डॉक्टरातील देवमाणूसडॉक्टर ज्ञानेश दुसाने सर भाग-३रा
🌹🌹🌹🌹🌹🌹
डॉक्टरातील देवमाणूस
डॉक्टर ज्ञानेश दुसाने सर
🌹🌹🌹🌹🌹🌹
भाग-३रा
*******************
...नानाभाऊ माळी
--------------------------------
बंधू-भगिनींनो!
बाळाला भूक लागल्यावर आई त्याला जवळ घेते!..कुशीत घेते!आपल्या उराशी घेते!आई जन्मदात्री असते!...बाळाला सर्वात जवळची आईचं असते!आई सर्वस्व असते!बाळाचं विश्व असते!विश्वास असते!श्रद्धा ही आईचं असते!🌷
............. बघानां!रेशीम धाग्यांनी नातं कसं घट्ट बांधलेलं असतं..आई-मुलांचं!मुलगा-वडिलांचं!घरातील बहीण भावंडांचं नातं देखील नैसर्गिक भावनेतून,श्रद्धेतून जन्माला येत असतं!श्रद्धा.. नात्यांच्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असतें!परिघावर अन परिघाच्या आत नातं भावबंधनात फुलांसारखं फुलतं असतं!जपलं जातं असतं!प्रत्येकाच्या हृदयात वास करीत असलेली श्रद्धा सर्वांना पवित्र घट्ट धाग्यांनी बांधत असते!जीवन सुगंधित करीत असते!🌷
गुरू अन शिक्षक हे श्रद्धेचं उत्तम ठिकाण असतं!आदर्श जीवन जगण्याचा हमरस्ता असतो!माथा टेकण्याची पवित्र जागा असते!भीतीयुक्त आदराचं पवित्र मंदिर असतं!गुरुजनांच्या उत्तम संस्कारांनी आदर्श पिढी घडत असते!....सोपा गणित विषय कधी कधी कठीण वाटू लागतो!पण त्यामुळे सुद्धा विध्यार्थ्यांचं भावी करीअर बदलू शकत!टर्निंग पॉईंट येत असतो!...डॉक्टर ज्ञानेश दुसाने सर प्रसिद्ध इंजिनिअर होता होता प्रसिद्ध डॉक्टर झाले!मशिनरीचे तज्ञ होण्या ऐवजी माणसांचे डॉक्टर झाले!म्हणूनचं गुरू आदर्श जीवनाचे शिल्पकार असतात!कच्चे मडके भाजून पक्के करीत असतात!...समाज घडवीत असतात!...अन!..अन.. डॉक्टर दुसाने सर शिक्षकांच्या योगायोग अपघाताने प्रसिद्ध डॉक्टर झाले!
आपल्या पासून कधीही लांब न गेलेला आपला मुलगा आपल्या पासून दूर जाऊ नये म्हणून भोळ्या भाबड्या आईस वाटतं असतं!त्यासाठी देवाला साकडे सुद्धा घालते!पण भावी कल्याणासाठी आईच्या ममतेची आर्जव देवाने ऐकली नाही!पुण्याला मेडिकलला नंबर लागला!आईला शिक्षणाचं महत्व कळले!..आणि आई मनातल्या मनात आनंदित झाली होती!...ती ममतामयी!प्रेमळ आई डॉक्टर दुसाने सरांची होती!..तिच्या डोळयांतील आनंदाश्रूनां वाट करून देणारी कोमल हृदयी डॉक्टरांचीचं माय होती! आई होती!🌹
श्रद्धाळू मन शांत,शीतल असतं!श्रद्धा सर्वांना पावित्र्याजवळी नेतं असते!पावित्र्यातून पवित्र कर्म घडतं असतं!मानव समाज पारदर्शक बनत असतो!पारदर्शक श्रद्धा मानव कल्याण,मानव हित पहात असते!...बंधूंनो!... अपार कष्टातून,मन लावून ज्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं!त्या डॉक्टर ज्ञानेश दुसाने सरांनी डॉक्टर झाल्यावर आपल्या वडिलांच्या प्रेमळ आग्रहाखातर धुळे मिलच्या दवाखान्यात देखील काम केले होते!