डॉक्टरातील देवमाणूसडॉक्टर ज्ञानेश दुसाने सर भाग-२रा

🌹🌹🌹🌹🌹🌹      
डॉक्टरातील देवमाणूस
डॉक्टर ज्ञानेश दुसाने सर
🌹🌹🌹🌹🌹🌹
       भाग-२रा
******************
...नानाभाऊ माळी
-----------------------------
बंधू-भगिनींनो!
आदर्श हा जीवनाचा आधार असतो!मानसिक आधार असतो!जगण्याची दिशा सापडत असते!भरकटलेल्या समयी हा आधार आपल्याला योग्य दिशा दाखवीत असतो!अनेक आदर्श व्यक्ती आपल्या हृदयात निवास करीत असतात!ते इतरजनांचे आदर्श का झाले असावेत?त्यांचं भूषणावह कर्तृत्व निश्चितच मानव समाजाला उपयुक्त असेल म्हणून पुढील पिढी त्यांच्या आदर्शांवर चालायचा प्रयत्न करीत असतात!

...ज्यांच्याकडुन आदर्श घ्यावा असे....आदरणीय डॉक्टर ज्ञानेश दुसाने सर देखील आहेत!ते MBBS,MS,FAIS,FMAS
FICS, FIAGES पर्यंत शिकलेले आहेत!आणि मानव सेवेत मग्न आहेत!ते मानवी शरीराचे डॉक्टर तर आहेतच पण विनोदी कथाकार देखील आहेत!..पण एक गिरणी कामगाराचा मुलगा परिस्थितीवर मात करीत इतरांसाठी आदर्श समोर ठेवला आहे!..त्यांच्या विषयी हा दुसरा भाग(लेख) आपल्या समोर ठेवतो आहे!...आपणास हा लेख पसंतीस उतरेल अशी आशा बाळगतो!जीवनदर्शन हेच लेखाचं प्रयोजन आहे!हाच माझा उद्देश आहे!कृपया सर्व कृपाळू वाचकांनी देखील मला मार्गदर्शन करावे ही विनंती करतो!
👏👏👏👏👏👏👏
तर लेख असा आहे......
🌷🌷🌷🌷🌷
बंधू-भगिनींनो!
प्रताप मिल!.... रात्रंदिवस खटखट असा आवाज करीत चालणारी कापड मिल!...सूत काढणारी मिल!उत्पन्नाची जीवन रेखा सांधनारी मिल!...मालकांना नफा मिळवून देणारी मिल आणि तेथील कामगारांच्या पोटाचा प्रश्न ही सोडवणारी मिल!होय धुळ्यातील प्रताप मिल होती! रात्रंदिवस मिल कामगार राबत होता!अपुऱ्या पगारात जगत होता!महिन्याकाठी पैसे संपल्यामुळे उसनवारी नाहीतर व्याजाने पैसे घेऊन,दिवस-रात्र कर्जात बुडालेला अन राबणारा मिल कामगार फक्त दोन वेळच्या जेवणासाठी राबत होता!जगत होता!कर्जात बुडत होता!खंगुंन खंगुंन मरत होता!व्यसनाधीन होत होता!🌹

..खिशात पैसा नाही!उत्पन्न कमी!खाणारे तोंडं जास्त!ताणतणावाने व्यसनांच्या आहारी जाणारी माणसं!माणसं राहिली नव्हती! मुक्या प्राण्यासारखी!ती गुरं-ढोरांसारखी जगत होती!प्रताप मिलची ख्याती वाढत होती!पैसा वर साठत होता!खाली कामगार भरडत होता!त्यात संप नावाचं तीक्ष्ण हत्याराने कपडे बनवणाऱ्या मिलची कापडं भोसकली होती!🌹

 गिरणी व्यवस्थित चालू होती तोवर पोट तरी भरत होतं!नंतर मात्र गरीब!बकाल!दरिद्री!.. कामगार पुरता मोडून पडला होता!कामगारांची संपूर्ण वाताहत झाली होती!गिरणीच्या संपाने कुटुंब उध्वस्त झाली होती!🌹

 फुलाची कळी उमलावी!फुल हसत राहावं!सुंदरतेच्या सुहासिक क्षणांनी सार जग सुंदर!निर्मळ!दिसत रहावं !सुंदरतेची वाढ नैसर्गिक होत जावी!.... हाचं निसर्ग नियम सातत्याने चालू असतो!...पण...पण..बंधूनो!..
संत ज्ञानेश्वर महाराज कमी वयातचं या निसर्ग नियमाला अपवाद ठरले होते!जीवन कळी उमलत असतांना!सुंदर जगाची ओळख होत असतानाचं दुःख अंधार होऊन सामोरे यावे!बाल मन चुरगळलें जावे!सर्व ओरबाडून न्यावे?सर्वचं चहूबाजूनी असाह्य आणि असह्य झालेलं जीवन त्यांच्या वाट्यास आले होतें!असह्यतेवर मात करीत पुढे भागवत धर्माची पताका हाती घेऊन पुढे पुढे चालत राहिले!मानव कल्याणाची!भक्ती संप्रदायाची शिदोरी वाटीत वाटीत पुढील पिढीसाठी शिल्लकही ठेऊन संजीवन समाधिस्त झाले!हे सर्व बालपणीच घडून झाले होते!🌹

