भुके-तिसे वावर
💧💧 भुके-तिसे वावर💧💧
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
...नानाभाऊ माळी
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
....डखडख व्हयेल मानोस
चाचम्हा आडा पडी ऱ्हायना
........पोट पाट बठ्ठ सफाट
ऐकला कोयप व्हडी ऱ्हायना
रवरव आंग करा गुंता
ढग शाना ऱ्हायना नई
इतरांयेलं घोड उधयी
खल्ली शितडा गयना नही
मेघुराया गर्जत नही
जिमीनम्हा पानी व्हात नही
नेतीबन काम करागुंता
खेतीम्हा जीव लागत नही
दुस्काय डोये खेयी ऱ्हायना
पीक भुरभुर उडी ऱ्हायनं
फुटा पडेल जिमीनम्हा
.......नको ते घडी ऱ्हायनं
पोरे नाचतंस कोठे हो आते
धोंड्या डकसा बांधत नही
पोट वाट देखी देखी
माय भाकर रांधतं नही
पोटपाट व्हयी सपाट सुपाट
निय्या दिन चालना ग्यात
हुनकेल जगनं कोनलें सांगी
आयकनारा मुकला ग्यात
इस्टेन बारदान उलगायीसनी
ऱ्हायेल सर्गे चालना ग्यात
मोलमजुरीनां व्हका धुंडी
दिन बठ्ठा हाल नां ग्यात
ल्हावलबेरम्हा पयेतस येडा
सोतां संमजी तरनांबांड
वावरथींनं मोबाईलम्हा डोया
कामचोऱ्या मोक्या सांड
-------------------------------
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
...नानाभाऊ माळी
मु पो ता शिंदखेडा जि धुळे
ह मु हडपसर, पुणे
मो नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
Comments
Post a Comment