नंतर मध्यप्रदेशाला लागून धडगाव सारख्या अतिदुर्गम भागात काम केले!सातपुड्याच्या चौथ्या आणि पाचव्या रांगेत काम करणे म्हणजे लोकं त्याला काळ्या पाण्याची शिक्षा म्हणतात!..अर्थात जिथे फक्त जंगल आहे!आदिवासी बांधव आहेत!तुटपुंज्या आरोग्य सुविधा आहेत!जगाशी संपर्क नाही!राहायला सुद्धा घरं व्यवस्थित नाहीत अशा भागात सलग पाच ते सहा वर्षं स्वतः कुटूंबासहित राहून तेथील आदिवासी बांधवांची श्रद्धेने सेवा केली!🌷
..आरोग्य रक्षक बनून!देवदूत बनून सेवा देत होते!...एक उच्च शिक्षित डॉक्टर अति दुर्गम भागात धड रस्ते नाहीत अशा ठिकाणी स्थानिक आरोग्य सुख दुखाशी समरस झाले होते!तेथील जीवन आणि जगणं देखील आत्मसात करीत होते!का करीत होते हे सर्व ?मनात श्रद्धा होती!कामाप्रति विश्वास होता!मानवसेवेचं व्रत होतं!सर्वात महत्वाचं म्हणजे एक आव्हान होतं!ते आव्हान पाच वर्षे स्वीकारले आणि पार ही पाडले!
...बंधूंनो!मनात भाव असला की सर्व समस्यांवर मात करीत साक्षात्कारी देव भेटत असतो! काळे पाणी असू द्यात की निळे असू द्यात!...वरती आकाश निरभ्र निळेचं असतं!सुखावत असतं!आपणास उड्डाणासाठी प्रोत्साहन देत असतं!ते सुंदर मनमोहक असतं तंस ते भावते!...मग काळे का स्वीकारु नये?मनात श्रद्धेचा उगम झाला की सर्व काही सार होऊन आनंद देत असतं!🌷
बंधू-भगिनींनो!
आज हडपसर,पुणे येथे साऱ्या सुविधांसहित "श्रद्धा हॉस्पिटल" आहे!अपार श्रद्धेतून!कष्टातून!...लोक सेवा केलेल्या आशीर्वादातून "श्रद्धा हॉस्पिटल" जन्माला आलं!....डॉक्टर दुसाने सरांनी इतर सर्व बांधवांसमोर आदर्श निर्माण केला आहे!जगण्याची रीत स्वकृतीतून समोर ठेवली आहे!...आदर्श ठेवला!
आईवडिलांवर आपली अपार भक्ती आणि श्रद्धा असते!...गुरुजन प्रति श्रद्धा असतें!....आणि आपण आजारी पडलो तर आपलं शरीर डॉक्टरांच्या हवाली करून आपण मोकळे होतो!....कारण आपण डॉक्टरातं देव पहात असतो!मनाचा देव असतो!विश्वासाचा देव असतो आणि श्रद्धेची भक्कम तटबंदी उभी असतें!...म्हणून आपण डॉक्टरांनां देव मानत असतो! पुण्यातील,महाराष्ट्रातील प्रसिद्ध डॉक्टर दुसाने सर श्रद्धेपोटी आपलं प्रसिद्ध "श्रद्धा हॉस्पिटल"आनंदाने चालवीत आहेत!आपल्या प्रति आमच्या ही मनात श्रद्धाभाव वाढीस लागावा हिच ईश्वरास प्रार्थना करतो!श्रद्धेला धुमारे फुटावेत!आणि आपल्या सारख्या हसतमुख डॉक्टर आणि विनोदी साहित्यिकास माझ्या मनातल्या श्रद्धेतून पुजतो आहे!🌷
.............................
डॉ ज्ञानेश दुसाने सरांचा
मो.नं ९८२२६१७७६६
--------------------------------
🌹👏🌹👏🌹👏🌹
**********************
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२०ऑगस्ट२०२१
Comments
Post a Comment