डॉक्टरतील खरा देवमाणूस डॉक्टर ज्ञानेश्वर दुसाने भाग १ला

🌹🌹🌹🌹🌹🌹
डॉक्टरतील खरा देवमाणूस
डॉक्टर ज्ञानेश्वर दुसाने
🌹🌹🌹🌹🌹🌹
-----------------------------
...नानाभाऊ माळी
----------------------------

बंधू-भगिनींनो!
आज१५ऑगस्ट!प्रिय आमुचा भारत देशाचा स्वातंत्र्य दिन!भारतीय स्वातंत्र्याचे ७५वे वर्षारंभ आणि अमृत महोत्सव!....जुलमी राजवटीतून मुक्ती होण्यास ७५वर्षं झालीत!अनेक शहीद आणि स्वातंत्र्यवीरांना आदरपूर्वक नमन करण्याचा आजचा दिवस आहे!त्यांच्या कार्य कर्तृत्वास सलाम करण्याचा आजचा दिवस आहे!स्वातंत्र्य दिन आहे!आज१५
ऑगस्टच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!🌹

अखंड भारत देश मागील पिढीचं त्याग आणि बलिदान कधीही विसरणार नाही!बलिदानातून नवनिर्मितीचा उदय होत असतो!त्यागातून स्थिरतेचा प्रारंभ होत असतो!दुसऱ्यांसाठी जगण्या-मरण्यातून परोपकारी जीवनाचा प्रारंभ होतं असतो!देशासाठी बलिदानातून गौरव आणि सन्मान प्राप्त होत असतो!मानव समाजासाठी झिजण्यातून आत्मानंदाचा सर्वोच बिंदू निकट येत असतो!मानव कल्याणाच्या ध्यासातून आत्मबोध होत असतो!आपल्या जगण्याला अर्थ येतं असतो!सेवा कुठल्याही क्षेत्रातील असो!देश सेवा!समाज सेवाचं असते! श्रद्धाभावातून केलेली सेवा आपल्या जगण्याला अर्थ देत असतें!आपल्या दारी पुण्याचं एक एक पाऊल येत असत!🌹

माणसाचा जन्म मुळातच संघर्षातून स्वतःला सिद्ध करण्यासाठी झालेला असतो! संघर्षाची पार्श्वभूमी भिन्न भिन्न असते!पण जीवनासाठी संघर्ष अटळ असतो!यशस्वी होण्यासाठी, जगण्यासाठी संघर्ष करावाचं लागतो!त्याशिवाय जीवन वृक्षाला फळं येत नसतात!गोड फळं येत नसतात!डोळे हा जग पाहण्यासाठी दिलेला अतिमहत्त्वाचा अवयव आहे!त्यातून अवलोकन करीत असतां जेव्हा त्याचं डोळ्यात अश्रूंचा तलाव गोळा झालेला असतो!अंगातून घामाच्या धारा निथळत असल्या अन ते दोघेही समाज कल्याणासाठी असेल तर जीवन निश्चितच कृतकृत्य झाल्यासारखं वाटत असतं! एखाद्याच्या संघर्षातून सर्वांना सर्वांग सुंदरतेच्या जवळ नेत असेल तर त्यांस... तृप्तीचा!.....समाधानाचा साक्षात्कार झाल्या शिवाय रहात रहात नाही!सर्वोच्च झाल्याशिवाय रहात नाही!🌹

बंधू-भगिनींनो!
मलाही काल१४ऑगस्ट रोजी, घामातून सुगंधीतं चंदनाचा सुहास देणाऱ्या एका महान व्यक्तिमत्वाचं देवदुर्लभ दर्शन झालं होतं!महान विचारवंत आणि तत्वव्यत्याशी बोलण्याचा सुवर्ण योग जुळून आला होता!🌹

 ज्यांनी..ज्यांनी..लहानपणी......
गरीबीमुळे लग्न वरातीच्या मिरवणूकीत रात्री डोक्यावर गॅसबत्ती धरून चाललें होते! आपल्याचं वर्गमित्राच्या घरातील लग्न वरातीत गॅस बत्ती घेऊन चालले होते!वर्गात एक नंबर येणारे शेवटुन पहिल्या असलेल्या वर्ग मित्राच्या घरच्या वरातीत डोक्यावर गॅस बत्ती धरून चालले होते! गल्लो गल्लीत गुल्फी विकून आई-वडिलांसोबत गुजराण केली होती!तोच मुलगा कष्टातून प्रसिद्ध डॉक्टर होतो!मेडिकल मधील अनेक पदव्या घेतो!समाजाचा आरोग्य रक्षक होतो!देवदूत होतो!दुसऱ्यांचे अश्रू पुसतो!स्वतः हसत दुसऱ्यानां हसवतो!दुःखी कुटुंबाला आपल्या आरोग्य सेवेतून जीवदान देतो!अतिशय अवघड सर्जरी करून मारणाच्या दाढेतून वाचवितो आहे!आणि...आणि साहित्य प्रांतातून देखील आपल्या खुमासदार, विनोदी शैलीतून लेखन करणारें कथा लेखकाचं नाव आहे डॉक्टर ज्ञानेश्वर दुसाने!🌹

....डॉक्टर ज्ञानेश्वर दुसाने सरांचं शिक्षण आहे...MBBS, MS,FAIS,FMAS,FICS(USA),FIAGES,DAEG(GERMANY)!आपला देश १९४७साली १५ ऑगस्टच्या शुभदिनी इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त झाला!आपण स्वतंत्र झालो!स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत!आज स्वातंत्र्य दिनाचा आनंद सोहळा साजरा करीत असतांना मागे वळून पाहिले असता अतिशय कष्टातून हे यश प्राप्त झाले आहे असेच म्हणावे लागेल!🌹

 डॉक्टर ज्ञानेश्वर दुसाने सर आज आपल्या जीवनात आनंदी आहेत!यश शिखरावर आहेत!स्वतः हसत इतरांनाही आनंद देत आहेत!.....पण त्यासाठी लहानपणापासूनचं जे कष्ट त्यांच्या नशिबी आले!....त्यावर मात करीत!असह्य यातनांनां!वेदनांनां सामोरे जातं सर्वांसाठी सुगंधित फुलांचं झाड-वेल लावत राहिले!त्यास खत पाणी देत राहिले!...अन आज त्याचं झाड वेलींचा सुगंध इतरांना देत आहेत!सुंदर जगणं मांडीत आहेत!....🌹🌹🌷🌷🌷
त्यांच्या सुंदर जगण्याची ओळख पुढील भागात करणार आहोत!....तोपर्यंत नमस्कार!...आपणा सर्व देशवासियांना आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अनेक हार्दिक शुभेच्छा!🌹🌹🌹🌷
--------------------------------------
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
         ९९२३०७६५००
दिनांक-१५ऑगस्ट२०२१

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)