...तद्वतच बंधूंनो!.. प्रताप मिल कामगारांचा मुलगा!छोटासा मुलगा!कमी वयातला मुलगा!कोमल वयातलं सहजपणे जगणे-टिपणे सोडून!समज येण्याची वाट न बघता कमी वयातचं थोराड झालेला मुलगा! केवळ दारिद्रय परिस्थितीमुळे लवकर समज लादली गेली होती! त्याचं नाव ही ज्ञानेश्वरचं आहे!अर्थात ज्ञानेश आहे!याच्या पदरी सुद्धा अतिकष्टाचे भोग आलेत होते!...कळी उमलत असतानाचं दुःख,कष्ट पदरी पडाव?अचानक थोराडपनं येऊन जबाबदारीची जाणीव व्हावी?🌷

प्रताप मिलच्या जवळपास 
गवळीवाडा-मोगलाई आहे!त्याचं भागात रहाणे आलं होत!हा भाग सर्व बाबतीत नामांकित होता!
ज्ञानेशचें वडील प्रताप मिलमध्ये कामगार होते!त्यांचं नाव घन:शाम होतं!त्या नावाची प्रतिमा जपत होते! जगत होते!घन:शाम म्हणजे कृष्ण म्हणूयात!घननील म्हणूयात!सावळ्या हरी म्हणूयात!एवढ असून सुद्धा त्यांच्या कपाळी,त्यांच्या भाळी अन भाग्यात गरिबीचा न पुसता येणारा पक्का शिक्का ठोकलेला होता!शिक्का पुसता येत नव्हता!फाडता येत नव्हता!तोडता येत नव्हता!🌹

.....तुटपुंज्या पगाराची सवय झालेल्या व्यक्तीस प्रकाशाची!उजेडाची!.. स्वप्ने कधी ही पडत नसतात!अंधारातील दरिद्रीपण त्यांना सुखावह वाटत असतं!तेच त्यांचं आयुष्य असतं!तीच त्यांची जागा असते!जगणं असतं!जीवन असतं!घनअंधारात चाचपडण्यातलं समाधान मानणाऱ्या लोकांपैकीचं घन:शामदादा होते!महिना संपताना!..पगारा आधी.. कर्ज घेऊन जगण्याची मिल मजुरांनां अंगवळणी पडले होते!सावकारी कर्ज उभं राहू देत नसतं!आपल्यातील रक्ताचा एक एक घोठ पीत असतं!थेंब थेंब पीत असतं!माणसाला लाचार बनवून सोडीत असतं!त्यात घन:शाम दादा अपवाद नव्हते!🌷

सर्व बाजूंनी चिखल असतो!पाय चिखलात रुतत जात असतात!तळपायापासून डोक्यावर चिखल येईपर्यंत धडपड चालू असते!अशा चिखलात कमळ अलगदपणे वर येत असत!चिखलात राहून सुद्धा सुंदरतेचं....लोभसवाणे रूप हृदयाला स्पर्श करीत असत!चिखलाचा गुण न घेता स्वतःचं,स्वतंत्र अस्तित्व जपत असतं!कमळ देव्हाऱ्यातल्या देवाजवळ जाऊन बसतं!
ज्ञानेशचं बालपण गवळीवाड्यात!मोगलाईत आणि महाले नगर मध्ये गेलं!गरिबीचे चटके बापणातचं बसले!इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचं शिक्षण धुळे नगरपालिकेच्या १४नंबर शाळेत झालं!पुढे आठवी ते अकरावी पर्यंतचं शिक्षण जे आर सिटी हायस्कुलमध्ये झालं होतं!१२वी... एस एस व्ही पी एस कॉलेजमध्ये पार पडले होते!प्रत्येक वर्षी वर्गातला पहिला नंबर सोडला नव्हता!परिस्थिती माणसाला घडवीत असते!उभं करीत असते!

आठवीच्या वर्गातील मित्राच्या नातलगाच्या लग्नात दोन पैसे मिळावेतं म्हणून गॅस बत्ती डोक्यावर घेऊन वरातीत कामाला होता!चालतांना डोक्यावर गॅस बत्ती असल्याने डोक्याखाली अंधार होता!वर उजेड होता!मित्राने अंधारामुळे चेहरा पाहिला नव्हता!ओळखला नव्हता!त्यावेळच्या परिस्थितीने अंगात दरदरून घाम फुटला होता!मित्राने ओळखले असतें तर?वर्गात एक नंबर मिळवणारा ज्ञानेश "हे काम करतो!" ....या परिस्थितूनही गेला आहे!🌹

सुंदर जगाला!.. सुंदरतेच्या जवळी नेणारी कमळाची फुलं चिखलात उगवत असली तरी स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवीत असतात!जगासाठी झिजत असतात!स्वतःचे अश्रू लपवून इतरांना आनंद देत असतातं!हसवीत असतात!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
बंधू भगिनींनो!
पुन्हा भेटूया आदरणीय डॉक्टर ज्ञानेश दुसाने सरांच्या कार्य कर्तृत्वाविषयी..०३ऱ्या भागात!
तोपर्यंत नमस्कार!🌷🌷
डॉ.ज्ञानेश दुसाने
 मो.नं-९८२२६१७७६६
-----------------------------------
....नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो नं -७५८८२२९५४६
         ९९२३०७६५००
दिनांक-१८ऑगस्ट२०२१

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)