उजेड खोदीत आहे
🌹🌹🌹🌹🌹
उजेड खोदीत आहे
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
--------------------------------
....नानाभाऊ माळी
*********************
रोज निवडीत आहे
तन मनी वाढलेले
नकोसे ते राहिलेले
मोकाट काढलेले...!🌹
हवेहवेसे वाटणारे
क्षण गेलेत उडुनी
पाठलाग करणारे ते
मज गेलेतं सोडूनि...!🌹
सूर्य पाठमोरी उभा
मज कवेत घेत आहे
गुदमरून पळतांना
पश्चिमेस जात आहे...!🌹
अंधार सावल्यांतुनी
ज्योति शोधितो आहे
मगरमिठीच्या रात्रीत
उजेड खोदीतो आहे...!🌹
असेल चुकलो वाट
झालीच चूक माझी
आता निवडीतो आहे
सुख दुःखाचीचं भाजी..!🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷
---------------------------
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१९ऑगस्ट२०२१
Comments
Post a Comment