किर्तनातं एकरूप झालो
🌷किर्तनातं एकरूप झालो🌷
--------------------------------
...नानाभाऊ माळी
💐👏💐👏💐👏💐👏
बंधू-भगिनींनो!
संत हे समाजाचे मार्गदर्शक असतात!रंजल्या गांजलेल्यानां जगण्यासाठी उभारी देत असतात!विठू नामाचा महिमा अगाध आहे!... दुःखी,कष्टी आणि सामान्य समाजाला विठ्ठल चरणी नेणारे संत जीवन शिक्षक असतात!🌷🙏
भक्तीचा मळा फुलवणाऱ्या संतांनी सामान्यजनांना ज्ञानी करून सोडले आहे!चालत आलेल्या अनेक अनिष्ट रूढी परंपरांवर संतांनी शब्दांची काठी हाणली आहे!संत समाज सेवक असतात!अनंत दाखल्यातून आणि स्वकृतीतून समाजासमोर आदर्श ठेवत असतात!🌷🙏
बंधू-भगिनींनो!
मी ही किर्तनातं तल्लीन झालो होतो!जगद्गुरू तुकोबारायांच्या नामसंकीर्तनात एकजीव झालो होतो!एकरूप झालो होतो!प्रापंचिक दायित्वांच्या पार पलीकडे गेलो होतो!तुकोबांच्या विठूभेटीच्या विरहाने मी ही अश्रूंना वाट करून देत होतो!🌷
"कन्या सासुराशी जाये!
मागे परतूननि न पाहे!
माझ्या ऐसें झाले जीवा!"
विरक्तीची भेट होतांना दिसत होती!प्रापंचिक व्यापाचा मोह पूर्णतः गळून पडला होता!विरह आता नकोसा झाला होता!ईश्वर भेटीची लालसा बेचैन करीत होती!...
अभंगातील या ओवीचा अर्थ सांगताना ह भ प रवींद्रजी महाराज तारखेडकर यांनी विठू भेटीसाठीचा ऊत्तम दाखला दिला होता!कन्येचा विवाह होतो!कन्या बापाचा चेहरा पाहण्यासाठी आतुर आहे!बाप आपले अश्रू लपवित मुलीपासून दूर दूर पळतो आहे!मुलीला पाहून अश्रूंचा बांध कधी फुटेल सांगता येत नाही!तळ हातावर!हृदयापेक्षाही जवळ असलेली मुलगी दूर निघून जाते!बाप कोपऱ्यातचं अश्रूंना वाट करून देतो!नेमकी तशी..तशीच अवस्था भक्तांची झालेली असते!विरहाने तळमळणारा देह विठू भेटीसाठी आतूर झाला आहे!🌷
शिरपूर,जि.धुळे येथे संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरीनाम सप्ताह सुरू आहे!दिनांक ०५ऑगस्ट २०२१च्या गुरुवारी रात्री०९वाजता पाचव्या दिवसाचं किर्तन होतं!🌷🙏
रस हा शब्द प्रत्येक विषयाचं काढलेलं जीव असतो!अमृत असतं!भक्तीरस भक्तिसंप्रदयातील काटोकाट भरलेला तांब्या असतो!अतिउच्च शिखर आहे!
संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकोबारायांनी हा महामार्ग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवला!समाज मनात रुजवला! कीर्तनातून..भजनातून भक्तीचा अलोट सागर आपल्या संसाररुपी आणि प्रापंचिकजीवनात एकरूप केला आहे!💐
जगतगुरु तुकोबारायांनी आपल्या अभंगातून पाण्याविना तळमळनाऱ्या मासोळीचा उल्लेख भक्तीत लीन झालेल्या भक्ताची विरह अवस्थाही अशीच असते असे नमूद केले आहे!विरहाने तळमळीनें!घालमेलीने परमेश्वर भेटीचा ध्यास घेतला आहे! परमेश्वर भेटीची तगमग आणि तळमळ पाण्याच्या मासोळी सारखी झाली आहे!परमेश्वर भेटीशिवाय कुठलीही ओढ राहिली नाही!.. अशी अवस्था तुकोबांच्या जीवाचीही झाली होती!शाश्वत सत्यापर्यंत पोहचण्यासाठीचा सहज सोफा मार्ग तुकोबाराय सांगतात!सांसारिक व्यापात गुरफटलेल्या नां इहलोकीचा सुंदर मार्ग सांगत असतात!🌷🙏
किर्तनातून ह भ प रवींद्रजी महाराज सांगतात की संत तुकोबारायांची अवस्था ही' कन्या सासरीस जाय' अशी झाली होती!ईश्वरभेटीची आतोनात ओढ लागली होती!त्यांनी संकीर्तन प्रभुनांमातून चिंतनिय जीवन मूल्य शिकविलेली आहेत!..... संत तुकोबारायांनी सर्वांना सावध केले!प्रबोधन केले!जगत जागृतीसाठी!..मानव कल्याणासाठी, किर्तनातून!आपल्या आचरणातून आटोकाट डोळस करण्याचा प्रयत्न केला आहे!🌷
संतांनी भक्ती संप्रदयातून आणि रंजनातून अवघड विषय सहज सोफा करून दाखविला!जेव्हा विरह नकोसा झाला तेव्हा तुकोबाराय हाती चिपळ्यासोबत भंडारा डोंगरावर जावून आत्मचिंतनातं लिन झाले होते!
"नको नको देवा नको आता झाले
मागे पुढे प्रपंच ठायी ठायी पाहिले!"🌷🙏
तुकोबारायांनी सामान्यांचे अनावर झालेले अश्रू पुसले!ईश्वर भक्तीचा सुंदर मार्ग दाखवला!जनसामान्यांचे अश्रू
भक्ती संप्रदायाचा भरभक्कम आधार घेत पुसतं राहिले!विठ्ठलाची आस लावत राहिले!विठ्ठल भक्तीततून दुःख वेचत राहिले!सुखाची व्याप्ती वाढवत असतो!..हास्य फुलवत असतो!तुकोबांच्या अनेक अभंगातून हिच आळवणी केलेली दिसते!जवा एवढ्या सुखासाठी!डोंगरा एवढ्या दुखास सामोरे जाण्यासाठी उभारी दिली!🌷
जगद्गुरू तुकोबारायांनी परमेश्वर प्राप्तीसाठी आयुष्य वेचलें!त्यांचं चिरंतन चिंतन मनुष्य कल्याणासाठीच होतं!सतत देवाशी वाद घालणारे तुकोबा आवडीच्या बोलांनी भानावर येत असतात!कधी देवाशी भांडून
त्याला सोयराही म्हणतात!जीव शिव म्हणतात!पण विठू भेटीसाठी त्यांचा आत्मा तळमळत होता!संसारी राहून देवत्व जपणारे तुकाराम महाराजचं होते!आपल्यापाशी असलेल्या आणि नसलेल्या सर्व जीविका परमेश्वरास अर्पण केल्या होत्या!टाळ चिपळ्या हातात घेऊन जीवन मार्गदर्शन करीत राहिले!🌷🙏
...अतिशय उद्विग्न मनोअवस्थेत ते भंडारा डोंगरावर जाऊन राहिले!एकांतात राम कृष्ण हरीचा गजर करीत राहिले!...वरती गेल्यावर गुहेतून फक्त विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत राहिला!डोळ्यासमोर अंधार पडलेला दिसतो त्यातून चमकणारा बारीक ठिपका त्यांना वाकुल्या दाखवीत होता!त्या दिव्य ज्योतिच्या दर्शनास तुकोबा तळमळत होते!विरहातं घायाळ झाले होते...🌷🙏
परमार्थाची व्याख्या करतांना संत म्हणतात!...जशी मुलगी बापाचा प्राण असते!अंश असते!बापाचं नाक असते!लग्नात तो पळत असतो!मुलीच्या डोळ्यासमोर येत नाहीतं!मुली समोर डोळयांतील अश्रूंचा केव्हा बांध फुटेल सांगता येत नाही!म्हणून बाप डोळे चोरत लांब लांब पळत असतो!...बाप रडतो का हो?अश्रू गाळायचा देखील अधिकार नाही का त्याला?..त्याचं मुलीने लग्नानंतर बापाची मान खाली जाईल असे वागू नये!बापाच्या डोळ्यातून पाणी येईल असे वागू नये!सासर हेंच माहेर समजावे!...बस्स जीवन धन्य झालं!..हाच तो परमार्थ होय!पारमार्थिक जगण्यातून बाप जगावा!बाप पहावा!🌷🙏
हिच विरहाची व्याख्या आहे!
