कथा परीक्षानळीतून परीक्षण
कथा परीक्षानळीतून परीक्षण
----------------------------------
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
...नानाभाऊ माळी
( एक परीक्षक)
--------------------------------
(चाळीस कथा!त्यांचं परीक्षण!महादिव्य!....एकाहून एक सरस कथा!...मला योग आला!मेंदूला झिणझिण्या येणार रटाळ पण भिंगातून शब्द आणि अर्थ पकडण्याचं दिव्य पार पाडलें!परीक्षकाच्या नजरेतून स्वतःला शोधित होतो!...त्याविषयी माझेचं मत!.....प्रज्ञावंत आणि प्रतिभावंतांनी थोडी या लेखनाकडेही नजर वळवावी!हिच आग्रहाची विनंती!).......
🌹🌹🌹🌷🌷🌷
....सर्वच प्रतिभावंत लेखक आणि लेखिकाद्वयिंनो! माझ्याकडे आलेल्या जवळपास चाळीस कथांचं वाचन,परीक्षण करून झालेलं आहे!कथा लेखनासाठी भरभरून प्रतिसाद मिळाला आहे!महाराष्ट्राची सीमा ओलांडून काही कथा आलेल्या आहेत!आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून कथांनी देखील चंचु प्रवेश केलेला आहे! निरीक्षण,अवलोकन, चिंतन, लेखकांची लेखनशैली!प्रवाह, घटना,जीवनातील संघर्ष, स्वानुभव,पर्यावरण,अविस्मरणीय घटना,प्रसंग,जातीयेतेची कच्च्या मातीच्या पण अभेद्य भिंती अजून पडता पडत नाहीयेत यावर भाष्य करणारा विषय!काही कथां स्त्री शोषणाविषयी, अत्याचाराविषयी बोट ठेवत आहेत!अशा अनेक अंगांनी आपल्या कथा!... आपल्या प्रतिभेची साक्ष देत आहेत!..आपल्या कसदार प्रतिभेतून!मनातल्या शेतीतून!...रुजलेल्या लघुकथेचं बीजं टरारून वर आलेंल दिसलं!अन.... अन... आपल्या मनात उचंबळून आलेले अनंत विषय विचारांच्या साथ संगतीने कथा जन्म घेतांना दिसल्या!आपली घुसमट देखील दिसली!🌷🙏
भाषिक सौंदर्यानें नटलेल्या कथा!नवनवीन अर्थानी काटोकाट भरलेल्या दिसल्या!एखादी वैदर्भीय अंतकरणाने!...शब्द बोलानें!.. पानंपान व्यापून अस्तित्व दाखवीत होती!आशय घेऊन पुढे सरकत होती!गडचिरोली पासून मुंबईपर्यंत!..आंध्रप्रदेश पासून कर्नाटकापर्यंत भाषिक गोडवा जाणवत होता!आपल्या कथा जनमानसास संदेश देत आहेत!मानव कल्याणाचा!काही कोकणी साज-बाज अंगावर घालून मिरवत आहेत!एखाद्या कथेनें मराठवाड्यातील भाषिक शब्दशक्तीनीं मनाला भुरळ घातली होती!तर दुसरी कथा मुंबईतल्या विशाल नगरीतून जन्म घेतांना दिसली!भाषिक सौंदर्याने नटलेल्या पण संघर्षाची,जिद्दीची अन परिस्थितीवर मात करण्याची जिद्द सांगणाऱ्या कथा माझ्या ही अंतःकरणात खोल खोल जाऊन बसल्या!अनंत प्रश्न घेऊन उभ्या दिसल्या!बंधू-भगिनींनो!आपल्या कथानी मला ही अंतर्मुख केलेंलं आहे!🌷🙏
विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या आपल्या लघुकथांनी समाज परिवर्तनाचा आरसा दाखवला!वसा घेतला आहे!सामाजिक जडणघडणीचं उत्तम चित्रण केलेले दिसले!कौटुंबिक हिंसाचार आणि स्वास्थ्याची जाणीव करून देणाऱ्या कथा मनाला वेदना देऊन गेल्या!देश चंद्रावर जात असतांना जातीच्या भिंतीला हादरा देणाऱ्या!..... जातीयतेचा बुरखा फाडणाऱ्या कथांनी जणू पूर्वेला नव तेजाचा तांबूस सूर्य उगवतो आहे!असं दूरवर नजर टाकल्यावर अंधुकशी ज्योती नजरेस पडतांना दिसत होती!.. जात जमिनीत गाडली जात आहे असं जाणवतं होतं!स्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या कथां मनाला चटका लावून गेल्या!🌷🙏
बंधू-भगिनींनो!
