पुण्यात्मा वैकुंठ गमन

💐पुण्यात्मा वैकुंठ गमन💐
💐🙏💐🙏💐🙏💐🙏
  ------------------------------
     ...नानाभाऊ माळी
*********************

बंधू भगिनींनो!
मंगळवार दिनांक २४ ऑगस्ट
२०२१!सकाळ प्रसन्नतेच्या सूर्यदेवाला ओवाळीत होती!घराघरातं प्रसन्नतेचं आगमन झालं होतं!सूर्यदेव समस्त सृष्टीस दर्शन देत होता!सृष्टी सूर्यप्रकाशाने उजळून निघाली होती!सूर्यप्रकाश घरांच्या प्रवेशद्वारातून रात्री पांघरलेला अंधार दूर लोटीत प्रवेश करता झाला होता!अंधाराची कवाडे करकरा उघडत होती!घराघरात चूली पेटल्या होत्या!शेगडीचा गॅस पेटला होता!

घराघरातील गॅस शेगड्या जळत होत्या!गरमागरम चहा-नाश्ता तयार होणे सुरू होते!...सकाळी सातच्या सुमारास अशीच एक गॅस शेगडी पुण्यातल्या काळेवाडीत विजयनगर येथे पेटली होती!श्री किशोर आण्णा वाघ यांच्या घरात गॅसवर चहा ठेवला होता!सौ.लता ताई!....किशोर आण्णांच्या सौभाग्यवतींनी चहा उकळायला ठेवला होता!चहा उकळत होता!...अन...💐🙏

काही कळण्याच्या आत!अचानक सौ.लताताई तोल जाऊन जमिनीवर कोसळल्या!किशोर आण्णा धावलें!...ताईंना धावत पळत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेतं!....पण उशीर झाला होता! पेटती ज्योत विझली होती!ज्योत मावळी होती!एका ज्योतीची वात संपली होती!एका सावित्रीच्या लेकीचं आयुष्य समर्पण झालं होतं!...ताईंची प्राणज्योत मालवली होती!पवित्र आत्म्याने वैकुंठीच्या प्रवासासाठी प्रस्थान केले होते!न सांगता!..न बोलता! काही कळण्याच्या आत सर्व काही मागे ठेऊन गेल्या होत्या!काळ कळण्याच्या आधी!..समजण्या आधी!.. काळाने सौ.लता ताईंना हिरावून नेलं होतं!किशोर आण्णाशी सात जन्माचं वचन घेतले होते!वचन अपूर्ण ठेऊन निघून गेल्या होत्या!सात जन्माची गाठ बांधलेली हृदयातली व्यक्ती काहीही न सांगता!निघून गेली होती!आण्णा असह्य वेदनेने!अपार दुःखाने तळमळत होते!💐🙏

  कै.सौ.लताताईंचं निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झालं होतं!सुख दुःखाच्या कुठल्याही गोष्टी न सांगता!न बोलताचं.. निघून गेल्या होत्या!मुलं अपार,असह्य दुःखाने रडत होती!अचानक आलेल्या वादळाने भूमीवर घट्ट उभे असलेलं झाड पाडलं होतं!काही क्षणांच्या तीव्र वादळाने सर्व काही शांत झालं होतं!धक्का असह्य होता!🌷🙏

मानव शाश्वताची कवाडे बंद करून जन्माला येत असतो!सर्वचं पराधीन असतं!चिरंजीवी कोणी ही नाही!स्वत्व आणि सत्व ठेऊन सुख वाटीत जीवन जगाव आपण!..... पुढे सर्वचजन आपलं अस्तित्व मागे ठेऊन परत न येण्याच्या प्रवासाला निघून जाणार आहेत!जास्त कमीचा कालावधी लागेल फक्त! पण अचानकपणे निघून जाण्याचं दुःख तीव्र असतं!वेदनादायी असतं!ते दुःख आण्णांच्या नशिबी आलं होतं!अचानक वाट्याला आलं होतं!💐🙏

"मागे पुढे जाणे आहे
ज्याचे त्याचे देणे आहे
 बांधितं संसार सुखाला
 विरहात मग जगणे आहे.....!

अश्रू ओघळती गालावरती
कर्म प्रसवाणे उरते किर्ती
चढ उतारावरील सखे सोबती
 मोती गळतात गालावरती..!

वचन तोडोनि भिजते धरती
नाव किर्तीचे झेंड्यावरती
पराधीन हा माणूस जगती
दुःखाचीचं करतात आरती..!

 एकमेका भाव कळतां
मन मनाला सांगत असतं
 ... रुसुनी बसले एक जरी
दोन जीवात कधी अंतर नसतं..!" 

