास मिळाला!सुंदर विचारांची मेजवानी मिळाली!माझं मन देखील ग्रंथ वाचून प्रसन्न,उत्साही आणि ताजेतवाने झाले आहे!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
लेखक संपर्क!------
श्री.नरसिंह भोसले,(से.निवृत्त सहा.पोलीस आयुक्त,बृहन्मुंबई,
मो.नं.8956672736)
-----------------------------------
Email:bhosalenarsing2017@gmail.com
-------- --------------------------
पुस्तक अमेझॉन वरून उपलब्ध आहे!
https://www.amazon.in/dp/8195380700/ref=cm-sw-r-wa-awdb-imm-W0336S35WYHVFCO7V9FP
सदर पुस्तक उपलब्ध ठिकाण... "रुद्र इंटरप्राइजेज",आप्पा बळवंत चौक,पुणे येथे 9075496977,8975930258 
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
**********************
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
...नानाभाऊ माळी,
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-०६ सप्टेंबर२०२१

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)