सुख न्हाले
🍀🍀🍀🍀
सुख न्हाले
🌷----🦚----🌷
...नानाभाऊ माळी
💧🌳💧🌳💧
गुढघे बाशिंग बांधू नको
हळद अंगा तू लावू नको
भेटून जाईल सखी तुला रें
काळीज आतून पाहू नको🌷
आरशाला जरा विचार एकदा
पोट तिचे तू भरशील का
स्वप्नपरी ती राजकुमारी
घट्ट हात तिचा धरशील का🌷
कित्येक आलें मुकुट घालुनी
सुख पेरितं निघूनी गेले
आकांक्षेच्या झुल्यावरती
प्रेमार्पण सारे जगुनी झाले
सप्तरंगी इंद्रधनुष्य बनून
स्वप्न श्रावणी ओले झाले
नजरेत उतरली हलकिशी ती
ऋतू रंग भरण्या एक केले
हळद पाणी होता पिवळे
उंबरा ओलांडित आत गेले
संसार मांडीला निरंतराचा
तनमन मार्दवात सुख न्हाले
🦚--------🌹--------🦚
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो नं ७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१०जुलै२०२१
Comments
Post a Comment