कथेचा जन्म
🌷 कथेचा जन्म🌷
---------------------
...नानाभाऊ माळी
💐💐💐💐💐💐💐
बंधू-भगिनींनो!
एखादा प्रसंग!आकस्मिक घटित घटना!समाजातील व्यंग! डोळे,कान आणि मन प्राक्षुन घेत असतात!मनातील वादळे सतत धडकत असतात!त्यांना थांबविणे महाकठीण असतं!ज्वलंत विषय मनाच्या तव्यावर उकळत असतातं!त्यांचा निचरा होणे अत्यंत आवश्यक असतं! मग संवेदनशील मन त्याचा पाठलाग करीत रहातं!अशा अघटितांची घटित घटना तात्काळ प्रतिकार रूपाने जन्म घेते!आव्हानाला आवाहन करीत ती घटना कथित होते!झर झर झरते!कथा जन्म घेते!थोडक्यात कमी शब्दात लेखणीतून उतरत कथेचा जन्म होतो!.....🙏🌷
कमीत कमी शब्दात अर्थ सांगणारा साहित्य प्रकार म्हणजेच कथा असतें!विषयाची उत्सुकता आणि अतृप्तीच्या ओढीने आशय गर्भात विषयफुलाची कळी उमलत जाते!उमलणाऱ्या फुलांच्या पाकळ्या परिपूर्ण!परीपक्व होत जातात!कथेचं बीज पेरणीपूर्व संवेदनशील मनात येऊन बसत असतं!...मनात संस्काराची प्रक्रिया पार पडत असतें!मनाच्या कप्प्यातल्या संस्कारीत बीजाची पेरणी भुसभुशीत विचार शेतात होत जाते!बंधू-भगिनींनो... ती.. कथा असतें! 🙏🌷
कसदार!संस्काराच्या गर्भातून!कथा जन्म घेते!विचारांची प्रचंड गर्दी मनाला ओढीत नेत असते!बेचैन मन तडफडत असतं!मन उफाळून येत असत!वाफाळून येत असत!उद्वेगातून आणि आवेशातून कथा अवतरते,जन्म घेते!बंधू-भगिनींनो...ती कथा असतें!🌷🌷🙏
नजरेच्या टप्प्यात कथा बसत असतें!कधी कानातून ओढली जात असतें!थेट हृदयात जाऊन बसते तर कधी....हळूच मनात येऊन बसत असते!घटना ज्वलंत होतें!मनाला चटका देते!उभारी देते!मनाला शांती प्रदान करते!....अव्यक्त भाव भळभळू लागतात!मन तडफडू लागतं!डोळ्यांचा बंदिस्त बांध फुटू लागतो!वेदना अश्रूत न्हाऊन निघते!अव्यक्त भाव व्यक्त होतात!बंधू-भगिनींनो!
तेथे कथा जन्म होतो!🌷🙏
आपलं जीवन अनंत घटनांच्या साक्षीने पुढे सरकत असतं!त्या प्रत्येक साक्षी पुराव्यांचा संच म्हणजेचं अनंत कथा असतात!कथा क्षणोक्षणी जन्म घेत असतें!आपल्याच वाटेने पुढे सरकत असतें!सुख-दुःखाला कमी शब्दात बांधून ठेवीत असतें!समाज मनाचं रंजन करीत असतें!आदर्श मार्गदर्शन करीत असतें!... बंधू-भगिनींनो!
ती कथा कथा असते🌷🙏
कथा घराघरात जन्म घेते! अचानक घडलेल्या समाजातील उलथापालथीत तिचा उगम होतो!..मनाचा ठाव घेते!घाव देते!अचानक मनात धाव घेते!..जळजळीत सत्य समोर ठेवते!वास्तवाला सामोरी जाते एक घाव दोन तुकडे करते !तडफडून उठते!..झोपेचं सोंग घेतलेल्यांनां खडबडून जागे करते!..कमी शब्दात पाण्यासारखी वहात रहाते!...अर्थ सांगतें!प्रबोधन करते!ती कथा असतें!ती आरसा दाखवीत असते!बंधू-भगिनींनो!ती कथा असतें!🙏🌷
----------------------------------------
----------------------------------------
....नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२७ऑगस्ट२०२१
Comments
Post a Comment