व्हय कर्णगत दानी

🌧️व्हय कर्णगत दानी🌧️
💧💧🌤💧💧
...नानाभाऊ माळी
🌱🌱🌱🌱🌱
असा कसा रे पयीं गया 
वावरल्हे सोडीसनी दूर
 टाकी ऱ्हायनातं पिके मानां
डोयान्हा काढीसनी पूर.....🌷!

किरकोडा कोरी ऱ्हायनातं
  जिमीन नं पहिरेलं बिवारं
  पानी सोशी ऱ्हायनं वार्ग
 तिशी से गहिरेलं जीवार...🌷!

 नाची ऱ्हायना धोंड्या गावभर
आभायलें गह्येरं फोडागुंता
पोक्कय डबडा समुंदर जातस
जमीनलें पानी धाडागुंता...🌷!

मिरीग सरी दिन चालनात
पखालं पानीनी से खाली
 पयेस हेला डबडां खाली
पिकेस्ना तूच देवबा वाली....🌷!

माना टाकेल लेकरें देखी
डोया झामलतंस पानी
एकडाव टकोराबन येरें आते
व्हयी जाय कर्ण संगे दानी..🌷!
    🌤-------🌧️---------🌤
🌱🌱🌱🌱🌱🌱
...नानाभाऊ माळी
मु.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर,पुणे
मो.नं ७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-०४जुलै२०२१

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)