धोंड्या पानी दे नां
🌷🌧️धोंड्या पानी दे नां🌹
🌹💧--------🌱-------💧🌹
....नानाभाऊ माळी
🌷🌹🌷🌹🌧️🌷💧🌹
भाऊ बहिनीस्वन!
वरसारदन्हा भरोसा शेतकरीलें तंनगाडी ठेवस!हवामान खातानां अंदाज चुकाडी ठेवस!बे भरोसे पानी आक्सी जगन्हा पोसिंदानी कसोटी लेत ऱ्हास!उंडायां-हिवाया आश्या आठ महिना पानीनी वाट दखतं ऱ्हास!शेतकरी कस्ट करी-करी जगत ऱ्हास!डोयान्हा आंसू गायेत ऱ्हास!मेहनत करीसनी भी हाते काही लागत नई!ईकी-टूकी बेपारी धड व्हत ऱ्हास!🌷
कुनबीनां डोयांम्हा आंसू येत ऱ्हातंस!वरसारदम्हा पानी पानी करत ऱ्हास!चटकाडे उननं वार्ग कानफट्या शेकत ऱ्हास!उन सरावर...रोहिनी धीवसा देत ऱ्हास!आथी तथी फवारा मारी निंघी जास!रोहिनीन्हा
फवारामां तीस पुरी व्हत नई!...तपेल जिमीनलें फवारा मारेल रोहीन्या पोटम्हानी आगलें आखो जागे करी जात ऱ्हास!🌷
जिमीन तपतं ऱ्हास!धपत ऱ्हास! पानीगुंता तयमय करत ऱ्हास!पानी पेवागुंता काकूयीदी करत ऱ्हास!मिरीग झोडागुंता टपेल ऱ्हास!पानी झोडी-झाडी!झाडे
आडा पाडी!...जंगल शिवारलें नाचाडंत ऱ्हास!टापू नं टापू सोडी मिरीग पडत ऱ्हास!कोल्ला बांधवर निय्यागार कोंब दिखाले लागी जातस!डोयालें जथ बन तथ निय्यान्हा सिंनगार नजरें पडत ऱ्हास!पानीनां बुंद नं बुंद
निय्यालें जिमीनम्हायीनं वर काढत ऱ्हास!हिरवयीन लेकरू...कोंब हासत वर येत ऱ्हास!🌷
आऊते ढागेंढागं वावरेस्ना रस्ते पयेत ऱ्हातंस!नांगरणी!वखरनी
,सफाटी आनी जमीनम्हा कुसल्या घुसतं ऱ्हातीस!वाफ व्हवावर
पह्येरनी व्हत ऱ्हास!पांम्हेरंन्ह्या कुसल्या बी-बीवारानां आंगवर माटीनी झावर पांघरतं ऱ्हातंस!
माटी आंगवर ढकलतं ऱ्हास!
माटी पंघरेलं बिवारागुंता शेतकरी पानीनी वाट दखतं ऱ्हास!..माटीनं खाले वलम्हा दाना ठायका फुगी-फागी!माटी उस्कटी कोंब टरटर वर येत ऱ्हास!पाम्हेरंनी लाईन धरी!धव्या-निया चाचे नेम्मंनं हासत वर येत ऱ्हातंस!
मातर वल नई ऱ्हायनी ते जिमीनम्हानं बी कोंब काढता- काढताचं ठायकं मान टाकी देस!!दुबार पह्येरनीम्हा कुनबी पुरता हात टेकी देस!आथाईन-तथाईन कर्ज काढी ल्हेस!उसनवारी करी ल्हेस!जीव वती!मेहनत करी!पानीन्हा भरोसावर आखो पह्येरनी करी टाकस!...आगात पह्येरनी मव्हरे पसात व्हयी जास!पानी.. मव्हरे हात आखडता ली ल्हेस!शेतकरी कर्जबजारी व्हयी जास! तरी भी वावरन्हा पोटम्हा उचली-वाचली पह्येरी टाकी देस!मंग वरसारदनी वाट दखत गीनंती करत ऱ्हास!🌷
आतेचं मांगलां पंधरा-तीन हाट झाये!...मिरीगपाउत पाऊसनीं आथि-तथि शीर-शीर सुरू व्हयी जायेलं व्हती!शेरा वर शेरा यी ऱ्हायंतात!पानीनां डाबरा नं डाबरा भरी ऱ्हायंतात!तिष्या-भुक्या वावरे घटाघट पानी पी गरायी ऱ्हायंतात!मिरीगनां पानी रफ रफ करी!झोडी-झाडी नागरेलं मोठंल्ला ढेकाया फोडी निंघी ग्या!वावरम्हानां ढेकाया साखरनांगत पघयी ग्यात!पडता पानी देखी कुनबी हारकी जायेलं व्हता!मिरीग जिमीनन्हा कायेजम्हा पानीन्हा फवारा मारी गयेता!कुनबी उज्जी फुली जायेल व्हता!खुश व्हता!🌷
पहिलेंग ते रोहिनींस्मा आंगलें घाम फोडी फोडी मुकला गदारा व्हत ऱ्हायना!गदारा...मानोस्ले,
जित्रबलें आनी वावरेस्ले व्हत ऱ्हायना!बठ्ठास्ना घाम व्हढत ऱ्हायना!घाम फोडत ऱ्हायना!रोहिनीनां घाम मिरीगनां पानीम्हा वलातं ऱ्हायना!घाम धवात ऱ्हायना!कुनबी हिरदथुन गरायेतं ऱ्हायना!🌷
मंग हाऊ पानी पयेना कता?
🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️
"पानकायानी झडी सोडी
भादानं उन पडी ऱ्हायन
घोंगडी-छत्री वरथुन काढी
कोंमलांयेल पीक बयी ऱ्हायन!
कटबन कटावंनां पानी तू
लेकरें सोडी पयीं ऱ्हायनातं
मानोस जीतरब जीवशिवनां
मायबाप व्हयी तू ऱ्हायनातं!🌧️
अभराय निय्येगारं देखी
कायेज कुनबीनं दुखायनं रें
पोट पाटे येल हाळवायलें
ठेव बाशी कुशी सकायनं रें!🌧️
करू नको रें कटाया देवबा
फुसलायी पटलाई पयेत ये नां
बठ्ठा वावरें खंगयी काढ तू
घोडे बठी पानी लयेत ये नां!"🌧️
.....बिघा!दोन बिघा!परतंनभर वावरवाला! बिच्चारा...... कोरडंबोंड्या!तोंड झोडया!
पानीगुंता नेटे-केटे येल कुनबी.....डोयांम्हा आंसू
गोया करी बठेल व्हता!ज्यांनी मुकली खेती से...तो भी वर दखत अभरायम्हा ढग धुंडी ऱ्हायंता!मिरीग फवारा मारी निंघी ग्या!पाठ दखाडी दूर पयी ग्या!आते उन चटकी ऱ्हायनं!रातले थंडगार वार्ग सुटी ऱ्हायन!ढगनां तुकडा नजरें पडी नई ऱ्हायनांत! काहीस्नि देव भरोसे पह्येरी टाक!माटीन्हावर आथा-तथा कोंब दिखनात!नेक्टचं
बायतीन व्हयेल वावरल्हे पानी नई!पोटलें नई!कमी दिनन्ह कव्यजरतं लेकरू!धाकल्ला जिमीनन्हा वर येल कोंब!.. भुक्या-तिश्या जीव काढी हुभा व्हतात!... काही हुभ से!बाकीनं मान टाकी ऱ्हायन!ज्या माटीनी जनम दिन्हा... तिन्हा जीव काय म्हनो!तिन्हा जित्तजागता पोटना गोया डोयांमवरे मान टाकी ऱ्हायनातं!वावरन्हा जीव
तयमयी ऱ्हायना!🌤💧🌧️
💧💧💧💧💧💧
"पोत खतनं बिवारं पोटन्ह
बठ्ठ सोयी सायी ठी दिन्ह
पानी पयना दूर मुकला
आंबट शौकीनल्हे दि दिन्ह!🌤
येडा गताड्या तोंड दाव तू
बुधल्या व्हडी नको दपी बठू
दूरथिन दाथड्या काढू नको रें
सूर्य साक्षीलें आते नको हाटू🌧️!