आपण लेखक या नात्याने समाजाचे आदर्श भाट असतो!जाणीव नेणिवेतून समाजाचं मंथन समाजा समोर मांडून लोकजागृती करीत असतो!आपल्या अंतःकरणातून अवतरलेली आपलें प्रिय अपत्य माझ्याकडे दुडूदुडू पळत आलीतं!चालतं आलीत!... आपल्या सर्व कथांना माझ्या कुशीत घेतले!अंगा खांद्यांवर घेतले!कथांना कुरवाळत होतो!तुमची अपत्य मला माझीच वाटली हो!विविधतेने नटलेल्या!अंगांनी फुललेल्या कथांकडे परीक्षक या दृष्टिकोनातून पहात होतो!....एकाहून एक परिपूर्ण वाटल्या!सरस वाटल्या!सुरस वाटल्या!🙏🌷
न्याय कुणाला द्यावा?सर्वंच हृदयात!...अंतःकरणात जाऊन बसलेल्या!प्रश्न पडला होता,सर्वच माझ्या काळजाच्या गाभाऱ्यात जाऊन बसलेल्या होत्या!एकाहून एक प्रासंगिकतेच्या वाटेवर चालणाऱ्या होत्या...तुम्ही जन्म दिलेली अपत्य माझ्या मनात खोलवर जाऊन बसलेली होती आणि आहेत!🌷🙏
सर्वचं कथा अंतर्मनातून भावनिक आवाहन करीत होत्या! सर्वच सरस!सुरस कथा होत्या!परीक्षक या नात्याने न्यायदंडाधिकारी म्हणून न्यायदान करावेच लागणारे होते!कुणाला न्याय द्यावा? .....??मनाला बजावून सांगितले... कथा लेखकांची सर्वचं अपत्य आता आपल्या बागेत खेळायला..उधळायला आलेली आहेत!माझा ही थोडा अधिकार आहे की नाही बंधू -भगिनींनो???? सर्व अपत्य एकमेकांत एवढे एकजीव झाले आहेत!आता ओळखू येणारे नाहीत!ती आता तुमची नाहीत...आता ती सार्वजनिक झालेली आहेत!मानवतेची झालेली आहेत!मानव समाजाची झालेली आहेत...सर्वच कथा मनाचा ठाव घेत राहिल्या!..मी मग स्वतःचं मनाची समजूत काढली की सर्वांना अतिप्रिय असलेलं स्वतःचं बाळ जेव्हा दुसऱ्याच्या दारात खेळायला जातं तेथेंच दिव्यदृष्टीने त्याची पारख केली जात असते!त्रयस्थपणे त्यांच्याकडे लक्ष दिलं जातं असतं!...मी तेच केलं!...सर्वचं कथा उत्तम आशय विषय घेऊन उभ्या होत्या!आपआपल्या ताकदीने उभ्या होत्या!मी मग माझ्या मनातल्या कोंडवाड्यात कोंडलेल्या या सर्व कथांमध्येंचं जाऊन बसलो!त्यांच्यातलाचं एक झालो!गुराखी झालो!हातात तराजू घेऊन बसलो होतो!हातात गुराख्याची काठी सुद्धा होती!कथानक,आशय!संदर्भ!विषयाची मांडणी!..कुठली कथा किती लिटर घट्ट दूध देईल हे देखील निरीक्षक-परीक्षक या नात्याने बारीकसारीक अनमोल ते शोधत
होतो!अर्थात लोकप्रिय कथा निवडत होतो!🙏🌷
सर्वंच कथा अति उत्तम आहेत!प्रबोधनपर आहेत!आदर्श वाटचालीच्या जनक आहेत!मनाला भावणाऱ्या आहेत!कुणाची निवड करावी या द्वंद्वात असतांना मनरुपी छातीवर घट्ट दगड ठेवला अन परीक्षकाच्या कठोर भूमिकेची अंमलबजावणी केली!मी कठोर आहे का हो?दगडाहून कठीण आहे?मी ही माणूस आहे हाडा मासाचा!🌷
बंधू-भगिनींनो!...माझे हृदय
मेनाहुन मऊ आहे!खोबऱ्या पेक्षा मऊ आहे!....सर्वंच कथांना न्याय देतांना माझीच परीक्षा घेत होतो! डोळ्यातल्या तलावातून मोती घरंगळत होते!.....जाणीव नेणिवेच्या...आशययुक्त कथांना न्याय देत होतो!हातात तराजू घेऊन उभा होतो!स्वतः जगलेल्या!अनुभवलेल्या!पाहिलेल्या..कथानक,चरित्र, स्थळपरत्वे भाषाशैली,मांडणी,संवाद या सर्व बाबींच्या निरीक्षणातून माझ्या सर्व बहीण भावंडांच्या कथांना फक्त माझ्या नजरेच्या!दृष्टीच्या परीक्षा नळीतून पहात होतो!परीक्षा नळी हालत होती!कथारूपी द्रावण वरखाली होत होतं!परीक्षकाच्या परीक्षा नळीतं कथा बुडवीत होतो!लिटमस पेपर....!गुणवत्तापूर्ण कथा सिद्ध करीत!होता!🙏🙏
-----------------------------------
.....नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
भ्रमणध्वनी-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-३०ऑगस्ट२०२१
Comments
Post a Comment