देवाच्या!परम तत्वाच्या मिलनास संत आतुर झालेले आहेत! विरहात तळमळनारा भक्त मुलगी सासरला चालल्या सारखीच आहे!...विठूभेटीची अवस्था ही विरह देत असते!संत तुकोबांच्या जीवनातील ही अवस्था अतिशय हळवी होती!तुकोबाराय तळमळत होते!🌷🙏
काम,क्रोध आणि विकारांवर विजय मिळवला म्हणजेचं परमार्थ झाला असे होईल!संसारात लिप्त मानवाला जागृतीचा मार्ग दाखविण्यासाठी मुलगी आणि बापाच्या प्रेमाचा दाखला दिला आहे!तिचं अवस्था कामाला जाणारी आई तान्हुल्या बाळाला घरी ठेऊन येते!कामावरून घरी माघारी जातांना जाणाऱ्या व्यक्तींच्या सर्वांत पुढें असते!आई बाळाच्या भेटीसाठी आतुर असते!तिची ममता तिला बोलवीत असते🌷🙏
यात्रेच्या गर्दीत आपल्या हातातून बाळ निसटले!..गर्दीत बाळ सापडत नाही!..आई तोंड आणि उर झोडते आहे! तरीही बाळ सापडत नाही!आईचं मन व्याकुळ होतं!बाळाला भेटण्यासाठी आईपण तळमळत असतं!...तशीचं!तशीचं...अवस्था भक्ताची असते!विठूभेटीची आस लागलेली असते!🌷🙏
विरह भक्तीचा उमाळा असतो!विरह सहन होत नाहीये!म्हणून तुकोबाराय सांगतात, "पाण्याविण्या मासोळी तळमळे!" संसारी,प्रापंचिक मनुष्य देहाला जागविण्यासाठी अनेक दाखले देतातं!🌷🙏
......किर्तनाने कान आणि मन तृप्त झालें होते!ह भ प रवींद्रजी महाराज मनामनाचा ठाव घेत राहिले!०५ऑगस्ट२०२१ची रात्र भक्तीत न्हाऊन निघाली होती!रात्रीचे साडे अकरा पर्यंत कान आणि मन तृप्त करीत राहिले!जगद्गुरू तुकोबाराय ह भ प रवींद्रजी महाराज यांच्या मुखातून अभंगाच्या ओव्या प्रसवत राहिले!देव आणि भक्त विरहानंतर एकरूप होत राहिले!किर्तनातून बोधिसत्वांचा अनुभव येत राहिला!शिरपूरकरांसहित माझे मन देखील अतृप्तितून तृप्तिकडे वाटचाल करीत राहिले!विरहातून माऊलीची भेट होत राहिली!किर्तनाने डोळस होत गेलो!दृष्टी येत राहिली!..🌷🙏😌
"कन्या सासुराशी जाये
परतूनि न पाहे
माझे ऐसें झाले जीवा"🌷🙏
-----------------------------------
💐💐👏👏💐👏🙏😌
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं ७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०७ऑगस्ट२०२१
Comments
Post a Comment