ढंमकन सांडी बोली टाक तू
हायेद लायी नको बठू
कायेज धिरे म्हलायी ऱ्हायनं
वल्ल करापाउत नको उठू..!🌧️
बंगयी फुलेस्नि सजाडी ठी
तवसाम्हा हिंदया खेयी लें नां
घोदा मारी कवलोंग पयसी
खोया खोसी पानी दे नां!"🌧️
💧💧💧💧💧💧💧
ज्यासनी पह्येरं नई त्या भी
वारावर सेतस!रातले चांन्न्या मोक्या अभरायवर तंनंगी वारा संगे नाची ऱ्हायन्यात!दिनल्हे
यांय चटकाडी ऱ्हायना!हाऊ खे कितलाक दिन चाली सांगता येत नई!सपर्या-सुपर्यास्मा!वाडघास्मा ऱ्हायेल-सूयेल चारा खायी बैल,गावड्या,म्हसडा रातभर वागूल करी ऱ्हायनात!मेंयेरवरनं(बांधवरनं) गवत आथ-तथ नजरें पडी ऱ्हायनं!ते भी दातवरी हिसडा मारी ढोरे पोट भरी चरी ऱ्हायनात!ज्यास्नि कपाशी टाकेल से!रोपी देयेलं से!.. त्यांगुंता बठ्ठ घरभार बादल्या-गुंडावरी!.. पानी वतीवती पिके जगाडी ऱ्हायनात!कायपात करी ऱ्हायनात!तरी भी पाऊस जान जानी नई ऱ्हायना!लोके गच्ची देवनां नाव ली ऱ्हायनात!...🌷🌧️
"धोंड्या पानी दे!
मुकला पानी दे!
वरसारद तू रवसडंत ये!
नख जीवायींनां ढग ये!"🌧️
💧💧💧💧💧💧
पानी पडालें मुकला दिन व्हयी ग्यात!पाऊस निरानाम तोंड दखाडी नई ऱ्हायना!यांयमांगे पानीन्हा ढग दपी बठेल सेतस!कुनबी... धिवसा धरी!धीर धरी वावरन्हा बांधवर बठेल से!
घरम्हा बिवारागंम दखी!
अभरायंगम एक सारखी नजर लायी बठेल से!पानी पडावर पह्येरंनिनी वाट दखत...दिन मोजी बठेल से!रोहिन्या उडी ग्यात!मिरीग ग्या!कोल्ल वावर कायेपन-भुरटपन धरी वरसारदनी वाट दखी ऱ्हायन!🌧️
चूल्हानी भानसिनवर हुण्या हुण्या भाकरी हुभ्या सेतीस!तावा तपेल से!घरन्हा भाहेर भी तपेल से!सानं... चूल्हान्हा धूर धाभानां वर तंगाडी ऱ्हायनं!पानी वूना नई!साना झाकात नई!सारेलं वंडया भिंजायन्यात नई!मव्हरे वाढेलं श्याक,भाकरी गोड लागतं नई!वरथीन ढग पानी गायेत नई!वावर भिजात नई!बठ्ठ दिखीसनी भी डोया आंसू गायतस नई!🌷🌧️
रातलें जप लागतं नई!पानीन्हा जप करी डोया भिजतस नई!आली-गलीनां कामजोगता पोरें रातलें जेवने करी!..मंदिरनां पारवर!वट्टास्वर!बैलगाडानां साटलास्वर!..गफ-गफाडा मारतं बठेल दिखतस!मोबाईलवर चॅटिंग करत दिखतस!जमाया
येवापाउत बठी ऱ्हायनात!... आपापला घरें खाटलावरं नई तें मंग धाबास्वर जपालें निंघी जातस!वाडगाम्हा बैलेंस्ना गयाम्हा बांधेल घंट्या-घुंगरू
रातभर आवाज करी ऱ्हातीस! माय बापलें मातरं रात-रात जप येत नई!कितला दिन फाईन हावू हाऊ खे चालूच से!पावसाया कसोटी दखी ऱ्हायना!झाडवर बठेल व्हलगा,हाड्या-चिडया पानी गुंता तरसी जायेलं सेतस!वल्ली जिमीनम्हानां आया- किरकोडा नजरें पडतस नई!पानीगुंता जीव तुंय तुंय करी ऱ्हायना!💧🌧️🌤
"जीव तरसी ऱ्हायना भलता
धोंड्या पानी लयी ये नां
गावं सूनं सुनाट बठ्ठ
ढग पानी लयी ये नां
कडबा कुटार सरमट सरनं
धोंड्या पानी लयी ये नां
तिरपा तारपा व्हयनातं दारें
धोंड्या किव येवू दे नां
नव नव्वायीनां दिनगुंता
बठ्ठा समुंदर लयी ये नां
कर्ज काढी नवरी सजनी
धोंड्या शेपाली पानी दे नां!"
🌷🌧️💧🌹🌤💦🌱
------------------------
...नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे.
ह.मु.हडपसर,पुणे
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०६जुलै२०२१
🌤🌹💦🌱🌧️💧
Comments
Post a Comment