बंधू-भगिनींनो!
संपूर्ण काळेवाडी भागात किशोर वाघ यांनी स्वविचार प्रवाहाने, स्वकष्टाने माणसं जोडली होती! टाटा कंपनीत नोकरी सांभाळून राजकीय,सामाजिक क्षेत्राशी आपले घट्ट नाते जोडले होते!अशा सर्व क्षेत्रांशी संबंधित बोलके स्वभाव गुणधर्मामुळे माणसं विणत होतें!अशा सर्व घडामोडींनां साथ देणाऱ्या!साक्ष असणाऱ्या!मनातून पती धर्माचं पालन करणाऱ्या!..साध्या भोळ्या स्वभावाच्या लताताई घरी आलेल्या कोणाही व्यक्तीला,पाहुण्याला कमीतकमी चहा पाजल्याशिवाय जाऊ देत नसत!💐🙏

 अनेक सामाजिक मंडळात,
अनेकविध पदांवर कार्यरत असतानाचं पुण्यात १९९९साली खान्देश माळी मंडळाची स्थापना झाली!किशोर आण्णा स्वतः संस्थापकात एक होते!पुढे सचिव अन वधु-वर अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत असतांना वयाच्या साठीनंतर सेवानिवृत्त होऊन मंडळाला आशीर्वादात्मक मार्गदर्शक करीत सल्लागार म्हणून सर्वांच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवत होते!!...महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मंडळाचं नाव पोहोचवले होतें!वधू-वर मेळाव्याचं यशस्वी आयोजन म्हणजेच आण्णांच्या यश किर्तीचं द्योतक आहे!त्यांच्या प्रेरणेमुळेचं कै.सौ लताताई मंडळातं सल्लागार पदावर कार्यरत होत्या!💐🙏

स्वभाव हा स्वाभाविक असतो! जन्मापासूनचं साथसंगत असतो!ज्या खान्देश माळी मंडळाचं नाव राज्याबाहेर पोहचवलं अशा कर्मवीर किशोरआण्णां वाघांच्या सौभाग्यवती कै.सौ.लताताईंचा अतिशय मवाळ,साधेपणा आणि भोळा भाबळा स्वभाव सर्वांना प्रेरणादायी होता!💐🙏

महाराष्ट्रात कानाकोपऱ्यातीलं लोकं घर शोधित आण्णांकडे येत असतं!उपवर मुलं किंवा मुलीसाठी स्थळ घेऊन येत असत!आण्णा त्यांनां योग्य समाधान,सल्ला आणि स्थळ सुचवत असतं!आपल्या स्पष्टपणे,स्पष्टवक्त बोलाच्या आदरयुक्त भीती स्वभाव गुणधर्मामुळेचं!पालकांचा १००%विश्वास बसला होता!..तेच पालक कै.सौ.लता ताईंच्या हातचा गरमागरम चहा घेऊन!.. आण्णांच्या घरचा जिना उतरून समाधानाने घरी जात असत!अशी प्रेमळ माणसं या दाम्पत्याने जोडली होती!💐🙏

सर्वांना आपलेसे करणारा गोड स्वभाव अचानकपणे नजरे पलीकडे जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं!ताई आपण वयाच्या ६३व्या वर्षी मानव देहातून मोक्षधामाकडे मोक्षप्राप्तीसाठी दूरदूर निघून गेलातं!...मागे सर्वांच्या हृदयात हळहळ ठेऊन गेलात!आनंद देत निघून गेलात!आपला गोड स्वभावाच्या आठवणी मागे ठेऊन गेल्यात💐

.... वाघ परिवार आणि खान्देश माळी मंडळास पोरके करून गेलात!आपल्या वैकुंठ गमनाने!पुन्हा नाही भेट या जाणिवेने!वेदनेने अतीव दुःखाची तीव्रता जाणवत आहे!शेवटी जाणे येणे आपुल्या हाती नाहीये!आपण पामर आहोत!कटपुतळे आहोत!तरीही या कमी आयुष्यातही!.. आपण माणुसकीचं झाड लावीत गेलात!माणसं जोडित गेलात! संस्काराचे धागेधागे विनीत गेलात!त्या अनंत धाग्यांची चादर बनवली!..माणसं शिवलेल्या!..जोडलेल्या उबदार चादरीतं आपण अजून काही वर्ष थांबला असता!किशोर आण्णांच्या जीवनात अजून काही वर्षे लता बनून!फुल बनून चंदनासारखा सुहास देत राहिल्या असत्या!इतरांना ही मार्गदर्शन आणि आशीर्वाद देत राहिल्या असत्या सर्वांना पुन्हा नवीन उर्मी आणि ऊर्जा प्राप्त झाली असती!💐

  पती-पत्नी संसाराची दोन चाकं असतात!दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करीत असतात! !दोघांचे मन,आत्मा आणि शरीर एकजीव झालेलें असतातं!मुलांचा संसार थाटून झाल्यावर निवृत्तीचे !..सुखाचें!..बोनस दिवस मजेत घालवायचे दिवस असतात!आपण तेंचं आनंदी क्षण उपभोगीत होतात!सुखाचे क्षण आपल्या दारात नाचत होते!....पण..पण... नियतीच्या मनातलं कोण जाणतं असतं? होत्याचं न होते करीत असतें!या दुःखद आघातातून!विरहातून आण्णा!.. आपणास दुःख सहन करण्याची शक्ती मिळो! उभ राहण्याची मानसिक उभारी प्राप्त व्हावी!आज दशक्रिया विधी, गंधमुक्ती आणि उत्तरकार्य या निमित्ताने...कै.सौ.लताताईंच्या पुण्यत्म्यास वैकुंठीचे द्वार उघडून मोक्षप्राप्ती मिळो हिच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो!💐🙏
💐💐💐💐💐💐💐💐
    ---------------------------------
....नानाभाऊ माळी,अध्यक्ष-
खान्देश माळी मंडळ,
पिंपरी-चिंचवड-पुणे परिसर!!
हडपसर,पुणे-४११०२८,
मो.नं-७५८८२२९५४६
         ९९२३०७६५००
दिनांक-०२ऑगस्ट२०२१
💐💐💐💐💐💐💐

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol