आम्हना भी दिन व्हतात
🌷आम्हना भी दिन व्हतात🌷
----------------------------
...नानाभाऊ माळी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गुढघाम्हा झावर गुंडायी
भूग्ल व्हयी पडी ऱ्हावाना
आम्हना भी दिन व्हतातं..!🙏
बापनी लाथ कंबरम्हा बठावर
चमकायी भेमकायी उठानां
आम्हनां भी दिन व्हतात..!🙏
कटाया येवालोंग नाया पाडानं
नि वरथिन नावे ठेवानां
बठ्ठा आयकाना भी दिन व्हतात
तगारीम्हा हागेलं मुतेलं
लेंड्या भरी उखल्ला करानां
आम्हनां भी दिन व्हतातं...🙏
चिखोल खुंदी पयेत ऱ्हावानां
घोंगडी घाली वल्ला व्हवानां
त्या पानझडीनां दिन व्हतातं🙏
चड्डी न मांगलं ठिगय मिरावत
बिन चपलन्हा सायम्हा जावानां
आम्हनां भी दिन व्हतातं.....🙏
कोल्ली भाकरवर तिख भुरभुराई
भात्याम्हा बांधी रोजे पयांना
आम्हनां भी त्या दिन व्हतातं.🙏
ईट्टी दांडू ठिकऱ्यास्वरी
बमकाडी राज लेवना
तव्हय आम्हनां भी दिन व्हतातं
दुस्कायम्हा सुगडी खायी
पोटन्हा आतडा भरानां
जीव धुगधुगीनां दिन व्हतात🙏
मायन्हा मुखे घटयानां गांना
कानम्हा मुरत ऱ्हावानां
नदारीनां भी दिन व्हतातं..🙏
🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
......नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर,पुणे
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-३०जुलै२०२२
Comments
Post a Comment