शब्दसुमनांनी भावांजली
🌹शब्दसुमनांनी भावांजली🌹
💐💐💐💐💐💐💐💐
--------------------------------------
...नानाभाऊ माळी
************************
बंधू-भगिनींनो!
आज गुरुवार आहे!गुरुदेव दत्ताचा वार आहे!सारंगखेडा येथील प्रसिद्ध एकमुखी गुरू दत्तात्रयांचा वार आहे!श्रध्दा सुमनांनी समर्पित होण्याचा दिवस आहे!जीवनाचा अर्थ समजण्याचा दिवस आहे!
बंधूनो!...तेरा दिवसांपूर्वी अशाच एका पवित्र आत्म्याने अचानक वैकुंठीच्या प्रवासाला प्रारंभ केला!आज त्यांचा तेरावा आहे!कुणाला न सांगता!न बोलता!जगद्गुरूंच्या उक्तींप्रमाणे सर्वांनाच मागे ठेऊन एकटेच दूरच्या प्रवासाला!परत न येणाऱ्या प्रवासाला निघून गेले!मागे हळव्या आठवणी ठेवून!अतूट नातेसंबंध मध्येच सोडून वैकुंठ गमन केले!नात्यातील, गावातील सर्वांनाच दुःख सागरात ठेवून गेलेत!💐
कळंबू गावं!शहादा तालुका आणि धुळे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेले गाव!अशा या गावालाचं नव्हे तर संपूर्ण आसपासच्या गावात!पंचक्रोशीत दुःख आणि हळहळ मागे ठेऊन निघून गेलेत!ते जीवन मार्गदर्शक होते!पण आज मागे फक्त डोळ्यात अश्रूंचा बांध फोडून गेलेत!सात्विक जीवनाचा सार मागे ठेऊन गेलेत!स्वतः आदर्श जीवन जगतं असतांना आदर्श निर्माण करून उगाचचं पुढे निघून गेलेत!💐
माणूस जन्माला येतो!अनेक चढ उतारांनां सामोरे जात पुढे जात असतो!आपलं कार्यकर्तृत्व मागे ठेवून जात असतो!आपल्या जीवन मुल्यांचा!कार्याचा ठसा उमटवून पुढे गेलेली ही पुण्यवान माणसं इतरांच्या हृदयात जाऊन बसत असतात!ते महात्मे होतात!पुण्यात्मा ठरतात!महापुरुष असतात!पण त्यांच्या पावलांवर चालणाऱ्या पिढीच्या डोळ्यांत अश्रू ठेवून जात असतात!ते निघून गेल्यावर मागे अश्रूंचा महापूर बांध फोडून ओसंडून वहात असतो!💐
बंधू-भगिनींनो!
कळंबू गावातील आणि जवळपासच्या अनेक गावांतील पंचक्रोशीत ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं!असे सर्वांसाठी प्रिय आणि नेहमीचं धावून जाणारे!सर्वांना आपलेसे वाटणारे!आपलेसे करणारे!..शांत,निर्गवी व्यक्तिमत्त्व म्हणजेचं...💐💐💐💐 कै. धनराज(नाना)भिका जाधव!धनराज नाना वायरमन!...यांच्या निधनाची बातमी कळताच जवळपासच्या पंचक्रोशीत शोककळा पसरली होती!स्वतःच्या शेतात काही कामा निमित्ताने जात असतानाचं तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि शेतातच त्यांची प्राणज्योत मालवली!त्यांनी शेतातचं आपला देह ठेवला!💐💐
अतीव शोक आणि दुःख सहन करणे माणसाचा नैसर्गिक स्वभाव असतो!पण चालता बोलता अन तेही अचानकपणे निघून व्यक्ती निघून गेल्याने सर्वांच्या मानाला अतीव दुःख होत असतं!नानांचं दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराचं ऑपरेशनही झालं होतं!नियमितपणे हिरनेफिरणे चालू होतं!आनंद घेत आनंद वाटीत होते!वयाची साठी पार केलेली होती!विवाहित तिन्ही मुलींचा संसार अतिशय उत्तम चालू होता! त्यांची अजिबात काळजी नव्हती!विवाहित मुलगा प्रशांत आणि सुनबाई देखील सोन्यासारख्या संसारात मग्न होते!त्यांचीही अजिबात काळजी नव्हती!उभयता पती-पत्नी सुख सागरात होती!आनंदात होती! उत्तमरित्या नातवंडांशी हितगुज आणि खेळण्यात मग्न होती!💐
कै नानांची काशी यात्रा करून झाली होती!कुठलेही व्याप मागे राहिले नव्हते!एक दिड वर्षापूर्वी एम एस ई बी बोर्डातून निवृत्त झाले होते!ते
गावलाचं एम एस ई बीतं सर्विसला होते!जवळपासच्या अनेक गावांशी भावनिक संबंध होते!जिव्हाळ्याचे नाते जोडले गेले होते!पंचक्रोशीत धनराज नाना म्हणून प्रसिद्ध असणारे एम ई सी बी च्या माध्यमातून घराघरात लाईट पोहचवत होते!प्रकाश देत होते!शेतातील विहिरींवरील मोटारींनां वीज पुरवठा करीत होते!सरकारी सेवा अगदी कष्ट आणि इमानदारीने सचोटीने केली होती!नानांचा निवृत्तीचा सोहळा अतिशय दिमाखदार संपन्न झाला होता!जीवन धन्य झालं होतं!💐
माणसं पेहरण ही कला असते!पेहरलेल्या माणसांच्या हृदयात आपली जागा टिकवून ठेवणे ही महाकला असते!धनराज नानांनी प्रत्येकाच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं होतं!प्रेम जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते!💐💐
अशा या महान योग्याचं निधन वार्ता ऐकून सर्वांना अतिशय धक्का बसला होता!गेल्या चार पाच वर्षांपासून मी ही त्यांच्या हृदयाजवळ पोहचलो होतो!संबंधित होतो!अशा सत्शील व्यक्तींचं निधन मनाला चटका लावून जाणारं होतं!मनाला दुःख देणारं होतं!हळहळ लावणार होतं!त्यांचा स्वभाव आणि कार्य डोळयांत तरंगणारे होतं!💐
कै नाना आपल्या नोकरीतं अनेक गावांच्या पंचक्रोशीत प्रकाश देत राहिलें!उजेड देत राहिले!लाइट देत राहिले!घर घर उजळत राहिले!माणसं जिंकत राहिले!परिवार जिंकत राहिले!गावं जिंकत राहिले!प्रेमझरा पाजीत राहिले!ऊन,वारा!पावसाळ्यात देखील अखंड सेवा देत राहिले!म्हणूनच त्यांच्या जाण्याने
सर्वांना धक्का बसला आहे!जन्म मृत्यू हे अटळ असतात!आपण टाळू शकत नाही!मनुष्य देह हतबल होवून!असाह्य होवून जवळच्यांच्या मृत्यूनंतर फक्त टाहो फोडीत असतो!मृत्यू टाळता येऊ शकला असता तर?मनसोक्त बोलणारे!मन मोकळेपणाने बोलणारे नाना कायमच हृदयात रहातील!आठवणीत राहतील!मनामनात राहतील!
माणसाचं सत्कर्म सदैव मागील पिढीच्या हृदयात जाऊन बसत असतं!कै.धनराज नाना!काशीविश्वेश्वराला भेटून आले होते!काशी करून आल्यावर सर्व मोहापासून अलिप्त असलेले नाना सर्वांच्या ठायी चंदनाचा सुहास देत राहतील!त्यांच्या सत्कार्य रुपात सदैव सोबत असतील!कळंबुतील घराघरात आठवणीत राहतील!त्यांनी सर्वांच्या मनातं विशेष आदराचं आणि अढळ स्थान निर्माण केलं होतं!💐💐
नोकरी आणि आदर्श प्रपंच सांभाळणाऱ्या नानांच्या जाण्याने जाधव परिवारावर!सर्व नातलंगांवर!आप्तजनावरं कळंबू गावावर!समस्त पंचक्रोशीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे!आता त्यातून सावरून पुढे जायचं आहे!💐💐
जीवन क्षणभंगूर असतं!जन्म मरणाच्या फेऱ्यातील अंतरात कै नानां सर्वांना जीवन शिकवून गेले!जगणं शिकवून गेले!आदर्श जगणं शिकवून गेले!भरभरून प्रेम वाटीत गेले!💐💐
जन्म-मृत्यू जीवन नाण्याच्या दोन बाजू असतात!त्याधील अंतरात उत्तम आणि संस्कारित जगणं माणूस घडवत असतो!नानांनी आपल्या कुटुंबावर उत्तम संस्कार केलेत!..सर्वांनाच त्यांच्या आदर्श प्रेमाची,मायेची उणीव सतत होत राहील!जन्म आहे तदनंतर मृत्य ही अटळ आहे!कधी तरी येणारचं असतो!आपण आपल्या आयुष्यात माणसं जमविली!हेच सर्वात मोठे धन असतं!नानांनी माणसं कमविली!कै.नानांची जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होऊन मोक्षप्राप्तीकडे वाटचाल होवो!वैकुंठी पावित्र्याच्या!चंदनाच्या सहवासात एकरूप होवून!सर्वांना आशीर्वाद देत राहावेतं!सर्वांचें अश्रूं फुलें स्वीकारून आम्हा सर्वांना सतमार्गावर चालण्यासाठी दिव्यदृष्टीतून मार्गदर्शन करीत राहावेआपल्या स्मृती सतत आपल्या कार्यरूपात जिवंत राहणार आहेत!हृदयात राहणार आहेत!
निवृत्तीचं सुंदर आयुष्य जगत असतांना आपण निघून गेलात!जाधव परिवार आणि संबंधित नातलंगांवर दुःखाचा जो डोंगर कोसळला आहे त्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो अशी प्रार्थना करतो!💐
.. आज कै.नानांचा तेरावा आहे!काशीचा पवित्र ध्यास लागला आहे!आपणास चिरशांती मिळावी अशी प्रार्थना परंपिता परमेश्वराशी करीत असतांना आपणास आमच्या जीवन श्वासांची माळ अर्पित करतो!भावांजली वाहतो!भावपूर्ण आदरांजली वाहतो!भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो
💐💐💐💐🙏🙏😌
-----------------------------------
....नानाभाऊ माळी,
मु पो ता शिंदखेडा जि धुळे
(ह.मु.हडपसर, पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
दिनांक-०५ऑगस्ट२०२१
Comments
Post a Comment